द्विधा

गिरिजा's picture
गिरिजा in जनातलं, मनातलं
2 Jan 2010 - 9:44 pm

(काल्पनिक)

"मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?"

"काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.."

"काय पण म्हणजे?"

"बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.."

------------------------------------------------------------------------------------------------

"जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये"

"हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.."

"अस्सं?"

"हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.."

"हा! well.. that is like an additional thing.. a perk to me.. पण ते काही कारण नाहीये.. मला जिथे कुठे माझ्या करिअर साठी चांगली संधी मिळेल तिथे जायची माझी तयारी आहे.."

"हम्म.. समजतंय.."

""

------------------------------------------------------------------------------------------------

"हे बघ.. सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं.. शिक्षण.. नोकरी.. लग्न.. मुलं-बाळं.. त्यांची शिक्षणं.. लग्न....."

"अगं बास.. कळलं.."

"कळलं नाही तुला.. कळतच तर नाहीये.. आता जे करायला हवं ते करत नाहीएस.. मनाप्रमाणे शिकू दिलं ना.. आता आमचंही ऐक जरा.."

"अगं पण.."

"पण बिण काही नाही.. आपण नाव तरी नोंदवू या.. मुलं बघू या तरी.. तुला पसंद नसेल तर आम्ही काही बळजबरी करणार आहोत का?"

"हा! ते शक्य नाही.. पण मी म्हणतेय.. कशाला हा अट्टाहास? मिळालं कोणी.. आवडलं कोणी.. करावसं वाटलं लग्न तर करावं.. उगीच काय!"

"पुन्हा तेच.. सांगितलं ना.. वेळच्या वेळी झालं की बरं असतं.. समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर काय!"

"बासच!"

""

------------------------------------------------------------------------------------------------

"अगं आत्या, आत्ता ही नाही नाही म्हणतेय.. बघ उद्या तुमच्यासमोर एखाद्याला आणून उभं करेल म्हणेल.. घ्या.. हा तुमचा होणारा जावई.."

"exactly! मी हेच सांगतेय तिला कि कोणी आवडला तर नक्की करेन.. पटलं पाहिजे न पण!"

""

------------------------------------------------------------------------------------------------

"तुझे बाबा आता रिटायर होतील.. काही वर्षांनी.. मग तू काय करणारेस?"

"म्हणजे?"

"अगं, म्हणजे मग काय पुढे?"

"एक मिनिट.. ते रिटायर झाले की ते काय करणारेत असं त्यांना विचारायचं का तुला? तू चुकून मला विचारतेयेस का?"

"अगं.. तुझंही शिक्षण होईल आता.. मग पुढं...."

"सांगितलं कि तुला.. जॉब किंवा पुढे शिकेन.. depends on what kind of opportunities I get.."

"तुझ्यासाठी मुलं बघायला लागायचं असं आम्ही ठरवलंय.."

""

"तुझ्याशी बोलतेय मी.."

"हो. ऐकलं.. ठरवलेय! मग ठीके! बघा"

"अरे वाह! चक्क तयार झालीस.."

"hello.. मी म्हटलं तुम्ही ठरवलंय तर बघा.."

"म्हणजे? लग्न काय आम्हाला करायचंय? आम्ही नाव नोंदवणार.. मुलगा तू पसंद केलास कीच पुढचं.."

"बरं.."

"अशी कशी ग तू.. तुझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली.. एवढंच काय.. तुझ्या सगळ्या लहान मोठ्या बहिणींची सुद्धा झालीएत.. लोकं आम्हाला विचारतात.."

"लोकांना नाहीत उद्योग.."

"हो तुलाच तेवढे उद्योग आहेत.. बाकी सगळे निरुद्योगीच आहेत.. तुलाच काय ते तेव्हढ कळतं.. बाकीच्यांना अक्कलच नाही ना.."

"आवरा!"

"............." (काही ना काही बोलणं चालू आहे..)

""

"............."

""

......

------------------------------------------------------------------------------------------------

"तुझी अशी इच्छा आहे का की या वयातही तुझ्या बाबांनी तुझ्या भविष्याची काळजी करत बसावं?"

"काळजी? कसली?"

""

"अगं.. कसली?"

""

"ओह.. लग्न and all? तेवढंच ध्येय आहे का आयुष्यात? की त्याचा विचार करत आत्ता समोर असलेली संधी दुर्लक्षित करायची?"

"अगं.. लग्न झालं की तुला काय कोंडून ठेवणारे का? कर ना नंतर.."

"शक्य नाही कोंडून ठेवणं.. पण प्रश्न हा आहे की का त्याच्या मागे लागलीएस हात धुवून.."

"आपण शेवटी मुलीकडचे आहोत.. उशीर झाला तर मग अपेक्षा कमी कराव्या लागतील.. हवा तसा मुलगा मिळणार नाही.."

