नमस्कार मिपाकरहो,
आज यूट्यूबवर फिरता-फिरता काही व्हिडिओज सापडले. २००८ मधे टोरँटो येथे झालेल्या स्वर-गंध या कार्यक्रमाचे हे काही विडिओज आहेत.
१) समिधा जोगळेकर - युवती मना
http://www.youtube.com/watch?v=h4G12bXuS8o&feature=PlayList&p=838ED0E1D6...
२) रवि दातार - श्रीरंगा कमलाकांता
http://www.youtube.com/watch?v=0CLjVMU_m4k&feature=related
अजूनही काही लिंक्स आहेत. रिलेटेड व्हिडिओज मधे त्या पाहता येतील.
हे दोघेही गायक बॉर्न अँड ब्रॉटअप इन कॅनडा आहेत ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट. मला स्वतःलाही हे अचानकच सापडले. आपण सर्वांनी याचा अस्वाद घ्यावा म्हणून हा लेखन प्रपंच.
सुमीत भातखंडे
प्रतिक्रिया
14 Feb 2010 - 2:19 am | बिपिन कार्यकर्ते
त्या कार्यक्रमातील रवि दातारची दोन्ही गाणी मी उतरवून घेतली आहेत. अप्रतिम हा शब्द अपुरा आहे त्यासाठी... मला पण अशीच जालावर भटकताना सापडला तो कलाकार.
बिपिन कार्यकर्ते
14 Feb 2010 - 2:56 am | पिवळा डांबिस
दोन्ही गाणी आवडली...
सुरेख!
17 Feb 2010 - 11:10 pm | चतुरंग
सुरेखच. शब्दोच्चार अतिशय स्वच्छ, स्पष्ट. लाजवाब गाणी!
(रवी दातारचा दुवा मला बिकाने पूर्वी पाठवला होता. जबरी आहे पोरगा! :) )
चतुरंग
14 Feb 2010 - 8:42 am | विसोबा खेचर
श्रीरंगा कमलाकांता..
हळदणकरबुवांनी गायलेलं माझं अतिशय आवडतं पद.
दामू-गोविंदा जोड रे!
त्या पोराच्या तोंडी हे शब्द ऐकले आणि खूप बरं वाटलं..आमचे दामुअण्णा पार्सेकर आणि गोविंदराव पटवर्धन पोहोचले हो क्यॅनडापर्यंत! :)
रवी दातारने छान गायलंय श्रीरंगा कमलाकांता.. मुलगा गुणी आहे, सुरेल आहे..
तात्या.
14 Feb 2010 - 9:49 am | प्रमोद देव
दोघेही तयारीचे वाटले.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
14 Feb 2010 - 10:19 am | प्रमोद देव
बाळाचे पाय पाळण्यात!
युवती मना
सुरत पियाकी
नीट लक्ष पुरवलं तर हा मुलगा नक्कीच नाव काढेल.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
14 Feb 2010 - 10:45 am | क्रान्ति
ही दोन्ही गाणी तर सुरेख आहेतच, शिवाय रवि दातारचं "सांगा मुकुंद" सुद्धा अप्रतिम आहे. या सुरेख दुव्यांबद्दल शतशः धन्यवाद!
क्रान्ति
अग्निसखा
17 Feb 2010 - 5:51 am | सुन्दरी
याच कार्यक्रमातील आणखी एक गायिका, अनुजा पंडितराव, हिचे गाणे सुद्धा खूप छान आहे.
http://www.youtube.com/watch?v=bAyUvt48A4M