शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा. तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कपाळ व हाताची गाठभेट घातली व बाइक सरळ परत वळवली.
विराटगडाच्या पायथ्याशी हे म्हसवे गाव आहे. हा भाग जावळी तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे. त्यावर ह्या वटवृक्षाची माहिती लिहिलेली आहे. सरकारी कृपेमुळे तो बोर्ड तर एकदम सुव्यवस्थित (? ) आहे. फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे. त्यामुळे काय लिहिले आहे ते वाचण्यासाठी कूटलिपी तज्ज्ञ अशा कोणी मिपाकराची मदत घेता येईल असा विचार करून सर्वात आधी त्या बोर्डाचाच फोटो काढून घेतला. एका गावक-याकडून कळलेली माहिती अशी:
म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातन काळापासून आहे. ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे. एकाच वटवृक्षाच्या पारंब्यांतून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहिले आहे. मूळ वृक्ष काही वर्षापूर्वी पडला पण त्याच्या पारंब्यांतून जे वृक्ष तयार झाले त्यांनी आपला डोलारा सांभाळून ठेवला आहे. सन १८८०-८५ च्या आसपास ली वॉर्नर नावाच्या एका ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला. आता सरकारने हे स्थळ संरक्षित म्हणून घोषित केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषिद्ध आहे. कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे. त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही. तो गावकरीदेखील आत जायला फारसा इच्छुक वाटत नव्हता. कारण पकडले गेल्यास मजबूत दंड होतो असे त्यानेच सांगितले. बाहेरून चक्कर मारल्यावर लक्षात आले की सरकारने खरोखरच प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे. आता वडालादेखील बाहेरून पाणी लागते हे माझ्यासाठी जरा नवीन होतं. अहो जो वृक्ष शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी? हे म्हणजे सूर्याला आपली टॉर्च देऊन "अंधारात जपून जा रे" असं म्हणण्यासारखंच आहे. असो. हा असा सरकारी खेळ. पण तो आपला विषय नाही.
जास्त माहिती घेतल्यावर असे कळले की क्षेत्रफळाच्या बाबतीत हा आशिया खंडातील दुस-या नंबरचा वटवृक्ष आहे. गुगलबाबा म्हणतो की ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगालमध्ये (कलकत्त्याला) आहे. आणि ह्यापेक्षा लहान (तीन एकर पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच विराटगडाच्या पायथ्याजवळ आहे . त्या सरकारीबोर्डनुसार हाच भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे. आता खरंच कुठला मोठा हे ते दोन वृक्षच जाणोत. असो. वादात न पडता मी पाहिलेल्या वृक्षाचे फोटो खाली देत आहे.
***************************************************
आगामी आकर्षण : - अजिंक्यतारा व सज्जनगड वृतांत.
प्रतिक्रिया
21 Dec 2009 - 4:48 pm | टारझन
व्वा !! लेखकाचे शिर्षक असे हवे होते "उठवा लुफ्त महावटवॄक्षाचा "
बाकी ठिक :)
|| बाजे ||
21 Dec 2009 - 4:58 pm | घाटावरचे भट
श्री राजे-जी,
लेख चांगला आहे पण त्रोटक वाटला. झाडाचे अजून काही फोटो टाकले असते किंवा त्या परिसराचा गूगल नकाशा टाकला असता तर आम्हाला तो परिसर समजण्यास मदत झाली असती आणि आपल्या वर्णनाशी ते फोटो ताडून पाहाता आले असते. अशा पुरातन वटवृक्षांच्या जतनासाठी वनखात्याने काही SOP विकसित केली आहे काय? याबद्दल अधिक माहिती गोळा केल्यास एक छान लेखमाला होऊ शकेल. या संदर्भात वनखात्याशी पत्रव्यवहार करून आपण जर काही लेख येथे प्रसिद्ध करू शकलात तर उत्तम होईल.
- भट
21 Dec 2009 - 5:06 pm | श्रावण मोडक
घाटावरच्या भटांशी पूर्ण सहमत आहे मी. राजे, आपण सुजाणतेने याची नोंद घ्यावी आणि पुढचे लेखन करावे ही अपेक्षा!!!
