भाशन. यत्ता चवतीतल

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
15 Dec 2009 - 9:22 pm

जरा मोकला झाल्तो तर कालपास्न ईचार करीत व्हतो .क लीवाच बर ?पन डोस्क्यान कई येचना.

रिंग रिंग रिंग रिंग रिंग .... मोबाईल वाजतवता.
'ह्या~लू ! बोल्तो कोन ?'
'बाला आर मना नाय वलीकलास ? मी चंद्या, बारके पाड्यानचा. '

झारकन डोस्क्यान वायर घुस्ली.

'हा बोल आर हायस कुट तू ? '
.........धा मिन्टानी फोन खाली ठ्येवला न डायरेक मना मत्मा गांधीच आटवले बोल.

चवतीत आसताना शिक्शन ईंन्स्पेक्टर समोर भाडखाउनं मत्मा गांधी वर भाशन दिल्लवत.
ज्याआयला भाशन आयकता आयकता ईंन्स्पेक्टर झीट येऊन खाली परलावता.

ईयत्ता चवतीचा वर्ग. मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.
ईंन्स्पेक्टर आले.
शिकवल्याप्रमान पोर ऊटली.
'येक सात नम~~~~स्ते'
'बसा बसा मुलांनो.' ईंन्स्पेक्टर म्हनला.

'मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा. मी त्याला गणीतातील काही प्रश्न विचारतो.'

'मिथन्या ऊट. ' मास्तर.
मी ऊबा रायलो. ४७ मार्क झेऊन सामाईत पयला आल्तो बोल.

'१७ गुणिले ८ कीती होतात ?' ईंन्स्पेक्टरन ईचारल.
'अं ...अं ...' माजी हातभर फाटली.
मना त १० परयंतच पाडे येत वते.

'येकशे चालीस ' मी ठोकल.

'एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वरगातला सगळ्यात हुशार मुलगा ना? हा चक्क एकशे चाळिस सांगतो.?' ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.

'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'
ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.

ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल
'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?'
'सांगा.' ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.
'चंद्रकांत ऊट. भाषण कर.' मास्तर न आदेश दिला.
चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.

'मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी.
२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.
गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.
ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.
आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले.तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल. आनी ते भारतात परत आले.

भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय
मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'

ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय. तो आरवा झाल्ता.
(गमतीन झ्या. यात महात्मा गांधीजीची कोनत्याव परकारे चेष्टा करन्याचा हेतु नाय.)
मिथुन काशिनाथ भोईर.

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

jaypal's picture

15 Dec 2009 - 9:35 pm | jaypal

आर्धा तास झलं हास्तुया.(भाषणाला बापुंना नाही)
आयला जबराच भाषण.ए बाल्या कुठ व्हतास रे येवरे दिवस.

( फक्त २ आक्टोबरला गांधीजी आठवतात त्यांच्या साठी)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अनामिक's picture

15 Dec 2009 - 11:07 pm | अनामिक

'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'

हा हा हा.... लै भारी रे बाला!

-अनामिक

मिसळभोक्ता's picture

15 Dec 2009 - 11:54 pm | मिसळभोक्ता

लई दिसानी आलास रं मिथन्या..

लई भारी..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज's picture

16 Dec 2009 - 7:00 am | सहज

हेच बोल्तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2009 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो

-दिलीप बिरुटे

कौस्तुभ खैरनार's picture

17 Jan 2013 - 5:53 pm | कौस्तुभ खैरनार

स्वाकशरी एकदम क ड क...
(तो 'क्श' कसा टाईप करायचा???)

मी-सौरभ's picture

17 Jan 2013 - 7:23 pm | मी-सौरभ

एक्स ची की वापरा खैरनार

विष्णुसूत's picture

15 Dec 2009 - 11:19 pm | विष्णुसूत

"भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय
मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
"

एक्सलंट !!!
मस्त लिहलय !

टारझन's picture

15 Dec 2009 - 11:34 pm | टारझन

=))

-रजनिश

टुकुल's picture

15 Dec 2009 - 11:59 pm | टुकुल

क क लिवलय बाला..
लै झ्याक

--टुकुल

चतुरंग's picture

15 Dec 2009 - 11:59 pm | चतुरंग

मिथन्या आन चंद्या लईच अतरंगी कार्टी!! ;)

(बहुरंगी)चतुरंग

रेवती's picture

16 Dec 2009 - 12:05 am | रेवती

हा हा हा!
किती हसवाल हो?
मस्त लेखन!

