मागे ठाण्याला " मिपाकट्टा " जमला होता . त्यावेळेस मनात असुनही जाता आले नाही. कारण त्यावेळी मी कामावर होतो.
आणि काम सोडुन जाणे जमले नाही. त्यावेळी मोबाइलवरुन मी सगळ्यांची विचारपुस केली होती.
या वर्षी म्हणजे " मकरसंक्रांतीनिमित्त " पुण्यातील "मिपाकरांना " एकत्र येणे जमेल काय ?
मला दि. १७ जानेवारी ही तारीख योग्य वाटते. शिवाय "रविवार " असल्याने बहुतेकांना सुट्टी असेलच
मला वाटतं पुण्यातील "बालगंधर्व रंगमंदिरा मागील कफेटेरियात " जमुन तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम करावा
संध्याकाळी ६ वाजता तेथे जमणे सोइचे होइल असे मला वाटते.
तरी क्रुपया पुण्यातील " मिपाकरांनी " आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. त्यानिमित्ताने माझी इतरांशी ओळख होइल.
जमलतर तिथल्याच मिसळपावाची चव चाखता येइल.
" आपला हरकाम्या "
आपण माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधु शकता माझा भ्रमणध्वनी क. ९९२२९९४९३७ हा आहे.
प्रतिक्रिया
30 Dec 2009 - 12:11 am | पांथस्थ
बेंगळुरकरांन्नो,
मिपा कट्टा बेंगळुरला झाल्याचे ऐकिवात नाहि (हे माझे अज्ञान असल्यास माफी असावी :P ). मला बेंगळुरमधील मिपाकरांना भेटायला आवडेल. बेंगळुरमधे कोण कोण असते???
हरकाम्या तुमचा पुण्याचा धागा असा बेंगळुरकडे ओढल्याबद्दल माफी असावी पण राहवले नाहि :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर