अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी
प्रत्येक माणसाची एक सुप्त इच्छा असते कि आपल्याला इतके पैसे मिळावेत कि कोणताही खर्च करताना हात आखडता घ्यावा लागू नये. कोणी हे उघड बोलतो तर कोणी बोलत नाही. प्रबळ इच्छाशक्ती व त्याला सातत्य, नियमीत प्रयत्न यांची जोड दिली असता हे स्वप्न कोणत्याही व्यक्तीला पुर्ण करता येऊ शकते. जगातील सर्वाधीक श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेटने म्हटले आहे कि “Always remember that money isn’t every thing, but make sure that you have made lot of it, before making such a nonsense statement.”
आपण एकट्याने काम करुन पैसे मिळवण्यावर मर्यादा येतात कारण दिवसाचे फक्त २४ तासच आपल्याकडे असतात. यातील फार तर ८ ते १० तासच आपण काम करु शकतो. नोकरी करणा-या व्यक्तीवर तर हि बंधने जास्तच येतात पण एखाद्या व्यावसाईकाचा विचार केल्यास तो आपले काम करण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक करतो. उदा. एखाद्याकडे जर २५ व्यक्ती काम करत असतील तर २५ X ८ = २०० तास त्याचेसाठी काम केले जाते व त्याचे उत्पन्नही वाढते. मात्र अशा व्यक्तीना त्याला पगार द्यावा लागतो तसेच अशा व्यावसाईक व्यक्तीला त्याचे व्यवसायात फार मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. परत जर व्यवसायात अपेक्षीत धंदा झाला नाही तर मोठे नुकसान होण्याचीही शक्यता असते.
नेटवर्क मार्केटींग हि एक अत्यंत चांगली संकल्पना आहे मात्र झालय काय कि या व्यवसायात अनेक स्वार्थी लोकानी हिचा वापर फक्त आपल्या स्वत:चे फायद्यासाठी करुन घेतला. बाजारात सहजपणे उपलब्ध असणारे कोणतेतरी उत्पादन जवळपास तेवढ्याच किंमतीला अधीक अँडमिनीस्ट्रेटिव्ह चार्जेसचे नावावर जादा पैसे उकळून अनावश्यक उत्पादन किंवा सेवा लोकांना निरनिराळी आमिषे दाखवून गळ्यात मारली गेली अथवा कोणते तरी अनावश्यक सॉप्टवेअर किंवा वेबसाईट माथी मारली गेली. पैशाचे मोहाला बळी पडून अनेक लोक यात फसले गेले व त्यामुळे एक चांगली व्यावसाईक संधी मात्र बदनाम झाली. यात दोष त्या संकल्पनेचा नसून ती राबवणा-या कंपनीचा असतो.
नेटवर्क मार्केटींग मध्ये उत्पादन असे असावे कि जे सर्व व्यक्तीना अत्यावश्यक असावे. त्याची किंमत ही बाजारात उपलब्ध असणारे त्याच उत्पदनाचे किंमतीचे किमान ५०% तरी कमी असावी. आणि हे सहज शक्य असते कारण नेटवर्क मार्केटींग मध्ये जाहिरात, पगार व अन्य व्यावसाईक खर्च कमी असतो, तसेच यात कमी खर्चात उलाढालही मोठी होत असते. त्या उत्पादनाची किंमत हि सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाला परवडेल इतपतच असावी. ते विकत घेणारे व्यक्तीला ते घेतल्यानंतर आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाल्याचे समाधान लाभावे. तसेच ग्राहकाने घेतलेले उत्पादन हे स्वत:चे वापरासाठी घेतलेले असल्यामुळे त्याने नेटवर्क मार्केटींग करावे अथवा न करावे हा पर्याय त्याचेकडे उपलब्ध असला पाहिजे. जरी त्याने नेटवर्क मार्केटींगचे व्यवसायात सहभाग घेतला नाही तरी ज्या व्यक्ती याचा व्यवसायासाठी उपयोग करु इच्छीत आहेत त्यांचे व्यवसायावर कोणताही परिणाम होता कामा नये. म्हणजेच चेन सिस्टीम असू नये कारण ती तुटल्यावर व्यवसाय ठप्प होतो. त्या बेसीक उत्पादनाव्यतरिक्त अन्य काही आवश्यक व जादा फायदे त्याच किंमतीत मिळत असतील तर सोन्याहुनही पिवळे. म्हणजेच थोडक्यात नेटवर्क मार्केटींगची एक स्वन्नवत संधी असावी.
