सप्रे काकांची माफी मागुन....
अंदाज स्टॅमिन्याचा, माझ्या मला न आला
हातात ग्लास माझा, घेता मला न आला
बाटलीच टाकीली मी, अन कोंबडी रिचवली
हँगओव्हर मात्र माझा, उतरविता मला न आला
रस्त्यात मोळळ्या मी, का हरविले स्वतःला
पोलीस एक माझा, धरण्यास हात आला
आगतिक पणाने, जामिन दीला तु माझा
घेईन दोन घोट, विसरण्या अपमान माझा
मी कोडगा किती पण, तरीही सुखावलो बघ
तल्लफ परत येता, थांबवता तुला न आला
पैजारबुवा