21 Dec 2009 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय श्री. घाटावरचे भट ह्यांच्याशी पुर्णपणे सहमत आहे.
माननीय श्री. राजे यांच्या उपरोक्त लेखात अशी कोणतीही प्रमाणे दिसत नाहीत तर ते त्यांनी केलेले आरोप आहेत. शिवाय त्यांनी ते आरोप केले असल्याचेही नाकारले होते असेही ऐकिवात आहे. त्यामुळे त्या आरोपांना कितपत महत्व देणे गरजेचे आहे हे देखिल ठरवणे आवश्यक आहे. त्याशिवाय मोडक म्हणतात तसे एसओपी नक्की काय आहे हे समजुन घेणे अश्या चर्चा करण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्याखेरीज उगीचच मुद्दे रेटत बसण्यात मलातरी हेकेखोर पणाशिवाय काहीच अर्थ वाटत नाही.
बाकी लेख वाचला. चांगले वाटले. लेखात जे लिहिले आहे ते कितपत विश्वासार्ह वाटते, त्यात आजपर्यंत समोर न आलेले/ दडवलेले कोणते मुद्दे आहेत याचाही अंतर्भाव केला असता तर अजुन बरे वाटले असते. त्यायोगे ह्या स्थळास भेट किंवा कसे असा निर्णय घेणेही सोपे गेले असते.
कण्हेरी
21 Dec 2009 - 5:07 pm | प्रसन्न केसकर
हा भाग मुळात जावळी तालुक्यात होता. तोच शिवकालीन `येता जावली जाता गोवली' वाला हा भाग. या भागात अगदी २० व्या शतकापर्यंत घनघोर जंगल होते.
माझी स्मरणशक्ती बरोबर असेल तर (आत्ता या क्षणी ली वॉर्नरचे पुस्तक जवळ नाही आहे) या जंगलाचे सर्वेक्षण करताना ली वॉर्नर याला म्हसवे परिसरात वडाची पाच अतिप्रचंड झाडे दिसली. त्यापैकी सध्या दोन की तीनच शिल्लक आहेत.
ली वॉर्नरने त्या झाडांची मोजमापे घेतली तेव्हा लक्षात आले की तेव्हा (साधारणता १९ व्या शतकाच्या अखेरीस) त्यापैकी एक झाड अशिया खंडातल्या मोजमापे करुन डॉक्युमेंटेशन केलेले सर्वात मोठे झाड आहे. त्यानंतर प.बंगालमधील तुलनेने नवीन झाडाचा शोध लागला.
ली वॉर्नरच्या शोधानंतरही अनेक वर्षे या झाडाचे जतन करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न झाले नाहीत. सातार्यातील काही संस्थांनी आग्रह धरल्यावरुन सरकारने तेथे बोर्ड लावला व प्रवेश बंद केला. सातार्यातील काही संस्थानी हे इकॉलॉजिकल मॉन्युमेंट त्यांच्या ताब्यात द्यावे, ते त्या ठिकाणाची काळजी घेतील असा प्रस्तावही मांडला आहे असे नुकतेच समजले.
21 Dec 2009 - 5:17 pm | विनायक प्रभू
मस्त फोटो
अवांतरः तुम्हाला कुणाची स्पॉन्सरशिप मिळाली आहे का?
21 Dec 2009 - 5:18 pm | विनायक प्रभू
मस्त फोटो
अवांतरः तुम्हाला कुणाची स्पॉन्सरशिप मिळाली आहे का?
21 Dec 2009 - 5:19 pm | अवलिया
श्री रा रा राजेजीसाहेब
आपण हल्ली फार भटकता आणि भटकुन भटकुन चित्रं गोळा करुन आमच्या माथी मारता हे पाहुन आमच्या एका मिळेल तिथुन पुस्तकं गोळा करुन त्यांचे भुक्कड परिक्षण वाचकांच्या माथी मारणा-या एका मित्राची आठवण आली.