अशा नेटवर्के मार्केटींग मधील उत्पादन विकत घेण्याचे फायदे:
१) आपल्याला आवश्यक असणारे उत्पादन निम्या किंमतीत मिळते.
२) आपण ते स्वत:साठी वापल्यावर पुरेपूर मोबदला मिळतो व स्वत:चे पुर्ण समाधान होते.
३) ज्याला यातून व्यवसाय करावयाचा असतो त्याला व्यवसायाची संधी मिळते.
४) जो व्यक्ती यात थोडाकाळ काम करतो त्यालाही थोडेफार पैसे मिळतात, काही व्यक्ती आपण खरेदी केलेल्या उत्पादनाचे किंमती एवढे पैसे हे उत्पादन आपल्या परिचीत व्यक्तीना सुचवून आपली गुंतवणूक वसूल करुन घेऊन थांबू शकतात.
५) ज्याना हे सुचवले जाते व जे हे विकत घेतात तेही समाधानी होतात.
व्यवसाय म्हणून संधी:
१) आपण एकदाच आपल्या स्वत:चे वापरासाठी आवश्यक असणारेच उत्पादन खरेदी करण्यासाठी जेवढी किंमत देतो तिच आपली गुंतवणूक.
२) शिक्षण, वय वगैरे कोणत्याच गोष्टीची अट नाही.
३) आपला नियमीत नोकरी धंदा सांभाळून फावल्या वेळेचा सदुपयोग करुन काही जादा उत्पन्न मिळविण्याची संधी.
४) जेवढा वेळ आपण देऊ तेवढे अधीक उत्पन्न मिळण्याची संधी.
५) आपण ज्या व्यक्तीना हे उत्पादन सुचवतो त्या व्यक्तीला ते आवडले व त्याचेसाठी आवश्यक वाटले तर तो ते विकत घेतो व आपल्याला कमिशन प्राप्त होते.
६) जी व्यक्ती हे उत्पादन विकत घेते तिनेही जर हेच उत्पादन त्याचे परिचीत व्यक्तीपर्यंत पोहोचविले तर त्याने केलेल्या कामाचाही आपल्याला मोबदला मिळतो.
७) दुसरी एखादी परिचीत अथवा अपरिचीत व्यक्ती जी या व्यवसायात येते ती त्याचे स्वत:चे फायद्यासाठी व्यवसाय कमी किंवा जादा करते व त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला कोणताही मोबदला द्यावा लागत नाही.
८) टि.डि.एस. कापला जाऊनच कमिशनची रक्कम मिळत असल्यामुळे मिळणारे उत्पन्न हे पुर्णत: सफेद (व्हाईट) असते.
९) फावल्या वेळेत जादा उत्पन्न मिळवून आपली स्वप्ने पुर्ण करता येऊ शकतात.
१०) अत्यल्प गुंतवणूक करुन अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी.
पैसे किती मिळू शकतात?
१) हे सर्वस्वी तुम्ही किती वेळ या व्यवसायासाठी देता व किती लोकांपर्यंत हे उत्पादन पोहोचविता त्यावरच सर्वस्वी अवलंबून आहे.
२) अर्थात पी हळद हो गोरी हे तत्व येथे लागू होत नाही.
३) सुरुवातीला अत्यल्प उत्पन्न मिळते.
४) जस जसे नेटवर्क वाढत व विस्तारत जाते तस तसे उत्पन्नही वाढत जाते.
५) पैसे मिळवण्यासाठी मर्यादा म्हणाल तर एक व्यक्ती जास्तीत जास्त दर महा एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये मिळवू शकतो.
होय असेच एक स्वप्नवत उत्पादन नेटवर्क मार्केटींगचे माध्यमातून आज कोणासाठीही उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया
9 Feb 2010 - 3:23 pm | कराडकर
प्रॉडक्ट काय आहे ?
9 Feb 2010 - 3:26 pm | महेश हतोळकर
गादीला गिर्हाईक आले बघा.
9 Feb 2010 - 3:29 pm | सदानंद ठाकूर
नाही.
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
12 Feb 2010 - 12:57 pm | वेताळ
कोणता तरी नवा प्रिंटर आला आहे . त्याची जाहिरात असावी.बाकी नेटवर्क मार्केटिंग बद्दल शुभेच्छा.
