"पुस्तकी" विनोद!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
20 Feb 2010 - 4:20 pm

(वेगळ्या प्रकारच्या एका विनोदाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कसा वाटला ते जरूर कळवा. यात कुणालाही आणि कशालाही दुखावण्याचा हेतू नाही.. तसे वाटल्यास हसून मोकळे व्हा - क्षणाचा सोबती)

एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना:

या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही.

तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही.

तुमचा असल्यास तो एक योगायोग मानावा.

हे पुस्तक खालील अटींसह विकले गेले आहे :

या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकाधीन आहेत. या पुस्तकाचे इतरांसमोर वाचन, मनन, पठण, चिंतन करू नये. तसेच याची मनातल्या मनात झेरोक्स काढू नये. तसे कुणी करतांना आढळल्यास वाचकाचा मनाला लगाम घालण्यात येईल. हे पुस्तक फक्त आणि फक्त एकट्याने वाचावे. दुसऱ्या कुणाला वाचायला देवू नये. नाहितर ते जप्त करण्यात येईल. त्याऐवजी त्याला विकत घ्यायला उद्युक्त करावे.

पुस्तक : योग आणि योगायोग (एका विनोदी आत्म्याचे चारित्र्यहीन आत्मचरीत्र)

लेखक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

प्रकाशक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

मुद्रक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

विक्रेते : श्री. सत्यव्रत सत्यवचने

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

20 Feb 2010 - 4:56 pm | सुनील

सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अरुण मनोहर's picture

20 Feb 2010 - 7:06 pm | अरुण मनोहर

वाचक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

मदनबाण's picture

20 Feb 2010 - 7:17 pm | मदनबाण

नारायण !!! नारायण !!!
सॉरी
सत्यवचने !!! सत्यवचने !!!
;)

(सदा सत्यवचने... ;) )
मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

टारझन's picture

20 Feb 2010 - 8:54 pm | टारझन

हसायचं कधी ? ते ही सांगा :)

- हेमाचा सोबती

chipatakhdumdum's picture

20 Feb 2010 - 10:06 pm | chipatakhdumdum

हे संकेतस्थळ खास तुमच्याकरताच तयार केल आहे.
आणखी असच महत्वाच लिहीत जा.
तुम्हाला जोर यावा म्हणून हा प्रतिसाद.
अरे बा वन रुपयाला एक गाढव, तर दोन गाढवांची किंमत किती ?
येउ दे, असे आणखी धागे येउ दे.

मी-सौरभ's picture

21 Feb 2010 - 1:26 am | मी-सौरभ

हे कसं कराच्च???????????

-----
सौरभ :)

निमिष सोनार's picture

21 Feb 2010 - 1:08 pm | निमिष सोनार

प्रतिसादांवरून वाटते की माझे हे लेखन कुणालाच आवडलेले नाही.
वाचकांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व.
कृपया सर्वांनी मला मार्गदर्शन करावे कि नेमके कशा प्रकारचे लेखन अपेक्षित आहे... किंवा मिसळपाव वर कशा प्रकारेच फक्त लिहिले तरच चालते?

शुचि's picture

21 Feb 2010 - 1:14 pm | शुचि

नाही ..... टक्के टोणपे खात खात समजतं. कान आणि डोळे उघडे ठेवा. भरपूर वाचन करा. मी ही तेच करतेय. वी आर इन द सेम बोट :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)