असाही एक अनुभव

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
28 Jan 2010 - 9:51 pm

स्थळः बंगलोर च्या जवळचे एक छोटेसे गाव
काळः हल्लीचाच
वेळ : सायंकाळी पाच्/सहा
घसा फारच खवखव करायला लागला लवंग घ्यावी म्हणून एका दुकानात गेलो.
भोवताली ज्या वस्तु दिसल्या त्यात लवंग वगैरे काहीच नव्हते.
लवंगेला कानडी/ तमिळ भाषेत काय म्हणतात या बद्दल एकूणच अज्ञान.
आता दुकानदाराला लवंग द्या या साठी काय म्हणायचे याचा विचार सुरु झाला
मी इंग्रजीत क्लोव्ह दे असे म्से म्हणालो.
क्लोव्ह चा उच्चार दुकानदाराने काहीतरी भलताच घेतला असावा.
त्याने दुकानातल्या कामगाराला काहीतरी आणायला पिटाळले.
कामगार कसलेतरी कडधान्य घेऊन आला.
मी नकार दिल्यानन्तर दुकानदार आणखी काही धान्ये दाखवू लागला.
असे पाच सहा वेळा झाल्यानन्तर मी क्लोव्ह चे स्पेलिंग लिहून दिले. दुकानदार आणखीनच बुचकळ्यात पडला
त्याने तो कागद कामगाराला दाखवला. कामगार ते स्पेलिंग कोणत्या डब्यावर दिसते ते पाहू लागला.
शेवटी मी लवंगेचे चित्र काढले.
कामगाराने तत्परतेने लवंग आणली.
मी दुकानादाराला विचारले " याला कन्नड मध्ये काय म्हणतात"
दुकानदार म्हणाला "लवंग"

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

28 Jan 2010 - 10:00 pm | चिरोटा

मस्त अनुभव. असेच काही कॉमन शब्द-
डाळिंबे- डाळिंबे हन्नु
द्राक्षे-द्राक्षे
सीताफळ- सीताफळा(ला)
कोथींबीर- कोथींबरी सोप्पु
भेंडी
P = NP

विजुभाऊ's picture

28 Jan 2010 - 10:05 pm | विजुभाऊ

मी एका कन्नडीगाला "कुंडीत झाडे लाव" असे म्हणालो होतो तेंव्हा तो भडकला होता

चिरोटा's picture

28 Jan 2010 - 10:09 pm | चिरोटा

:D
तो शब्द कॉमन आहे पण अर्थ भलताच आहे.
कन्नड प्रविण काळे साहेबच आता त्याचा अर्थ सांगू शकतील.
बेनदे कायी
P = NP

शुचि's picture

28 Jan 2010 - 10:26 pm | शुचि

गुजराथी माणसानी/बाईनी "तमे गान्डो छे" म्हन्ट्ला तर आपणही थोडे बिचकतोच की :))

त्याना म्हणायच असत - तू वेडा आहेस.

आपण टरकतो च की.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

असे विजुभाऊंना म्हणायचे आहे. :)

टारझन's picture

28 Jan 2010 - 10:45 pm | टारझन

आरारारारारारा =)) =)) =)) =)) =)) =)) =))

"लवंग" चे चित्र नेमके आणि रेशो मधे काढल्याबद्दल अभिनंदन !
नाय तर त्या माणसाने आधी आपल्याकडे एका विचित्र नजरेने पाहिले असते.. आणि नंतर हॅहॅहॅ .. जाऊन द्या आता काय बोलू ;)

- दिल दो

चतुरंग's picture

28 Jan 2010 - 11:37 pm | चतुरंग

टार्‍याने नेमके 'लवंगेवर' ..नाही नाही.. वर्मावर बोट ठेवलंन! ;)
(खुद के साथ बातां : रंग्या, विजूभाऊंचा घसा का बरं खवखव करत असेल? :?)

(वेलदोडा)चतुरंग

शाहरुख's picture

29 Jan 2010 - 1:31 am | शाहरुख

=))

हेच माझ्या चावट मनात आले होते..

ज्ञानेश...'s picture

28 Jan 2010 - 10:47 pm | ज्ञानेश...

शेवटी मी लवंगेचे चित्र काढले.
कामगाराने तत्परतेने लवंग आणली.
#:S

यावर एक भयानक जोक करण्याचा मोह आवरता घेतो आहे.
टारझनची वाट पाहूया! :>

शुचि's picture

28 Jan 2010 - 10:51 pm | शुचि

टार्झन - कहर करता बाई ........ मला कोणी ओवा देणार नाही इथे अमेरीकेत. पोट दुखायला लागलय (हसून हसून)

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

ज्ञानेश...'s picture

28 Jan 2010 - 10:52 pm | ज्ञानेश...

आईशप्पथ, काय टायमिंग आहे.

माझ्या आधी टारूची पोस्ट प्रकाशित झालीसुद्धा ! =))

भानस's picture

28 Jan 2010 - 11:25 pm | भानस

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2010 - 11:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी...

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2010 - 1:06 am | भडकमकर मास्तर

:)
बेष्ट...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

जे.पी.मॉर्गन's picture

29 Jan 2010 - 10:31 am | जे.पी.मॉर्गन

दिवस भारी सुरू झाला !

हहपुवा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jan 2010 - 11:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ ... विजुभाऊ आता कन्नडामधलं मिपा शोधाच!

अदिती