नमस्कार...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
6 Jan 2010 - 11:37 am

राम राम मिपाकरहो,

कसे आहात सगळे..?

आज बर्‍याच दिवसांनी मिपावर येतो आहे..

तूर्तास माझ्या आयुष्यात पुष्कळ काळी घटना घडत आहेत, घडल्या आहेत..

लाईफची एक बाजू खूप जवळून पाहायला मिळत आहे.. सगळी स्वप्न नसतात, वास्तवही असतं आणि ते खूप कटू असतं याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहे.. आणि कटू वास्तव भोगयला आपली चूक असावीच लागते असं नाही याचाही पुन्हा एकदा पुरेपूर अनुभव घेत आहे..

परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की..

तूर्तास सगळी कामं बाजूला सोडून दोन दिवस फक्त मिपावर रहायचं म्हणतो आहे..

बाकी चालू द्या.. मिपा आपलंच आहे आणि त्याची काळजी माझ्यापेक्षा तुम्हा मायबाप मिपाकरांनाच अधिक आहे याची खात्री आहे..

पन्नासएक व्य नि आणि खरडी येऊन पडल्या आहेत. त्या सर्वांची नोंद घ्यायची आहे, उतरं द्यायची आहेत..

आंतरजालीय मराठी माणसांचा विजय असो,
मराठी आंतरजालाचा विजय असो,
मिपाधर्म वाढावा,जागवावा..

आपला,

(फिनिक्स पक्षाची उमेद असलेला) तात्या.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

टोळभैरव's picture

6 Jan 2010 - 11:51 am | टोळभैरव

आंतरजालीय मराठी माणसांचा विजय असो,
मराठी आंतरजालाचा विजय असो,
मिपाधर्म वाढावा,जागवावा..

:)

मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )

टारझन's picture

6 Jan 2010 - 11:56 am | टारझन

गुड टू सी यू तात्या :) तात्या रॉक्स !!

- (कधीतरीच हार्टली प्रतीक्रिया देणारा ) टार्‍या

सहज's picture

6 Jan 2010 - 11:59 am | सहज

तात्या गुड टू सी यू मॅन!

नववर्षाच्या शुभेच्छा! सगळे सुरळीत होवो ही सदिच्छा!

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jan 2010 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या, बरे वाटले.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

6 Jan 2010 - 8:21 pm | चतुरंग

प्रश्नातून लवकर सुटका होऊ दे!

चतुरंग

शेखर's picture

6 Jan 2010 - 10:49 pm | शेखर

प्रश्नातून लवकर सुखरुप सुटका होऊ दे!

कुंदन's picture

31 Jan 2010 - 1:31 pm | कुंदन

असेच म्हणतो.
तात्याची आणि इतरांचीही.

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2010 - 12:08 pm | विशाल कुलकर्णी

तुम्हाला इथे बघून खुप बरे वाटले तात्या. होतात कुठे?
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुनील's picture

6 Jan 2010 - 12:17 pm | सुनील

वेलकम ब्याक!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मोहन's picture

6 Jan 2010 - 12:19 pm | मोहन

सर्व काही लवकरात लवकर सुरळीत होवो. मीपा तुमचा तणाव कमी करण्यात हातभारच लावेल तेंव्हा येत जा शक्य होईल तेंव्हा.

मोहन

संजीव नाईक's picture

6 Jan 2010 - 12:25 pm | संजीव नाईक

जिवनात अशा प्रकारची संकटे येतात व जातात. आमच्या सर्व मिपा कराच्या शुभेच्छा आपला तणाव कमी करण्यास मदतीला तयार असेल
आपण पुन्हा प्रगट झाल्या बद्दल धन्यवाद
आपला खोडकर
संजीव

प्रभो's picture

6 Jan 2010 - 12:43 pm | प्रभो

तात्या लिखाण पाहून बरे वाटलं

वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!!

