***********************************************
मेघांचे उत्सव रिमझिमणारे
जलदांचे अन गूढ चिंतन
समीर बावरा निरंतर गातो
आषाढातील जलदाच्या वेणा...
निळे सावळे घन थरथरणारे
दव-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे मिरवती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा...
गीत अधरीचे ते हुळहुळणारे
थिजलेल्या अन मौनाचे मंथन
मेघही वळले होवून आतूर
अन जलधारांची अक्षयवीणा...
ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजलो अन होवून हिरवे पाते
लंघून सार्या सीमा शब्दांच्या
एकटा कोरतो मौनाच्या लेण्या...
*****************************************************