व्यसन...!

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
31 Dec 2009 - 5:58 pm

मागच्या ३१ डिसेंबरला
गहिवरला होतास तू....
शेवटचा पेग संपवताना
डोळा मारून म्हणाला होतास तू ,
हा पेग आता शेवटचाच बरं का...!

मागच्या ३१ डिसेंबरला
कुजबुजला होतास तू
डोळ्यात तिच्या पाहून
कानात माझ्या बोलला होतास तू ,
आता पुढच्या वर्षी दुसरी बरं का...!

मागच्या ३१ डिसेंबरला
संकल्प केला होतास तू
आता मिपावर येणे बंद
'खव'त माझ्या टपकला होतास तू ,
दुसरं संस्थळ शोधणार बरं का...!

३१ डिसेंबर परत आलाय
मधुशाला विसरलास तू
वपु घेवून बसलाहेस
’ती’ ही बहुदा बदलली आहेस तू.,
मिपाचं व्यसन मात्र तसंच बरंका. :-)

नववर्षाच्या सर्व मिसळपावकरांना हार्दिक शुभेच्छा !

विशाल कुलकर्णी.

हास्यकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

31 Dec 2009 - 6:18 pm | मदनबाण

कोणीही काहीही करा मिपा व्यसन सुटणे शक्य नाही !!! :D

(कट्टर मिपाकर)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

jaypal's picture

31 Dec 2009 - 6:27 pm | jaypal

भावा १०,००० % खर आगदी मनातल बोललास.
कविराज विशाल भौ
"मागच्या ३१ डिसेंबरला
संकल्प केला होतास तू
आता मिपावर येणे बंद
'खव'त माझ्या टपकला होतास तू ,
दुसरं संस्थळ शोधणार बरं का...!"
लै भारी मीत्रा, लै भारी.
अशी किती संस्थळे आली आणि (विकली)गेली पण मिपा सम मिपाच
"एकमेवाद्वितीया"

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/