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

माधुरी दिक्षित's picture

6 Jan 2010 - 12:44 pm | माधुरी दिक्षित

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2010 - 12:52 pm | पर्नल नेने मराठे

तात्या ...आम्ही नाही पण मित्रांकडे तरी मन मोकळ करा, भार हलका होइल
चुचु

स्वाती२'s picture

6 Jan 2010 - 3:16 pm | स्वाती२

तात्या, हा कठीण काळ लवकर संपू दे. नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

विजुभाऊ's picture

6 Jan 2010 - 3:18 pm | विजुभाऊ

तात्या बरेच दिवसानी आलात.
गडबडी/ व्याप हे आहेतच.
काळानुसार सगळेच मार्गी लागते. जगण्याच्या बर्‍याच बाजू आहेत. बरे वाईट प्रत्येक ठीकाणी असतेच.
असो...
बरेच दिवसानी दिसलात बरे वाटले.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jan 2010 - 4:34 pm | प्रकाश घाटपांडे

आशां कालवती कुर्यात |
कालं विघ्नेन योजयेत |
तात्या हे ही दिवस जातील. सदिच्छा पाठीशी आहेतच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रदीप's picture

6 Jan 2010 - 4:39 pm | प्रदीप

म्हणतो.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

विकास's picture

6 Jan 2010 - 5:36 pm | विकास

असेच म्हणतो...

शुभेच्छा कायमच पाठीशी आहेत. काळजी घ्या.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

समंजस's picture

7 Jan 2010 - 2:30 pm | समंजस

असेच म्हणतोय तात्या.
पुस्तकातून नाही तर व्यवहारातून ज्ञान मिळवलयं तुम्ही. कठीण प्रसंगा वर सुद्धा तुम्ही मात करणार या बद्दल शंका नाही.

II विकास II's picture

6 Jan 2010 - 4:48 pm | II विकास II

तुम्हाला बघुन आंनद झाला. देव आहे सगंळ्यासाठी. देवाच्या दयेन बरे होइल सगळे.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jan 2010 - 5:06 pm | परिकथेतील राजकुमार

लगे रहो तात्या भाय !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सुमीत भातखंडे's picture

6 Jan 2010 - 5:37 pm | सुमीत भातखंडे

ग्रेट टु सी यू !!! बरं वाटलं.

(आर्डंट मिपाकर) सुमीत भातखंडे

स्मिता श्रीपाद's picture

6 Jan 2010 - 6:03 pm | स्मिता श्रीपाद

तात्या तुम्हाला पाहुन बरं वाटलं.. :-)
तुमच्या सगळ्या चिंता लवकरच दूर होवोत अशी त्या परमेश्वराला प्रार्थना..

-स्मिता

चित्रा's picture

6 Jan 2010 - 7:19 pm | चित्रा

तुमच्या सगळ्या चिंता लवकरच दूर होवोत.

जे.पी.मॉर्गन's picture

6 Jan 2010 - 6:24 pm | जे.पी.मॉर्गन

तात्या... तुमच्या लिखाणावरच्या प्रतिक्रिया म्हणजे तुमचं सुकृत (goodwill) आहे. मिपाकर घरातल्यासारखं प्रेम करतात तुमच्यावर. खूप मोठं पुण्य आहे तुमच्या गाठीशी. आम्ही सगळे आहोतच तुमच्याबरोबर.... सगळं छान होईल !

अविनाशकुलकर्णी's picture

6 Jan 2010 - 6:27 pm | अविनाशकुलकर्णी

श्री तात्या साहेब.नमस्कार..आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवुन आपल्या जिवनात..आनंद..शांति..प्रेम व सौख्य नांदो ..असे त्या दयाघनास साकडे.......
अविनाश
चटके सोसलेला...

छोटा डॉन's picture

6 Jan 2010 - 7:16 pm | छोटा डॉन

छ्या, तात्या आंतरजालावर नाही म्हणजे काही मजा नाही साला.

आज ऑनलाईन पाहुन, मनातले प्रकटन आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पाहुन बरे वाटले.
सर्व काही सुरळीत होईल, काळजी घ्या व हिंमत सोडु नका.
आमच्या सदिच्छा आहेतच सोबतील नेहमी.

"आऽऽऽल इज वेल " हे गाणे गुणगुणा कधीमधी सहजच विरंगुळा म्हणुन ...

------
छोटा डॉन
आमचे भांडण विठ्ठलाशी नाहीच, ते आहे त्याच्याभोवतीच्या दिडदमडीचे राजकारण न कळणार्‍या बडव्यांशी !

विनायक प्रभू's picture

7 Jan 2010 - 10:05 am | विनायक प्रभू

इज गोइंग टू बी वेल.
टेक इट इझी तात्या.

रेवती's picture

6 Jan 2010 - 7:21 pm | रेवती

अरे वा!! तात्या तुम्हाला पाहून आनंद झाला!
मिपावर आपले स्वागत आहे. मिपा आपलच आहे.;)

रेवती

हा कठीण काळ लवकर संपू दे. आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवु दे.. आणी आमचे बिनधास्त मस्त तात्या आम्हाला लवकर परत बघायला मिळू देत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2010 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा कठीण काळ लवकर संपू दे. आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवु दे.. आणी आमचे बिनधास्त मस्त तात्या आम्हाला लवकर परत बघायला मिळू देत.