वेताळ
9 Feb 2010 - 3:39 pm | आशिष सुर्वे
धाग्यामागील उद्देश काय आहे?
जनसेवा की व्यवसाय वॄध्दिंगत करणे?
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
9 Feb 2010 - 4:12 pm | विजुभाऊ
वाचा हे एम एल एम वाले कसे येडे बनवतात ते
http://misalpav.com/node/8787
प्रत्येकजण म्हणतो की एक जब्बरदस्त प्लॅन आहे.
हमखास समज की तो व्हर्साटाईल चे प्रॉडक्ट विकतोय
तुम्हाला रेसीड्यूअल इनकम मिळेल् हमखास समजा अॅम वे
तुम्ही काही करू नका फक्त दोन मेम्बर जमवायचे / तुम्हाला जर चार लोक / मित्र जमवता येत नसतील तर काय उपयोग आहे जगण्याचा.
पैसे म्हणजे सर्वस्व नव्हे पण पैसे नसणे म्हणजे काहीच नव्हे.
आयुष्यात माणसाला ध्येय असावे......वगैरे वगैरे.....
वगैरे वगैरे वगैरे...... असे कोणी बोलले की समजा तुम्हाला अडकवण्यासाठी जाळे टाकले जातेय.
पॅराबल ऑफ पाईपलाईन , अॅलन पीज , झीग झीगलर ही नावे निघाली की समजा तुमची विकेट जाण्याच्या बेतात आहे.
तुमच्या नातेवाईकाना /मित्राना फशी पाडा. आणि कोणत्यातरी अमेरीकी कंपनीचे पोट भरा.
१) आपल्याला आवश्यक असणारे उत्पादन निम्या किंमतीत मिळते.
कितीही सूट मिळाली म्हणून बाजारात २०/२५ रुपयाना मिळत असताना २००/२५० रुपयेची टूथ पेष्ट कोन वापरणार
२) आपण ते स्वत:साठी वापल्यावर पुरेपूर मोबदला मिळतो व स्वत:चे पुर्ण समाधान होते.
अॅमवे वापरणारे आणि त्यातून समाधानी असणारे किती लोक तुम्हाला माहीत आहेत.
३) ज्याला यातून व्यवसाय करावयाचा असतो त्याला व्यवसायाची संधी मिळते.
त्यासाठी स्वतःची आयडेन्टी विसरून साबण /टुथ पेश्ट शॅम्पू विकत बसावे लागते
४) जो व्यक्ती यात थोडाकाळ काम करतो त्यालाही थोडेफार पैसे मिळतात, काही व्यक्ती आपण खरेदी केलेल्या उत्पादनाचे किंमती एवढे पैसे हे उत्पादन आपल्या परिचीत व्यक्तीना सुचवून आपली गुंतवणूक वसूल करुन घेऊन थांबू शकतात.
कोणताही एम एल एम व्यवसाय हा पार्टटाईम करून उपयोग होत नाही.
अॅमवे जॉइन करणारात सक्सेस्चे प्रमाण किती टक्के आहे सांगु शकाल का?
त्यापैकी किती जण हा व्यवसाय पार्ट टाईम करतात? बहुधा शून्य टक्के.
५) ज्याना हे सुचवले जाते व जे हे विकत घेतात तेही समाधानी होतात
गुंतवलेले पैसे बाहेर काढण्यासाठी इतराना अक्षरशः गिर्हाईक बनवावे लागते
५) पैसे मिळवण्यासाठी मर्यादा म्हणाल तर एक व्यक्ती जास्तीत जास्त दर महा एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये मिळवू शकतो.
कोणताही व्यवसाय करताना त्यातून अमर्याद पैसे मिळू शकतात.
अगदी चप्पल शिवायच्या व्यवसाय प्लॅन केला तरी समजा जगातल्या सर्व लोकानी ठरवले की तुमच्याकडूनच चप्पल शिवुन घ्यायची आणि साधारणतः चप्पल महिन्यातून एकदा शिवून घ्यावी लागते तर दर महीना अगदी ५रुपये प्रती चप्पल दराने तुम्ही अब्जावधी रुपये कमवु शकाल.
असो येडे बनवताना इतकेही ताणू नका की अविश्वसनीय वाटेल
आता या एका प्रश्नाचे उत्तर द्या.
