क- कवितेचा

उग्रसेन's picture
उग्रसेन in जे न देखे रवी...
14 Jan 2010 - 6:33 pm

आमी येतो मिसळपाववर
आन, चाळा म्हणून
क्लिक करतो,
लेख,कविता, आन पाककृतीवर.

आवडलेल्या वळींवर फिरत
राहतो कितीतरी येळ,
आलटून-पालटून
शांतपणे.

आन बांधाबांध करतो
मनातल्या प्रतिसादाची.

असह्य कोंडमारा होऊन
टाकता आला नाय प्रतिसाद तर,
लॉगऑफ करुन,
पाहत बसतो मॉनिटर
कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

हास्यअद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

14 Jan 2010 - 7:37 pm | प्रमोद देव

आवडली तुमची कविता.

असह्य कोंडमारा होऊन
टाकता आला नाय प्रतिसाद तर,

बाबुराव,प्रतिसाद का बरं टाकता येत नाही?

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

पाषाणभेद's picture

14 Jan 2010 - 8:24 pm | पाषाणभेद

कोंडमारा असा ठेवू नका मनात
घातक असत तस ||
काय वाटेल ते बोलून टाका
मनासाठी सेप्टी व्हाल्वसारख असत तस ||

लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

विदेश's picture

14 Jan 2010 - 8:30 pm | विदेश

प्रयत्नांती....?
प्रतिसाद...!