अगदी असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

6 Jan 2010 - 8:14 pm | अक्षय पुर्णपात्रे

लवंगीतै आणि श्री बिरुटेंप्रमाणेच म्हणतो. आपण ज्या विवंचनेत असाल त्यातून लवकर बाहेर पडू दे.

शाहरुख's picture

6 Jan 2010 - 11:05 pm | शाहरुख

लवंगीतै, श्री. बिरुटे आणि अक्षय* प्रमाणेच म्हणतो..सदिच्छा !!

*मी आणि अक्षयने एकमेकाना अरे-तुरे करायचे ठरवले आहे.

विकास's picture

6 Jan 2010 - 10:09 pm | विकास

काळ परिक्षा घेत असतो.

यावरून "मनाच्या श्लोकातील" थोडे वेगळे आठवले:

सदा सर्वदा देव सन्नीद्ध आहे |
कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे ||
सुखानंद आनंद कैवल्यदानी|
नुपेक्षीकदा रामदासाभिमानी ||

अर्थात, ज्याचे जळते त्यालाच कळते, या न्यायाने स्वतःच्या संकटातून जाताना जे काही करावे लागत असते, ते "अल्प धारीष्ट" म्हणणे "धार्ष्ट्याचे" ठरेल. पण एकदा का त्यातून बाहेर पडलो की जणू काहीच झाले नव्हते असे वाटते. जसे डोकेदुखी,दाढदुखीचे अथवा पायात काटा गेल्यावर काहीच सुचत नाही पण एकदा का ते दुखणे थांबले की असे काही झाले होते का, हे पण आठवावे लागते...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Jan 2010 - 8:57 pm | डॉ.प्रसाद दाढे

व्वा तात्या, तुम्हांला पाहून फार आनंद झाला. एकंदरीत सध्या सगळ्यांनाच काही ना काहीतरी विवंचना आहेत असे दिसतंय.. ग्रह नाराज असतील!
काही मदत हवी आहे का?

पाषाणभेद's picture

6 Jan 2010 - 10:22 pm | पाषाणभेद

दिस जातील दिस येतील, भोग सरल, सुख येईल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

पाषाणभेद's picture

6 Jan 2010 - 10:22 pm | पाषाणभेद

दिस जातील दिस येतील, भोग सरल, सुख येईल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

मी-सौरभ's picture

7 Jan 2010 - 11:44 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

टुकुल's picture

6 Jan 2010 - 10:24 pm | टुकुल

तात्याभाय,
वेलकम बॅक.. तुम्हाला परत बघुन लई आनंद झाला !!

--टुकुल

निमीत्त मात्र's picture

6 Jan 2010 - 10:32 pm | निमीत्त मात्र

संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी.

तुमच्यावर आलेला कठीण काळ/संकट हे वैयक्तिक, खाजगी असेल तर सांगितलं नाही तरी चालेल. पण अश्या परिस्थीती उमेद कशी टिकवून ठेवलीत आणि कशी मात केलीत (ती तुम्ही करालच अशी खात्री आहे) हे प्लिज नक्की सांगा. आम्हालाही त्याचा उपयोग होईल.

तुमच्यावर आलेला कठीण काळ हा लवकरच संपू दे ही प्रार्थना!

धनंजय's picture

7 Jan 2010 - 4:47 am | धनंजय

वाईट प्रसंग असेल तर त्यातून निभाव लागो ही सदिच्छा आणि वर्ष सुखाचे जावो, म्हणून शुभेच्छा.

Nile's picture

7 Jan 2010 - 7:47 am | Nile

वाईट प्रसंग असेल तर त्यातून निभाव लागो ही सदिच्छा आणि वर्ष सुखाचे जावो, म्हणून शुभेच्छा.

वैशाली हसमनीस's picture

7 Jan 2010 - 6:48 am | वैशाली हसमनीस

तात्या,मि.पा.वर आपल्याला बघून बरे वाटले.आपल्या आयुष्यातील कठीण काळ सरो व नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, आनंद,शांती,भरभराट घेऊन येवो हीच शुभेछा.

हर्षद आनंदी's picture

7 Jan 2010 - 7:10 am | हर्षद आनंदी

श्री रा रा तात्याराजेसाहेब,

आपणास पुनश्च मिसळपावाचा आनंद घेताना पाहुन, मन प्रसन्न जाहले.