"अपेक्षा.. नाहीच्चेत पण माझ्या काहीच.. बस वागायला बोलायला नीट असला.. समोरच्याला रिस्पेक्ट देणारा असला.. आणि चारचौघात तमाशा न करणारा असला की बास.. आणि जो समोरच्याच्या मतांचा आदर करतो, त्याला रिस्पेक्ट देतो त्याच्यात इतरही बर्याच क्वालीटीज आपोआप च येतात.."

"बर.. आणि कोणत्या व्यवसायातला पाहिजे? तुझ्यासारखं शिक्षण कि बाकी काही?"

"doesn't matter.."

"आणि एकत्र कुटुंब की ..."

"आई.. काय नाव नोंदणीचा फॉर्म भरतेयेस का!?"

"नाही.. विचारून ठेवते.. ते तुझ्या काकांच्या शेजारी राहतात न.. त्यांचा बहिणीच्या जावेचा मुलगा लग्नाचा आहे.. तर तो आहे सी.ए. म्हणजे तुझं आणि त्याचं शिक्षण वेगळं.. तर..."

"आणि हे तुला कुठून कळलं?"

"अगं.. परवा गेलेले न काकांकडे.. तेव्हा ते आलेले.. मग असाच विषय निघाला की आता तुझे शिक्षण होत आलाय.. मग मुलं बघताय का.."

"तू काय सांगितलं त्यांना?"

"मी काही नाही.. म्हटलं.. तिच्या बाबांशी बोला.. तेच काय ते सांगतील.."

"वाह! मग ठीके..."

""

"पण मग हि extra ची माहिती कुठून मिळाली म्हणे?"

"अशीच विचारून ठेवली..."

:-o "बर!"

------------------------------------------------------------------------------------------------

(तिच्या डायरी मधलं एक पान..)
कधी कधी वाटतं, म्हणताहेत एवढं तर करून टाकावं लग्न. adjustment / compromise तर आयुष्यात नेहमीच करावं लागतं. मग काय बिघडलं? पण एवढं मागे का लागायचं? एकदा हेच म्हणतात, नशिबात असेल तेच आणि तेव्हाच मिळतं. हो न? मग मिळेल न नशिबात असेल तेव्हा. आणि मुलीची बाजू, मुलीची बाजू काय? एवढं helpless का वाटतं यांना? आणि रिस्क कुठं नसते? कुठलीही गोष्ट आयुष्यात अनपेक्षितपणे घडू शकते. जोवर आपण कुणाच्या अध्ये-मध्ये नाही, कोणाचं नुकसान करत नाही, तोवर का कोणाला घाबरायचं? जर आयुष्य सुखात चालू असेल तर कशासाठी हाताचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं? हां, आता अचानकपणे कोणी आलंच आयुष्यात तर त्याबाबतीत विचार नक्की करेन मी पण जे चाललाय ते चालू द्या ना सुखाने.
कधी कधी वाटतं, एवढं केलं आई-बाबांनी आपल्यासाठी, मी त्यांची एक साधी गोष्ट ऐकू शकत नाही? पण मला वाटतं, मी पुढे शिकून, स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि काहीतरी fundu करेन ना, जेव्हा आख्खं जग माझं कौतुक करेल, तेव्हा त्यांना किती अभिमान वाटेल माझा. पण त्यांना हे का कळत नाही की या सगळ्यासाठी मला त्यांची गरज आहे. त्यांच्या सपोर्ट ची. अशा वेळेस मला "सरीवर सर" मधली मधुरा वेलणकर आठवते. तिलाही हेच हवं असतं घरच्यांचा सपोर्ट. खरंच आपल्या माणसांचा सपोर्ट असेल तर कोणीही काहीही करू शकतं. जो सपोर्ट माझा नवरा मला लग्नानंतर देईलच असा हे म्हणताहेत, तोच हे का देत नाहीत? मान्य- वय, आजारपण, मृत्यू - अटळ असणारा. ते गेल्यानंतर माझं काय होईल, कसं होईल? म्हणून नवरा? नवरा खूप वर्ष जगेल याची काय guarantee? थोडक्यात "कसं होईल, काय होईल" हा प्रश्न कायमच राहणारे. ती रिस्क तर असेलच. मग त्यापेक्षा स्वत: जर मी सक्षम बनू पाहतेय तर त्याला का नाही सपोर्ट? त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी काय वाट्टेल ते achieve करू शकते. खरंच.

