बटन्ड

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
12 Feb 2010 - 12:00 pm

आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता.
थकवा तर जाणवतच होता.
हात पाय धूउन तो जेवायला बसला.
....................................................

समोर वाफाळलेले जेवण.
पेंग घालवण्याकरता टीवी लावला.
कुठलासा सिनेमा.
नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन.
हीरो ऑफिसला निघालेला.
शर्ट चे बटन तुटलेले.
हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते.
आणि मग........
तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला.
स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे.
...........................................
आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती.
शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला.
इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले.
"अग शर्टाचे बटन नाहीये वरचे"
नाश्त्याची भांडी घासत असलेली सौ. दोन मिनिटानी बाहेर आली.
हातात दुसरा शर्ट होता.
"काढ तो. हा दुसरा घाल. वॉशिंग मशीन बिघडले आहे. कपड्याची रास पडली आहे. ऑफिसला गेल्यावर न विसरता सर्विस सेंटरला फोन कर. दुपारी बटन शिवुन ठेवते".
त्याने मुकाटपणे शर्ट हातात घेतला.
बुट घालता घालता त्याला पुट्पुटणे कानावर आले.
"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की".
आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2010 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की". आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.

=))

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

12 Feb 2010 - 12:10 pm | पाषाणभेद

पोपट झाला रे!
काहीही म्हणा मास्तर, स्वानुभव लय भारी हाय हं!

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 12:14 pm | विसोबा खेचर

"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की".
आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.

बाझव तिच्यायला! :)

मास्तर मस्त किस्सा रे. आणि मांडला आहेस असा की एक छोटेखानी सीनच डोळ्यासमोर आला!

(अविवाहीत) तात्या.

टारझन's picture

12 Feb 2010 - 1:28 pm | टारझन

खरोखरंच बाझवला तिच्यायला =)) =)) =))
काही खरं नाही ... अजुनही काही दृष्ये समोर आनणारे लेख येऊन द्या मास्तर =))

शुचि's picture

12 Feb 2010 - 12:28 pm | शुचि

>>आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाल>>>
खूप गंमत्शीर :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

आपले अनुभव आपल्याला खुप आवडतात. जरा आणखी वेळ मिपावर लिहायला देत चला.

वेताळ

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 12:53 pm | विसोबा खेचर

आपले अनुभव आपल्याला खुप आवडतात.

म्हणजे हा बटणाचा अनुभव मास्तरचा स्वत:चा आहे? मास्तर काय रे हे? लेका विंजिनियरींगच्या वयाचा मुलगा तुला, आणि अजून स्वत: शर्टाची बटणं मुद्दाम तोडतोस आणि बायडीने ती लगेचंच शिवून द्यावी अशी अपेक्षा करतोस?! :)

च्यामारी, मला वाटलं असंच आपलं एक मुक्तक लिहिलं असशील! :)

छ्या..!

तात्या.

विनायक प्रभू's picture

12 Feb 2010 - 1:58 pm | विनायक प्रभू

रीअ‍ॅलिटी शो आहे हा.
काल्पनिक नाही.

टारझन's picture

12 Feb 2010 - 2:29 pm | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद :)

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2010 - 12:36 am | पिवळा डांबिस

रीअ‍ॅलिटी शो आहे हा.
सरळ हापिसला निघाला?
मास्तर, तुम्हाला काय "कॅज्युअल" लीव्ह वगैरे मिळत नाय वाटतं!!!
:)

विजुभाऊ's picture

12 Feb 2010 - 12:56 pm | विजुभाऊ

मास्तर ;एक फोल्ड होईल अशी शिडी आणून ठेवा.
आनि सदोदीत जवळ ठेवत जा .वापरता येई वेळ येईल तशी ख्या ख्या ख्या ख्या

चिऊ's picture

12 Feb 2010 - 2:35 pm | चिऊ

'एक फोल्ड होईल अशी शिडी आणून ठेवा' ;) :-D

मेघवेडा's picture

12 Feb 2010 - 3:25 pm | मेघवेडा

मस्त किस्सा आहे!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रमोद देव's picture

12 Feb 2010 - 3:35 pm | प्रमोद देव

तोडीस तोड आहेत. :D

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

डॉ.प्रसाद दाढे's picture

12 Feb 2010 - 5:27 pm | डॉ.प्रसाद दाढे

बर्‍याच दिवसांनी लोणचे चाखले.. बरे वाटले

टारझन's picture

12 Feb 2010 - 5:53 pm | टारझन

शि बै .. अच्रट

-झुझु

स्वाती२'s picture

12 Feb 2010 - 6:19 pm | स्वाती२

काकूंना नमस्कार!
=)) =)) =))

रेवती's picture

12 Feb 2010 - 8:33 pm | रेवती

ही ही ही! छान लेखन!
त्या नवर्‍याचा प्रयत्न चांगला होता पण फसला बिचारा!
अवांतर: सर बर्‍याच दिवसांनी आले आहेत.

रेवती

मिसळभोक्ता's picture

13 Feb 2010 - 12:00 am | मिसळभोक्ता

बटणच तोडायचे, तर निदान प्यांटचे तरी तोडायचे. शिडी नको, की काही नको.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मराठे's picture

13 Feb 2010 - 12:14 am | मराठे

अरे पण प्यांटचे बटण शिवताना हाताला धक्का लागला तर तो पुन्हा कोणतंच बटण तोडू शकणार नाही !! ;-) असा सूज्ञ विचार त्याने केला असेल.

चतुरंग's picture

13 Feb 2010 - 12:50 am | चतुरंग

प्यांटीला. बटणंवाली प्यांट नसती आता. पूर्वी बर्‍या असायच्या नै सोयी. सगळं कसं 'बेचेन' असायचं हॅ हॅ हॅ! ;)

चतुरंग