तुमच्या प्रत्यक्ष परीचयातले किती जण तुम्ही करता तो व्यवसाय करून इतके दर महा एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये मिळवतात ?
9 Feb 2010 - 5:27 pm | समंजस
+१
9 Feb 2010 - 8:17 pm | खान्देशी
सहमत!!!
(अनुभवी) :(
9 Feb 2010 - 11:56 pm | क्लिंटन
+१००००००००००००००००
अमेरिकेत असताना काही काळ मी या अॅमवे च्या लोकांच्या मिठास बोलण्याला फसलो होतो. या लोकांची दुनिया मी अगदी जवळून बघितली आहे आणि हे लोक किती लुच्चे-लबाड-लफंगे बनू शकतात ते पण अगदी जवळून बघितले आहे.मुळात ३ डॉलरला मिळणारी एखादी वस्तू १५ डॉलरला स्वत: विकत घेऊन मूर्ख बनायचे आणि आपल्यासारखे मूर्ख बनायला तयार असणारे १० मूर्ख शोधायचे आणि त्यांना इतर बकरे शोधायला मदत करायची असे हे गणित आहे. पिरॅमिडच्या टोकावर असणारे लोक वर्षाला अगदी मिलियन डॉलर कमवत असतील पण ते मिलियन डॉलर तळात असलेल्या शेकडो जणांना फसवूनच त्यांना मिळत असतात हे कोण नाकारू शकेल? या मंडळींचा कटाक्ष असतो महिन्याला १०० पॉईंटचे सामान खरेदी करण्यावर.जर एखाद्या महिन्यात १०० पॉईंटचे सामान खरेदी केले नाही तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाब विचारणारे एकामागोमाग एक इतके फोन येतात की विचारू नका.असे अनेक हलकट लोक मी बघितले आहेत. मला वाटते की त्यांच्या डाऊनलाईन मधला एखादा मनुष्य १०० पॉईंटचे सामान खरेदी करायच्या आधी परलोकवासी झाला तर यांची पहिली प्रतिक्रिया असेल-- ’अरे हा या महिन्याचे १०० पॉईंट करून मेला असता तर किती चांगले झाले असते’ !
मला यांचे खरे स्वरूप कळले ते एका घटनेनंतर. प्रत्येकाला यांच्या ’सिस्टिम’ मधून सीडी आणि पुस्तके घ्यायची असतात.मी अमेरिकेत विद्यार्थी असल्यामुळे स्वाभाविकपणे माझे उत्पन्न मर्यादित होते आणि माझा हाफ.कॉम किंवा ऍमॅझॉनवरील वापरलेली स्वस्तातील पुस्तके विकत घेण्याकडे कल असायचा.एकदा माझा ’अपलाईन’ माझ्या गळ्यात ऍमॅझॉनवरील १२ डॉलरला नवे मिळणारे पुस्तक १५ डॉलरला गळ्यात मारू बघत होता. मी त्याच्याकडून ते पुस्तक घ्यायला नकार दिल्यानंतर मी त्या सगळ्यांच्या नजरेतून उतरलो. पण पिरॅमिडच्या टोकावर बसलेल्या कोणत्यातरी हलकटाला मिलियन डॉलरचे बंगले हवेत, पोर्श गाडी, स्वत:चे विमान हवे म्हणून मी जास्त महागाच्या वस्तूच नव्हे तर जास्त महाग पुस्तकेही खरेदी करावीत असा यांचा अट्टाहास! प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी जमात यापेक्षा वेगळी नसेल.
एकट्यादुकट्या बेसावध भारतीयाला मॉल किंवा वॉलमार्टमध्ये खिंडीत गाठण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. विनाकारण ओळख काढायची, ’मी तुम्हाला कुठेतरी बघितले आहे’ अशा अर्थाचे एखादे वाक्य बोलायचे आणि संवाद साधून मासा गळाला लागतो का हे बघायचे ही त्यांची खासियत. एकदा मी न्यू जर्सीमधील एका वॉलमार्टमध्ये गेलो असताना असाच एक मनुष्य ’मी तुम्हाला कुठेतरी बघितले आहे’ असे म्हणत माझ्यासमोर आला. मी न्यू जर्सीत प्रथमच गेलेलो असल्यामुळे त्याने मला कुठेही कधीही बघितले असायची शक्यता अगदी शून्य होती. मला त्याचा डाव लगेच समजला. त्याने मला प्रश्न विचारला ’Are you from India?' त्याची जिरवायला मी शुध्द मराठी उचारातल्या इंग्लिशमध्ये उत्तर दिले ’No I am from Mozambique'. त्या मनुष्याचा चेहरा बघण्यासारखा झाला हे सांगणे न लागे. तेव्हा अमेरिकेतील मिपाकरांनो, अशा जंतूंना पिटाळून लावायला हा उपाय करून बघा. यश नक्कीच मिळेल.