तुम्ही अनेक जागी फिरता, अनेक गावाचे पाणी पिता, केल्याने देशाटन मनुष्यास शहाणपण येते असे म्हणतात. पण आपल्या बाबतीत आपला बालिशपणा वाढत चालला आहे असे दिसते. दिवसागणिक आपल्या लेखनाचा, चित्रांचा दर्जा खालावत चालला आहे. शुद्धलेखनाविषयी तर बोलायलाच नको, पंण रहावत नाही म्हणुन सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, सुधरा.
त्याचप्रमाणे काहितरी पाहुन त्यावरुन स्वतःलाच रुचेल असे अंदाज बांधायची आपली पद्धत अत्यंत घृणास्पद आहे. जसे की
ही विहीर कदाचित पुर्वी तिथे कुणी रहात असेल त्यांनी खोदली असेल, आता तो प्रदेश संरक्षित झाल्याने तिथे वावर नसेल, पण म्हणुन ती विहीर वडाला पाणी देण्यासाठी खोदली आहे असा अंदाज बांधणे म्हणजे पो वरुन पोलीस असा धेडगुजरी संबंध जोडण्यासारखे विक्षिप्त आणि मठ्ठपणाचे होय.
अशा अनेक चुका आहेत पण तुम्ही आमचे मित्र म्हणुन जास्त लाज आणवत नाही. असो.
बाकी लेख नेहमी प्रमाणे छान !
भटकत जा ! लिहित जा ! आम्ही प्रतिसाद देत जावु !!
धन्यवाद.
--अवलिया
21 Dec 2009 - 5:26 pm | नंदन
नानाशी सहमत आहे. लेख वैज्ञानिकदृष्ट्याही किंचित अपुरा वाटला. आजच्या कोपनहेगन परिषद-ओबामा-ग्रीन हाऊस वायू इ.च्या दिवसांत हा विशाल वटवृक्ष किती C-O-O (कार्बन डायॉक्साईड. CO2 मधला 2 हा आकडा खाली कसा लिहायचा?) शोषून घेतो आणि किती O-O अर्थात ऑक्सिजन वातावरणात परत सोडतो याची साधारण आकडेवारी कळू शकेल का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Dec 2009 - 5:29 pm | श्रावण मोडक
साताऱ्यातील काही संस्थांनी याचे अध्ययन केल्याचे मागे ऐकले होते. त्यांच्याकडे ही माहिती मिळू शकेल. अर्थात, ते अध्ययन करताना त्यांनी एसओपीचे पालन केले होते की नाही हे मात्र तपासून घ्यावे लागेल!!!
21 Dec 2009 - 5:42 pm | अवलिया
श्री रा रा श्रावणजी मोडकजी साहेब आणि नंदनजी साहेब
या संदर्भात मी साता-याच्या गादीशी संबंधित असलेल्या काही व्यक्तिंच्या संपर्कात होतो, त्यांच्याशी झालेल्या देवाणघेवाणीतुन सी४, बी४ आणि ए४ या पद्धतीचे वायुउत्सर्जनाचे गणित वेगवेगळ्या ॠतुंमधे अनुभवण्यास येते. एक घनमीटर क्षेत्रात वृक्षाकडुन होणा-या परिणामाची गणना करुन एकंदर क्षेत्रात कमाल आणि किमान मर्यांदांचे प्रमाण गणिताने काढता येते अशा पद्धतीचे संशोधन स्वातंत्र्यपुर्व कालात झाले होते. याविषयावर एबीसी४ गणिताची कहाणी असा लेख लिहिण्याचा मानस आहे.
धन्यवाद.
--अवलिया
21 Dec 2009 - 5:47 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय श्री. अवलिया-जी गादीशी संबंधीत म्हणजे आपले 'मुरलीवाले' का ? आणि हो तो पत्रव्यवहार आपण इथे उपलब्ध करुन दिल्यास त्यातुन आमच्या सारख्यांना खुपच ज्ञान मिळेल असे वाटते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Dec 2009 - 5:33 pm | ब्रिटिश टिंग्या
श्री नंदन-जी,
आपल्या प्रतिसादात आपण सध्याचे वास्तव्य नमुद न केल्याने आपला प्रतिसाद अपुरा वाटला!
