आमची प्रेरणा :
सूचना: या लेखनातील परा याचा अर्थ पळूनजाणारा राजकुमार असा घ्यावा.
कोणत्याही हयात असलेल्या नसलेल्या डुप्लीकेट/अडुप्लीकेट सदस्याचा काही संबन्ध लावू नये.
कोण आहेस तु?
जीमेल वर असतोस्?
लॉग इन आयडी काय तुझे?
पिंग पण करणार नाही ?
माझ्याशी पण नाही ?
मी तुला परा म्हणेन !
चालेल?
तू ब्लॉक द सेंडर चे बटण दाबणार ?
नको रे... नाही करणार पिंग सारखे सारखे ... परा!
*
परा !
ये !
ये ना ! मी नेट उघडून बसलोय.
कर पिंग कर !
कनेक्ट हो ना !
असा का करकरतोस?
शनीवारातून सदाशिवात का जातोस !
विंडोवरून लिनक्स वर गेल्यासारखा
ये !
परा ! ये!
*
परा!
बोल ना माझ्याशी !
आज किती छान स्क्रीन सेव्हर आहे !
कधी घेतलास अपलोड केलास ?
मला सांगितले पण नाही!
परा ! तु कायमचा का नाही लॉग्ड इन रहात?
सारखा आलास की बीझी स्टेटस करतोस ?
कशात बिझी असतोस इतका इतका
प्रोजेक्टवर ?
सपोर्ट च्या की इंपइंप्लेमेंटेशनच्या ?
की मग डॉक्युमेन्टेशनच्या!
मी पण येईन !
नेशील मला?
सांग ना तुझ्या पी एम ला ?
परा?
बोल ना !
तु बोलत का नाहिस?
जी टॉक बॅन आहे का तुझ्या हापिसात?
*
बोल काय म्हणतोस परा?
काल का नाही लॉग इन झालास?
मी होते लॉग्ड इन दिवसभर !
हो .. गूगल टॉकवर , याहू चॅटवर , क्युपीड बे वर....
बेंचवरचे लोक दुसरे काय करणार !
आपले ठरले होते ना?
ऑफीस कम्युनिकेटरवर नाही पिंग करायचे म्हणून.
मग इथे कशाला पिंग केलस?
फॉल्स कॉल झाला?
बर बर केले आहेस पिंग तर जरा वेळ लॉग्ड इन रहा !
बोलत बसु..
आजपी एम नाहीये हापिसात...
फक्त तु आणि मी !
*
हो रे परा!
मी काल खुप कामात होतो!
बहुतेक प्रोजेक्ट मिळील असे वाटतेय.
किती दिवस बेंचवर बसणार
तु वाट पाहिलीस?
अरे खरेच ...
मी विसरलो नाही तुला !
कसा विसरेन बाबा !
मागच्या प्रोजेक्ट वरचे तू पी एम ला खुळे बनवून अर्धवट केलेले काम माझ्याच गळ्यात पडले होते...
क्लायंट इंटरव्ह्यू होता ना म्हणुन नाही आलो..
आपल्याला एक संस्थळ बनवायचे ना ? की ब्लॉग?
तिथे फक्त तु आणि मी?
दोघेच संपादक !
हो ना?
मग डुप्लिकेट आयडी नको घ्यायला?
आपल्या लेखावर प्रतिसाद कोण देणार
वेडा कुठला !
*
नको ना !
परा नको लॉग ऑट करूस...
मी पण करतो ...
हो ...
मी पण लॉग ऑट करतो तुझ्याबरोबर ...
जावु आपण तिकडे फेसबूक वर असलेल्या शेतात ...
स्ट्रॉबेरीचे घोस तोडत बसूया
थांब !
परा ! थांब !!
मला तिकडे लॉग इन होउ दे...
आलो मी ... परा... मी आलो...आलो ....आलो... पिंग !
पराऽऽऽ !!!
पराऽऽ !!
पराऽ !
*
'डॉक्टर.ऽऽऽ'
'बोला सिस्टर !'
'तो ५ नंबरच्या क्यूबीकलमधला लॅपटॉप सिरियस झाला आहे..'
'आलोच ऽऽ'
.
.
.
'सिस्टर, सर्टिफिकेट तयार करा ! एस एम पी एस फेल्यूअर.... हार्ड डिस्कवर अतिरिक्त ताण. '
'इथे नाही पण त्या जगात तरी त्याला नेटवर्क कनेक्षन मिळो
प्रतिक्रिया
6 Feb 2010 - 4:51 pm | शुचि
आवडली.
>>मग डुप्लिकेट आयडी नको घ्यायला?
आपल्या लेखावर प्रतिसाद कोण देणार
वेडा कुठला !>> =)) =)) =))
या वरच्या वाक्यांचा प्रकाश पडला डोक्यात आणि ह.ह.पु.वा.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
8 Feb 2010 - 9:44 am | विजुभाऊ
प्र का टा आ
8 Feb 2010 - 9:46 am | ब्रिटिश टिंग्या
प्र का टा आ
8 Feb 2010 - 9:50 am | प्रभो
प्र का(??) का टा आ??
8 Feb 2010 - 9:58 am | ब्रिटिश टिंग्या
वै प्र! पा!