मागे आमच्या हिलरीने कोणी अॅमवेवाला प्लॅन दाखवायला घरी येणार आहे असे सांगितले. त्या प्रकाराचाच मला मनस्वी संताप असल्यामुळे तो मनुष्य घरी येताच त्याच्या डोक्यात घालायला वरवंटा तयार ठेवायला हिलरीला सांगितले. माझी तिखट प्रतिक्रिया बघितल्यानंतर हिलरीने पण त्याला घरी बोलावले नाही हे चांगलेच झाले. असो.
डिस्क्लेमर: माझी याप्रकाराविषयीची मते अत्यंत जहाल आहेत. मिपाच्या नियमात ती बसत नसल्यास गरज भासली तर हा प्रतिसाद जरूर काढून टाकावा.
---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंधन संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------
10 Feb 2010 - 5:53 pm | प्रकाश घाटपांडे
अमेरीकन अॅमवे कंपनी पासुन सावधान हा डॉ विजय ढवळे ओटावा कॅनडा यांचा एकता जाने १९९९ मधील आलेला लेख माझ्या अजुन संग्रही आहे. या विस्तृत लेखात अॅमवेचा पोल खोल आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
10 Feb 2010 - 6:21 pm | भडकमकर मास्तर
अप्रतिम..
मोझांबिकाचे क्लिंटन :)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
10 Feb 2010 - 6:58 pm | बिपिन कार्यकर्ते
क्लिंटनचा दणका... आवडला... आपल्याकडे पण असंच एक 'स्वदेशी'चं खूळ होतं / आहे. त्याचा मालक कुठून कुठे पोचला थोड्याच काळात आणि किती लोक तसेच राहिले हा अतिशय इंटरेस्टिंग प्रकार आहे. (सध्या खूप कमी ऐकू येतंय...) खूप जवळून बघितला तो प्रकार... पण कधीच अडकलो नाही... ते अॅमवे वगैरे बद्दल तर जवळ जवळ अमेरिकेल्या प्रत्येक मित्राने किस्से ऐकवले आहेत.
बिपिन कार्यकर्ते
10 Feb 2010 - 8:53 pm | प्रकाश घाटपांडे
स्वदेशीच्या ब्रेन स्टॉर्मिंग सेशनला मी गेलो होतो. आमच्या शेजारी बाई आग्रह करीत होत्या. मी अर्थातच या प्रकाराच्या विरोधात होतो. संबंध जपण्यासाठी मी फक्त एवढेच सांगितले कि मी सहभागी होणार नाही पण 'स्वदेशी'वस्तु तुमच्याकडुनच घेईन. मी कायम वस्तु त्यांच्याकडुन घेउ लागलो. त्यांना वस्तुच्या वितरणासाठी येणार खर्च व उपलब्धता याचे गणित लवकरच समजले. मग माझ्या वस्तुंची मागणी त्या टाळु लागल्या. मग वस्तु पुन्हा मी पुर्ववत समोरच्या वाण्याकडुन घेउ लागलो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 Feb 2010 - 2:22 am | विकास
क्लिंटनच्या प्रतिसादानंतर अजून काहीच लिहीण्यासारखे नाही. :)
मी स्टूडंट लाईफ मधून नुकताच बाहेर आलेलो असताना एक वर्गातील मुलगा (वर्गमित्रपण त्यावेळेस नव्हता) अचानक रस्त्यात भेटला.तू काय करतो-मी काय करतो असे विचारताच, (अमेरिकन अॅक्सेंटमधे) म्हणाला मी बिझनेस करतो. म्हणले, "अरे वा!", तात्काळ उत्तर आले, "आपण भेटले पाहीजे, मला धद्याविषयी बोलायला आवडेल". म्हणलं जरूर. तेंव्हा अॅमवेबद्दल ऐकले होते पण अनुभव नव्हता आणि डोक्यात आले नाही.