.......................................
http://www.man-udhaan-vaaryaache.blogspot.com/ येथून

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 Jan 2010 - 12:11 am | प्राजु

शेवटचा पॅरा.. माझ्या मनातला आहे.
आवडले लेखन.
निवांतपणे तुझा ब्लॉगही वाचेन.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

jaypal's picture

3 Jan 2010 - 10:03 am | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भडकमकर मास्तर's picture

3 Jan 2010 - 4:32 pm | भडकमकर मास्तर

लेखन आवडले..
तेवढा सरीवर सरीचा उल्लेख सोडून..
तो अति ओव्हर रेटेड सिनेमा होता ...

जे.पी.मॉर्गन's picture

4 Jan 2010 - 12:42 pm | जे.पी.मॉर्गन

छान लेख गिरीजा.... एकाच मुद्द्यावर असले तरी प्रसंगांचं वैविध्य छान आहे.

फक्त करियर हवे? लग्न, संसार, मुलबाळं नकोच?

सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं.. शिक्षण.. नोकरी.. लग्न.. मुलं-बाळं.. त्यांची शिक्षणं.. लग्न....."

फार काही चुकीचे आहे का? लग्न अजिबातच करायचे नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे.

घरचे सपोर्ट करतीलही पण जेव्हा द्विधा मनस्थितीतून बाहेर येउन ठाम निर्णय घरच्यांना समजवून सांगेल कथानायीका.

गिरिजा's picture

5 Jan 2010 - 11:08 am | गिरिजा

घरचे सपोर्ट करतीलही पण जेव्हा द्विधा मनस्थितीतून बाहेर येउन ठाम निर्णय घरच्यांना समजवून सांगाल.

"काल्पनिक" असं लिहिलं आहे वर :-|

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

शाहरुख's picture

5 Jan 2010 - 11:22 am | शाहरुख

काल्पनिक आहे ते ठिक आहे..पण सहज-जींच्या या प्रश्नाचे उत्तर वाचायला आवडेल.

फार काही चुकीचे आहे का? लग्न अजिबातच करायचे नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे.

उत्तर मिळाले तर आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2010 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडले. शेवटचा पॅरा.. तर खासच.

-दिलीप बिरुटे

गिरिजा's picture

5 Jan 2010 - 5:56 pm | गिरिजा

उत्तर त्यातच लिहिलंय असं नाही का वाटत? शेवटच्या पॅरा मध्ये?

जर आयुष्य सुखात चालू असेल तर कशासाठी हाताचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं? हां, आता अचानकपणे कोणी आलंच आयुष्यात तर त्याबाबतीत विचार नक्की करेन मी पण जे चाललाय ते चालू द्या ना सुखाने.

आणि,

फार काही चुकीचे आहे का? लग्न अजिबातच करायचे नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे.

चुकिचं नाहीच आहे काहीच. पण प्रत्येक बरोबर गोष्ट प्रत्येकाला पटेल असं नाही. आणि समोरच्याला पटलं नाही म्हणजे त्याला ते चूक वाटतं असंही नाही. लग्न करायचं किंवा नाही असा प्रश्नच का विचारावा - असं म्हटलं तर? एखादी गोष्ट चुकिची नाही पण पटत नाही असं असेल तर ती पटल्यावरच केली पाहिजे ना? जर कोणी खरोखर आवडणारा मिळाला तर कदाचित या सगळ्याची (लग्न.. मुलं-बाळं.. त्यांची शिक्षणं.. लग्न.....) गरज वाटू ही शकेल आणि मग ते पटेल तेव्हा करावं. आता तुम्ही असंही म्हणु शकता की तेव्हा कदाचित उशीर झाला असेल (सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं..) - असुही शकतो. पण ते स्वतःच्या मर्जीनं केलेलं असेल त्यामुळे कोणावर दोष देता येत नाही त्याचा. त्याची जवाबदार तीच - हे खरं.

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

सहज's picture

5 Jan 2010 - 8:12 pm | सहज

>पण जे चाललाय ते चालू द्या ना सुखाने
दुसरे काही करायला गेले तर फक्त दु:खच मिळणार आहे असे काही गृहीतक?

बाकी प्रोक्रॅस्टीनेशन :-)

असो अपना अपना चॉईस! पाठींबा आहे.

गिरिजा's picture

5 Jan 2010 - 9:11 pm | गिरिजा

>पण जे चाललाय ते चालू द्या ना सुखाने
दुसरे काही करायला गेले तर फक्त दु:खच मिळणार आहे असे काही गृहीतक?

नाही. कदचित कळलं नाहिए मला काय म्हणायचं होतं त्यात. दुसरं केल्यावर कळेल की दु"ख आहे की नाही ते पण त्याच्या मागे लागण्यात आत्ता का त्रास करुन घ्यायचा? त्या अर्थी आहे की जे चालु आहे ते चालु द्या सुखानं..

थोडक्यात सांगायचं तर भविष्य भविष्यातच राहुन द्या.

बाकी प्रोक्रॅस्टीनेशन :)

हे कळलंं नाही. असो.

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------