--------------
सध्या वास्तव्य : धायरी पुणे.
21 Dec 2009 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वरच्या सर्व निगेटीव्ह प्रतिसादांशी सहमत.
याशिवाय दोन क्रमांकाचा मोठा वटवृक्ष म्हणता तर किती मोठा आहे हा वृक्ष? यासाठी वृक्षाची जाडी मोजता का उंची? मीटरमधे पहिल्या क्रमांकाच्या वृक्षाच्या डायमेन्शन्स काय आणि या वृक्षाच्या डायमेन्शन्स काय? जगातला सर्वात मोठा वृक्ष कोणता, कुठे आहे? जगातला सर्वात मोठा वटवृक्ष कुठे आहे आणि किती मोठा आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
तेव्हा निष्कर्षः सुधारा आणि मगच लिहा.
अदिती
-----
स.मु. हास्टेल, ह.मु. माहीत नाही.
22 Dec 2009 - 11:14 am | विशाल कुलकर्णी
जर मी चुकत नसेन तर वटवृक्षाचा आकार ठरवताना त्याची जाडी किंवा उंची न मोजता त्याचा (त्याच्या पसरलेल्या फांद्या आणि पारंब्यांचा) एकंदर विस्तार विचारात घेतला जातो. बाकी तज्ञ मंडळी सांगतीलच.
राजेजी छान माहिती आणि फोटो. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Dec 2009 - 6:09 pm | दशानन
एक सामान्य मिपाकर म्हणून जे काहीवर चालले आहे ते पाहून शरम वाटत आहे.
मी माझ्या कुवती प्रमाणे तुम्हाला माहीती देण्याचा साधा सरळ प्रत्यत्न केला आहे. परंतू जे काही वर तुम्ही लिहले आहे ते पाहून आपला धागा आपणच उडवावा अशी अतीव इच्छा मज होत आहे.
अहो मी काही निसर्ग ह्या विषयातला तज्ञ नाही मला फिरावयास आवडते व जे सुंदर आहे ते माझ्या मोबाईल ने टिपणे हा आजकाल माझा छंद आहे, व फिरता फिरता जी माहीती मिळते ती येथे तुम्हाला वाचण्या करता देतो येवढेच.
पण वर उल्लेखनीय प्रतिसादामध्ये माझ्या लेखाचे जे तीन - तेरा वाजवले आहेत तुम्ही कंपुबाजांनी, त्याचा मी निषेध करुन ह्या पुढे येथे लेखन करावे की न करावे ह्याचा निर्णय घेणार आहे. असो,
तुम्हाला तुमचे प्रतिसाद लखलाभो.
आम्ही आमची लेखणी ठेवतो आता बाजूला.
सामान्य मिपाकरांना जर माझे लेख वाचायचे असतील तर माझ्या ब्लॉगला भेट देऊन तिकडे वाचू शकता अथवा मी नवीन वेबसाईट लवकरच युनीकोदातुन चालू करत आहे त्यात वाचता येतील.
धन्यवाद.
:(
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
21 Dec 2009 - 6:16 pm | अवलिया
श्री रा रा राजेजीसाहेब
असे करायचे नाही. एकदा लेख लिहिला प्रकाशित केला की वाचक मायबाप. जी प्रतिक्रिया देतील ती आनंदाने सहन करायची, लेख उडवायचा नाही. लेखन सोडायचे नाही.
बाकी तुमची इच्छा.
धन्यवाद.
--अवलिया
21 Dec 2009 - 6:19 pm | दशानन
अवलिया जी,
तुमचे विचार पटत आहेत मला.
तुम्ही म्हणता ते देखील बरोबर आहे.
पण गेल्या २०० लेखामध्ये मला शी खवचाट प्रतिक्रिया कधीच आली नाही त्यामुळे गोंधळलो एवढेच.