लगेच हा गडी माझ्याकडून पत्ता घेऊन २-४ दिवसात घरात हजर! आल्या आल्या (नंतर कळले, त्यांना शिकवलेल्या पद्धतीत) स्टाईलमधे विचारले,
"तुला पोर्श घ्याविशी वाटत नाही का?"
मला काही उद्देशच समजला नाही? म्हणलं, "कशाला? नाही वाटत घ्याविशी... का?".
पुढचा प्रश्न, "मग मर्सिडिझ, बिएमड्ब्ल्यू?"
माझा प्रतिप्रश्न, "तुझा धंदा नक्की पर्यावरणक्षेत्रात/संगणकात आहे का गाड्या विकतोस?"
मग बिचारा गडबडला, "नाही तसे नाही, पण मला माझी बिझनेस स्कीम जरा समजावून सांगायची आहे."
मग माझी ट्यूब पेटली, " तू अॅम्वेवाला आहेस का?"
गुळमुळीत प्रतिसाद, " नाही म्हणजे तसे नाही पण..."
"हे बघ मला इंटरेस्ट नाही, चहा वगैरे घेऊ आणि गप्पा मारू, यावर बोलायला नको". माझा चहापण वाचला :-)
मात्र कधीकधी गडबड होऊ शकते. एकदा एका मित्राकडे एक असाच पार्टीत भेटलेल्या व्यक्तीचा अगदी निखळ मराठी-मराठी नेटवर्कींग करायला दुसर्यादिवशी फोन गेला. आमचे मित्र सावध आणि अॅमवेबद्दल कडवट असल्याने, तसाच फोन असावा असे समजून "मला अॅमवेत इंटरेस्ट नाही", असे म्हणाले. बिचारा उगाच दुखावला गेला. अर्थात सुदैवाने नंतर गैरसमज दूर झाले.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
9 Feb 2010 - 4:50 pm | स्वाती२
देवा! इथेही हे अॅमवेवाले पाठ सोडत नाहित.
डिसेंबरमधे इंडियाना स्टेटने प्रायोजित केलेल्या उद्योजक कार्यशाळेला जाण्याची संधी मिळाली.
धडा पहिला: नेटवर्क मार्केटिंग आणि तत्सम श्रीमंत व्हायच्या योजनांपासून दूर रहा.
9 Feb 2010 - 5:02 pm | दादा कोंडके
विजुभौंशी सहमत!
मी स्वतः अॅमवे, स्वदेशीचा वगैरे मेंबर आहे. एम एल एम म्हणजे स्वतः Xत्या बनणं आणि लोकांना Xत्या बनवणं.
9 Feb 2010 - 6:34 pm | अरुण मनोहर
पिरॅमिड मार्केटिंग आहे किंवा नाही ह्याची एक "वस्त्रहरण" परिक्षा आहे.
गिर् हाईकाला फासण्यासाठी खुप मधाळ व लंबे चौडे भाषण देतील. पण शेवटपर्यंत, ते काय विकत आहेत (प्रॉडक्ट) आणि ते केवढ्याचे आहे, ह्याचा पत्ता लागू देणार नाहीत.
वरील लेख ह्या सगळ्या परिक्षांना खरा उतरला आहे.
सुअसांनल
9 Feb 2010 - 7:38 pm | नावातकायआहे
The only time to buy these is on a day with no "y" in it. - Waren Buffett
9 Feb 2010 - 8:48 pm | वाटाड्या...
साधारण ५-६ वर्षांपुर्वी एका मित्रामुळे अॅमवेच्या एजंटला भेटाव लागलं. तो लय भारी वगैरे कोट बीट घालुन आलेला. बराच वेळ प्रवचन ऐकुन बोअर झालेलो.
शेवटी सगळं ऐकुन घेउन त्याला एकच प्रश्न विचारला..तुमचं प्रॉडक्ट इतकं भारी आहे ते नुसतं ऐकुन कसं ठरवायचं? वापरलं पाहीजे ना एकदातरी...भावाला वाटलं की गिर्हाईक मिळालं. म्हणाला, थांब, असं म्हणुन त्यानं मला एक टुथब्रश, पेस्ट, रुमाल अन काय काय दिलं. म्हणाला ह्या सगळ्याची किंमत ४५० रु. आहे. नंतर भेट झाली नाही हे वे. सां. न. ल.
त्यादिवशी कळ्ळं की आपल्याला गिर्हाईक बनवायला आलेल्यालाच गिर्हाईक बनवण्यात काय मजा आहे महाराजा...
