निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य रात्र
घाली नवे उखाणे
ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली
ते चांदणे दिवाणे
भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना
स्वच्छंद गंधलेणे
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे
प्रतिक्रिया
11 Feb 2010 - 6:50 pm | शुचि
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे
हे कडवं आवडलं
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 6:51 pm | मदनबाण
कविता शृंगार रसाने भरलेली आहे... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 7:20 pm | मनीषा
अतिशय सुंदर कविता...
ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली
ते चांदणे दिवाणे
भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना
स्वच्छंद गंधलेणे
शब्द, रचना , कल्पना ...सारं काही -- अप्रतिम !!!
11 Feb 2010 - 11:48 pm | विसोबा खेचर
या ओळी सर्वाधिक आवडल्या.. सुरेखच!
तात्या.
12 Feb 2010 - 12:24 am | प्राजु
अ प्र ति म!!
कौतुक कोणत्या शब्दांत करू!
भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना
स्वच्छंद गंधलेणे
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे
क्या बात है!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
12 Feb 2010 - 1:01 pm | वर्षा म्हसकर-नायर
खुप आवडली कविता.
12 Feb 2010 - 7:10 pm | जयवी
अशक्य !!
क्रान्ति..... तुस्सी तो छा गयी यार !!
नितांत सुंदर काव्य !!
भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना
स्वच्छंद गंधलेणे
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे
खासच !!
12 Feb 2010 - 7:52 pm | पाषाणभेद
इतरांप्रमाणेही मला
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे
अनमोल तुझे देणे
या ओळी आवडल्या.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
12 Feb 2010 - 10:03 pm | मेघवेडा
अतिशय सुंदर कविता.. कुठली ओळ लिहू आणि कुठली नको असं झालंय!
अप्रतिम!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!