तुझे माझे गुलाबाचे
जुळ्लेच नाही नाते
गुलाबाच्या गंधाहून
काट्याचीच ओढ वाटे
मैत्री मध्ये आपुल्या या
भांडणच होती फार
रुसुनिया कित्येकदा
शब्दांचीच मारामार
गुलाबाचे फुल देता
काटे तुला बोचतात
शब्द तुझे प्रेममय
रातदिन टोचतात
शब्दाविना फुलाविना
तुझे माझे आहे नाते
म्हणुनच गुलाबाच्या
काट्यांचीही ओढ वाटे
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 5:46 pm | शुचि
मैत्री मध्ये आपुल्या या
भांडणच होती फार
रुसुनिया कित्येकदा
शब्दांचीच मारामार
वाचून वाईट वाटलं. छान आहे कविता.
शब्द तुझे प्रेममय
रातदिन टोचतात
ऐवजी .....................
शब्द तुझे शल्यदायी
रातदिन टोचतात
कसं वाटेल?
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)