बाकी असो,
नवीन लेख लिहतोच आहे लवकरच मिळेल वाचायला.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
21 Dec 2009 - 6:23 pm | अवलिया
श्री रा रा राजेजीसाहेब
पुन्हा लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन.
धन्यवाद.
--अवलिया
21 Dec 2009 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
अतिसामान्य असा बदल सुचवु इच्छीतो.
आपण स्वांतसुखय लिहिता असा समज होता. प्रतिक्रीया यायला तर पाहिजेत वर त्या छान छान गोग्गोड गोंजारणार्या सुद्धा पाहिजेत, हा अट्टाहास कशासाठी ? लेख लिहिला की तो गंगेला समर्पीत केल्याच्या भावनेने प्रसिद्ध करावा. त्याचे पुढचे सगळे देवावर सोडून द्यावे.
मलाही निसर्गविषयातला फारसा गंध नाही.. तरीही त्याबाबत माझी अशी काही ठाम मतं आहेत तीच मी मांडली.. त्यांना कितपत महत्व द्यायचं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे..
शेवटी काय, कुणाच्या तरी आरवण्यानं उजाडल्याशी कारण म्हणतात ना, तद्वत बोंबलत हिंडून का होईना, उद्या कुणी छान निसर्ग माहिती देउ लागल्याशी कारण!
आधीच हे सुचले असते तर असले भयाण लिखाण वाचायचे तरी आमच्या नशिबात आले नसते.
तुमच्या सारखाच असा विचार काही अजुन लोकांनी केल्यास मिपा सर्वरवर अनंत उपकार होतील असे वाटते.
अच्छा म्हणजे आता ह्यापुढे अर्धा लेख झाला की खाली "पुढील लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा" अशी ओळ बघायला मिळणार तर.
असो...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Dec 2009 - 6:24 pm | दशानन
तुमच्याशी मला काही बोलायचेच नाही आहे.
पण असो,
कोणी तरी सांगितले आहेच निंदकाचे घर असावे शेजारी ;)
आम्ही आमच्यासाठी लिहतो.
तुम्हाला आवडत नसेल तर धागा उघडू नका.
प्लीज अवांतर नको.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
21 Dec 2009 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय श्री. राजे-जी,
व्यनीतुन उत्तर दिले आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Dec 2009 - 7:01 pm | श्रावण मोडक
कोणी तरी सांगितले आहेच निंदकाचे घर असावे शेजारी
अत्यंत वास्तविक विधान! परिकथेतील राजकुमारही असेच म्हणू शकतात बरं... ;)
21 Dec 2009 - 7:08 pm | अवलिया
श्री रा रा श्रावणजी मोडकजीसाहेब
हे विधान कुणीही म्हणु शकते. यासंदर्भात माझी एका मराठीच्या प्राध्यापकांशी चर्चा झाली होती. त्यावेळी मुळात ह्या म्हणीचा उगम कुठे झाला असावा याविषयी आम्ही चर्चा केली होती, त्याची एमपी३ फाइल तुम्हाला मेल करतो. त्यानंतर आमच्या घराशेजारी एक जण देवाची गाणी गात असतांना देव आपल्याला का भेटत नाही हे मला समजले आणि मी ते समजावुन सांगायला गेलो असता त्या गीतकार कम संगीतकाराने मला निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणुन वाटेला लावले तो प्रसंग आजही मला आठवत आहे, परंतु तेव्हा चलचित्रण करणारे यंत्र नसल्याने त्याचे चित्रिकरण होवु शकले नाही.
हे सर्व विस्तृतपणे सांगण्याचे कारण इतकेच की माझ्या मते वटवृक्षाच्या शेजारी कुणीही राहुन त्याची निंदा करु नये या हेतुनेच सरकारने तिथे जाण्यास मनाई केली असावी असे वाटते.
--अवलिया
21 Dec 2009 - 7:20 pm | प्रसन्न केसकर
कोणी तरी सांगितले आहेच निंदकाचे घर असावे शेजारी
यातलं कोणी तरी म्हणजे माझा तुक्या - माफ करा - आपले संत तुकाराम महाराज. (त्यांना माझा तुक्या म्हणल्यानं परत दंगा व्हायचा अन शांतताभंग ह्वायचा!)