- वाटाड्या...
9 Feb 2010 - 11:03 pm | टुकुल
लेख वाचला आणी धन्य झालो..
या एम. एल. एम वाल्यांबद्द्ल भयंकर चीड येते, भारतात कधी कुणी त्रास दिला नाही, पण इथे आल्यानंतर असे एक से एक नग मिळाले, कि १-२ जण मार खाता खाता वाचले.
मला एक कळत नाही, एव्हढा चांगला पगार असुन आणी सर्व सुखसोयीअसुन सुध्दा हे लोक या मधे कशाला उतरतात, भिकार्यांसारखे लोकांच्या मागे लागतात? भारतीय भारतीय म्हणुन जवळ येतात आणी नंतर डोक्याची ** *** करतात.
--टुकुल
9 Feb 2010 - 11:05 pm | शुचि
अस्साच अनुभव
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
9 Feb 2010 - 11:27 pm | चतुरंग
(रॉबी)चतुरंग
10 Feb 2010 - 6:48 pm | विजुभाऊ
हे पहा आणखी काही
Pyramid scheme accusations
Amway has several times been accused of being a illegal pyramid scheme. A 1979 FTC investigation in the United States (see below) and a 2008 court judgement in the United Kingdom dismissed these claims.[64] However, there are people that state "Amway would seem to operate a legal pyramid scheme" [65] with others saying MLM marketing itself is nothing more than a legalized pyramid scheme.[66][67]
[edit] FTC investigation
Main article: In re Amway Corp.
In a 1979 ruling,[16][68] the Federal Trade Commission found that Amway does not qualify as a pyramid scheme since Amway compensation system is based on retail sales to consumers, not payments for recruiting.
It did, however, order Amway to stop retail price fixing and allocating customers among distributors and prohibited the company from misrepresenting the amount of profit, earnings or sales its distributors are likely to achieve with the business. Amway was ordered to accompany any such statements with the actual averages per distributor, pointing out that more than half of the distributors do not make any money, with the average distributor making less than $100 per month. The order was violated with a 1986 ad campaign, resulting in a $100,000 fine.[69]
[edit] Amway Andhra Pradesh (India)
In September 2006, following a public complaint, Andhra Pradesh state police (CID) initiated raids and seizures against Amway distributors in the state, and submitted a petition against them, claiming the company violated the Prize Chits and Money Circulation Schemes (banning) Act.[70] They shut down all offices of firm Amway, and Arijit Saha writes that "with it the fate of 80,000 distributors of the company has been indefinitely sealed".The enforcement said that the business model of the company is illegal.[71] The Reserve Bank of India (RBI) had notified the police that Amway in India may be violating certain laws regarding a "money circulation scheme" and the IB Times article writes that "some say ... Amway is really more about making money from recruiting people to become distributors, as opposed to selling products."[71] The complaint was initiated following a dowry dispute between a local man and his wife, an Amway distributor.[72] Following a petition by Amway, the state High Court issued an injunction against the CID and stated the Act did not prima facie apply,[73] however after Amway requested the CID petition be dismissed the High Court declared that if police allegations were true, Amway's Indian subsidiary would be in violation of the act and the investigation should continue. On August 14, 2007 the Supreme Court of India ordered the state police to complete the investigation against Amway in 6 months.[74] In 2008, citing the High Court decision, the Andhra Pradesh state government enacted a ban on Amway media advertisements.[70] Amway challenged the ban and in July 2009 the AP High Court refused a petition the ban should be enforced.[75] As of June, 2009 the original 2006 CID case was still pending at the Chief Metropolitan Magistrate Court in Hyderabad.[76]
11 Feb 2010 - 4:03 pm | नितिन थत्ते
कोणी फोटोव्होल्टाइक पॅनेलचे एम एल एम कर्तोय का? नसेल तर मीच चालू करीन म्हणतो. ;)
नितिन थत्ते
12 Feb 2010 - 12:49 am | उपास
ह्याच सदानंद ठाकूरांनी दहा एक महिन्यांपूर्वी हा बर्यापैकी चांगला धागा काढला होता की..
जादा पैसे मिळवण्याच्या संधी मग हे एल एम एल चं आता का काढलं ब्वॉ??
उपास मार आणि उपासमार
12 Feb 2010 - 4:00 am | पाषाणभेद
माऊस ट्रॅप बाबा माऊस ट्रॅप.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)