अभुतपूर्व संकट!

फास्टरफेणे's picture
फास्टरफेणे in जनातलं, मनातलं
13 Feb 2010 - 8:54 pm

भारत नावाचं एक राज्य होतं...तिथं इटलीराणी राज्य करीत होती...तिच्या राज्यात एक महाराष्ट्र नावाचा प्रांत होता. त्या प्रांतातले सगळे सरदार इमानदार होते. एकही जण राणीच्या शब्दाबाहेर नव्हता. राजधानीतून बोलावणं आलं कि सगळे सरदार चळ्चळ कापायचे. राणीचा दराराच असा होता! ते सरदार इतके इमानदार होते कि राजपुत्राचे जोडेसुद्धा ते डोक्यावर घ्यायचे! भारत राज्यात सगळं कसं आलबेल चाललं होतं.

महाराष्ट्र प्रांतात एक खान रहायचा. या खानाचं काम म्हणजे भारत राज्याच्या नागरिकांना "जीवनावश्यक" चित्रपटरस पुरवायचा. एकही आठवडा असा गेला नाही कि भारताच्या नागरिकांनी चित्रपटरस पिला नाही. एकदा मात्र एका टोळक्यानं बंड पुकारलं आणि खानाची वाट अडवली. नागरिक चित्रपटरसाची आतुरतेने वाट बघत होते. महाराष्ट्र प्रांताचा प्रमुख चिंताग्रस्त झाला. काहीही झालं तरी नागरिकांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा पुरवल्याच पाहिजेत आणि त्या टोळक्याचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे असा पण त्यानं केला. (हा पण करण्याचं एकमेव कारण - इटलीराणीसमोर "मला नागरिकांची काळजी आहे" हे दाखवणं). त्यानं खानाला सैनिकी बंदोबस्त दिला. खानही सुखावला. नागरिकांनी जल्लोष केला आणि चित्रपटरस पिण्यासाठी अभुतपूर्व गर्दी केली.

सगळ्या "नारदांच्याही" तोंडी हीच बातमी होती...

तर अशा या महाराष्ट्र प्रांतप्रमुखाने नागरिकांच्या प्राणावरचे संकट मोठ्या धीराने टाळले!

राजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

13 Feb 2010 - 10:36 pm | अभिज्ञ

लघुकथा आवडली.

महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे काय?

अभिज्ञ.

फास्टरफेणे's picture

13 Feb 2010 - 10:42 pm | फास्टरफेणे

अरे ! इतके पोलीस कोरेगाव पार्कमधे काय करताहेत? तिकडे "थेटरात" खानाला कोण संरक्षण देणार? सरकारला तरी अक्कल आहे का नाही? कोणतं काम महत्वाचं हे आता आम्ही सांगायचं का?

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 11:13 pm | विसोबा खेचर

सुंदर जोडे हाणले आहेत. जियो...!

तात्या.

अनामिका's picture

14 Feb 2010 - 12:17 am | अनामिका

त्रागा ,चिडचिड ,आगपाखड करुन उपयोग शुन्य हाच आजपर्यंतचा अनुभव्........पुळचट आणि षंढ राज्यकर्ते लाभल्यावर जनतेच तरी कसे भले होणार? खानाचा गांधी घराण्याच्या नव्या पिढीशी असलेला दोस्ताना चित्रपट विपरित परिस्थितीत देखिल प्रदर्शित करण्यास कामी आला.....अशोकरावांना या निमित्ताने आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करावयाची आयती संधी मिळाली त्याचा लाभ त्यांनी झुंडशाहीचे प्रदर्शन करुन व सर्व सरकारी यंत्रणा राबवुन मिळवला....मुळात हुजुरेगीरी रक्तातच असल्याकारणाने इतर कुठली अपेक्षा करणे व्यर्थच.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अविनाशकुलकर्णी's picture

14 Feb 2010 - 5:27 am | अविनाशकुलकर्णी

खुप छान..मान गये उस्ताद