21 Dec 2009 - 6:32 pm | प्रसन्न केसकर
सुचवतो.
अच्छा म्हणजे आता ह्यापुढे अर्धा लेख झाला की खाली "पुढील लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा" अशी ओळ बघायला मिळणार तर.
या ऐवजी शीर्षकालाच युआरएल बनवुन "हा लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा" अशी ओळ दिली तर कसे?
21 Dec 2009 - 6:21 pm | प्रसन्न केसकर
तिथे प्रतिसाद देता येतात काय?
21 Dec 2009 - 6:26 pm | दशानन
हो तिकडे प्रतिसाद देता येतात.
http://rajkiranjain.blogspot.com/ हा घ्या पत्ता.
http://www.mimarathi.net/ येथे वाचता येतील लेख.
पुनेरी जी तुमचे प्रतिसाद नेहमी अभ्यासावरुन असतात काही टवाळांच्यासारखे वरुन वरुन दिलेले नसतात त्यामुळे तुम्ही आपल्या प्रतिसाद देत चला मी वाचत आहेच.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
22 Dec 2009 - 10:37 am | निखिल देशपांडे
राजे जी तुमचे लेख नेहमी अभ्यासावरुन असतात काही टवाळांच्यासारखे वरुन वरुन आलेले नसतात त्यामुळे तुम्ही आपले लेख टाकत चला मी वाचत आहेच.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
22 Dec 2009 - 11:08 am | विशाल कुलकर्णी
श्रीमान राजेजी आपला हा उपक्रम अतिषय छान आहे. काही वर्षापुर्वी मीही अशाच एका पुरातन वटवृक्षाला भेट देवून आलो होतो. भंडारदरा आणि अकोले यांच्या मध्ये, भंडारदर्यापासुन साधारण ५०-५५ किमी अंतरावर पेमगिरी नावाचे एक स्थान आहे. तिथे हा ४ एकर व्यापलेला विस्तृत वटवृक्ष आहे. मी काही त्यावेळी फोटो घेवू शकलो नव्हतो, पण नंतर माझे एक स्नेही तिथे गेले होते, त्यांनी काढलेले हे काही फोटो...
श्री पेमाई देवीचे मंदीर...
तिथलाच हा एक फोटो आंतरजालावरुन साभार ....
याबद्दलचा दुवा... पेमगिरी
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Dec 2009 - 6:46 pm | II विकास II
तुम्ही लिहीत रहा.
आम्ही वाचत आहोत.
प्रतिक्रियांना वेळ नसल्याने देत नाही,.
21 Dec 2009 - 6:57 pm | कानडाऊ योगेशु
असाच एक वृक्ष बंगळुरहुन ३० कि.मी अंतरावर पण आहे.
पर्यटकांसाठी तो खुला असुन तिथे बर्यापैकी वर्दळ असते.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
21 Dec 2009 - 8:14 pm | jaypal
ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगालमध्ये (कलकत्त्याला) आहे. तो ईथे पहा.
लेख पारंब्या प्रमाणे लांबलचक न होता चांगला आणि आटोपशिर झाला आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Dec 2009 - 10:06 pm | मदनबाण
ठाण्यात सुद्धा असा एक मोठा वटवृक्ष आहे.(clariant कंपनी जवळ,कोलशेत रोड)
बाकी राजे आपले लेख आणि त्यावरती येणारे रसाळ( लिखाळ कुठे गेले बरं... :?) प्रतिसादांचे रस ग्रहण का काय म्हणतात ते ग्रहण करतोय... ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
21 Dec 2009 - 8:12 pm | विकास
लेख आणि माहीती दोन्ही आवडले. छायाचित्रे अजून असती तर आवडली असती पण त्यात सरकारी मर्यादा दिसत आहेत (आत जाता येत नसल्याने).