महोदय, संकटे, अडचणी म्हणजे जीवनाचा अर्क, ते नसतील तर जगण्यात मजा ती काय? प्रत्येक अडचण तुमची ताकद वाढविण्यासाठी दिलेली पायरी असते, पायरी जेवढी उंच तितकी ताकद जास्त.. म्हणून लगे रहो.

तुम्ही नसल्यामुळे बरेच दिवस मिपाचे मुखपृष्ठ कोरडे राहीले, आता तरी कोण्या लावण्यवतीच्या छायाचित्राने त्यावर बहार येऊदे.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

क्रान्ति's picture

7 Jan 2010 - 7:37 am | क्रान्ति

रातभरका है मेहमां अंधेरा
किसके रोके रुका है सवेरा?
जीवनाचं अविभाज्य अंग असलेल्या संकटांपासून उज्वल भविष्याकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

क्रान्ति
अग्निसखा

"परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.."
ये हुइना बात/
देव दयेने आणि प्रभु कृपेने आपल्याला हे संकट पेलण्याची शक्ती नक्कीच मिळेल यात शंका नाही. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम आपल्या पाठीशी आहेत.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बरेच दिवस मिपावर मन लागत नव्हते. आज परत एकदा आपले लिखाण बघुन खुपच आनंद झाला.
कटु अनुभवातुन जे काही शिकायला तुम्हाला मिळाले. ते अनुभवाचे बोल लिहा एकदा मिपावर.

वेताळ

आनंदयात्री's picture

7 Jan 2010 - 10:53 am | आनंदयात्री

नमस्कार तात्या.
बळ तुमच्याकडे आहेच, परमेश्वर आपल्याला योग्य रस्ताही दाखवो.

सुधीर काळे's picture

7 Jan 2010 - 11:30 am | सुधीर काळे

तात्यासाहेब, तुम्ही सुखरूप आहात यातच सारे आले. आता जरा आराम करा.
तुमची उणीव मला तर भासलीच पण सगळ्यांनाच भासली. ही तुमची खरी पुण्याई!
तुम्हाला मनःपूर्वक शुभाशिर्वाद.
------------------------
सुधीर काळे, Back to Jakarta on 6th!
जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!

सुधीर काळे's picture

7 Jan 2010 - 11:30 am | सुधीर काळे

तात्यासाहेब, तुम्ही सुखरूप आहात यातच सारे आले. आता जरा आराम करा.
तुमची उणीव मला तर भासलीच पण सगळ्यांनाच भासली. ही तुमची खरी पुण्याई!
तुम्हाला मनःपूर्वक शुभाशिर्वाद.
------------------------
सुधीर काळे, Back to Jakarta on 6th!
जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!

अरुण वडुलेकर's picture

7 Jan 2010 - 11:33 am | अरुण वडुलेकर

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभं भवतु

वाहीदा's picture

7 Jan 2010 - 12:36 pm | वाहीदा

शेअर मार्केट ची बाजी कशी जिंकवी हे तुमच्या कडूनच शिकावे ..
और वैसे भी हारकर भी जितने वाले को बाजीगर कहेते हैं ! :-)

तुम्हाला पूर्ववत मिपा वर पाहून आनंद झाला ..Mipa was feeling Blue without You .
~ वाहीदा

विदेश's picture

7 Jan 2010 - 12:41 pm | विदेश

या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की..

एक्दम्बेष्ट!
.....यालाच जीवन असे म्हणतात!

देवदत्त's picture

7 Jan 2010 - 11:14 pm | देवदत्त

तात्या, पुन्हा तुम्हाला पाहून आनंद झाला. :)

नाखु's picture

9 Jan 2010 - 9:06 am | नाखु

मराठि आंतरजालाचा "सखा,मित्र्,संस्थापक आणि मह्त्वाचे "संवर्धक" तात्यासाहेबांस गणराया हजार बाहूंचे बळ देवो हिच प्रार्थना...

हजार बाहू (समस्त मिपाकर)

एक छोटा हित चिंतक

प्रशु's picture

9 Jan 2010 - 1:54 pm | प्रशु

तात्या आम्हि आपल्या सोबत आहोत.....

संजय अभ्यंकर's picture

9 Jan 2010 - 11:33 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मॅन्ड्रेक's picture

10 Jan 2010 - 6:25 pm | मॅन्ड्रेक

आम्ही आपणांस सुयश चिंतितो.

अभ्यंकर परिवार.
at and post : Xanadu.