बंगाल मधील झाडाचा जो उल्लेख आला आहे, ते झाड कुठल्यातरी चित्रपटात आले असल्याचे आठवते पण चित्रपट आठवत नाही आहे. ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 Dec 2009 - 8:45 pm | प्राजु
छान.
लहानपणी शाळेच्या ट्रिप मध्ये, श्रवणबेळगोळा जवळपास कुठेतरी असंच एक वटवृक्ष पाहिल्याचे आठवले.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
22 Dec 2009 - 1:01 am | धनंजय
लेख-चित्रे छान वाटली.
(पण मागच्या आणि या लेखाच्या बाबतीत थोडा भांबावलेलो आहे. काहीतरी कळीचे समजले नसल्यासारखे वाटते आहे. कॉलेज कट्ट्यात कधीही विनोद थोडा डोक्यावरून गेला तरी खळखळून हसून टाकायचे माझे धोरण होते . म्हणून :-D स्मायली ठोकून देतो आहे.)
22 Dec 2009 - 1:32 am | Nile
हा हा हा. तुम्हाला सगळे कळले आहे हे सांगण्याची ही शैली जाम आवडली! ;)
आम्हाला मात्र काहीही न कळल्याने, "राजे अजुन येउ द्या, माहितीपुर्ण, रोचक, विकीपेडीयात भर तर पडतेच आहे, काळजी नको" इतकेच म्हणतो! :)
22 Dec 2009 - 9:34 am | ज्ञानोबाचे पैजार
राजे,
अहमद नगर मधे भंडारदर्या जवळ पेमगिरी नावाचे गाव आहे. या गावात सुध्दा असाच एक महावटवृक्ष आहे. ही जागा अतिशय रमणिय आहे. मुळ झाडाचा बुंधा प्रचंड मोठा आहे. या बुंध्या मधे सोन्याची कुर्हाड आहे अशी दंतकथा स्थानिक लोक सांगतात. झाडाचा विस्तार साधारण चार एकर आहे.
निजामशाहीची राजधानी असलेल्या या गावा मधे निजामी किल्याचे अवषेश पण जवळच पहायला मिळतात.
या दोन्ही ठिकाणांबद्द्ल फारशी माहिती उपलब्ध नाही.
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
22 Dec 2009 - 11:20 pm | दशानन
दुनिया घेऊन येते आपला धागावर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो.
उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;)
असो,
प्रतिसाद द्या.
=))
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
24 Dec 2009 - 12:13 pm | मृत्युन्जय
राजेजी भंपक लोकांच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष न देणे हेच उत्तम. हे लोक शिवाजी सावंतांनी म्रुत्युन्जय मध्ये कर्णाच्या भार्गवास्त्रावर वैज्ञानिक टिप्पणी नाही केली म्हणुन त्यांच्यावर देखील टीका करतील.
24 Dec 2009 - 2:09 pm | अविनाशकुलकर्णी
पारंब्यावर लटकवलेल्या पाटीवरील मजकुर वाचणा~यास बक्षिस द्यावयास हवे
25 Dec 2009 - 10:51 am | वेताळ
राजेनी परत एकदा अपुर्ण माहितीच्या आधारे हा लेख लिहला आहे.तिथे जावुन फिरुन व राहुन आला. परंतु त्या स्थळाची माहिती मात्र अपुर्ण करुन घेतली.अहो तिथे विहिर आहे ती त्या वटवृक्षाला पाण्यासाठी काढली आहे हे तुम्ही कसे काय छातीठोकपणे सांगु शकता?असे वाचल्यामुळे आमची छाती दडपुन गेली त्याचे काय?आणि विहिरीतुन वटवृक्षाला पाणी पुरवठा कसा होतो हे तुम्ही पाहिले आहे का? अशा लिखाणामुळे नवमिपाकरांची मती कुंठित होण्याचा धोका आहे. शेवटच्या छायाचित्रामध्ये एक मंदिर का घर दिसत आहे,ते त्या वटवृक्षाला बांधले आहे काय?असा ही प्रश्न मनाला पडला आहे.
तरी वरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडुन अपेक्षित आहेत.
वेताळ