रेवती

निवेदिता-ताई's picture

20 Jan 2013 - 12:40 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते

उदा.

१. 'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'

२. 'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?'

सौरभ
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

लवंगीमिरची's picture

16 Dec 2009 - 12:37 am | लवंगीमिरची

:)
=)) =)) =))

भडकमकर मास्तर's picture

16 Dec 2009 - 12:45 am | भडकमकर मास्तर

_____________________________
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.

:)):)):)):)):)):)):)):))

धनंजय's picture

16 Dec 2009 - 12:59 am | धनंजय

:-D, :-D

घाटावरचे भट's picture

16 Dec 2009 - 1:46 am | घाटावरचे भट

:D :D :D

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Dec 2009 - 3:16 am | बिपिन कार्यकर्ते

:D :D :D

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

16 Dec 2009 - 4:53 am | Nile

:D :D :D :D

अक्षय पुर्णपात्रे's picture

16 Dec 2009 - 6:22 am | अक्षय पुर्णपात्रे

:D :D :D :D :D

आकडा's picture

17 Dec 2009 - 9:54 am | आकडा

मिथुन दादूस, लै भारी रे!!

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2009 - 8:30 am | llपुण्याचे पेशवेll

=))
=))
=))
=))
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Dec 2009 - 10:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दादूस, तू साध्या साध्या गोष्टीपण काय मस्त फुलवून सांगतोस रे! हहपुवा झाली.

अदिती

अनिल हटेला's picture

26 Dec 2009 - 11:09 pm | अनिल हटेला

बाला का बोल बाला ...................:))

सै रे बाल्या ................;-)

(भाशनपेरमी)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

धमाल मुलगा's picture

28 Dec 2009 - 4:18 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
जल्लां...तु लिवतो का मजा करतो रं?

>>'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'
=))
मायला! शाला क्वोन्ची रं? =))

वकिली चाल्ली नाय मंग सत्याग्रह केला तो चाल्ला.... =)) =)) =))

स्वाती२'s picture

16 Dec 2009 - 1:58 am | स्वाती२

=)) =)) =)) =)) =))

भानस's picture

16 Dec 2009 - 1:59 am | भानस

सहीच..... :D :D :)) :))

विकास's picture

16 Dec 2009 - 2:09 am | विकास

=)) =)) =)) =)) =))

एकदम आवड्या! तसेच वरचे जयपनेनी लावलेले चित्रपण खूपच बोलके आहे!

प्राजु's picture

16 Dec 2009 - 2:34 am | प्राजु

हाहाहा..
खूप दिवसांनी बाला आलास रं!
आलास तसा लिव आनिक काईबाही.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मदनबाण's picture

16 Dec 2009 - 4:56 am | मदनबाण

भारी लिवलयं .... :D

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

अजय भागवत's picture

16 Dec 2009 - 5:10 am | अजय भागवत

:-) 'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'

मास्तरपीस!

शाहरुख's picture

16 Dec 2009 - 5:50 am | शाहरुख

=))

चित्रा's picture

16 Dec 2009 - 6:46 am | चित्रा

लै भारी.

सुनील's picture

16 Dec 2009 - 7:14 am | सुनील

मस्त लेख!

पूर्वी ह्या इन्स्पेकटरना "दिपोटी" (Deputy?) म्हणत. त्यावेळचा एक किसा - पूर्वीच कधीतरी ऐकलेला-

दिपोटी - अफझलखानाला कोणी मारले?
मुलगा - आई शप्पथ, मी नाही!

दिपोटी (अचंबित होत) - काय हो मास्तर, हा मुलगा काय म्हणतो ऐकलत?
मास्तर - होय हो साहेब. खरच चांगला शांत मुलगा आहे तो. त्याने नसेल मारले अफझलखानाला.

दिपोटी (मुख्याध्यापकांच्या कचेरीत त्यांना सगळी हकिकत सांगत) - काय ही तुमची शाळा? काय ती मुले? काय ते मास्तर?
मुख्याध्यापक - त्याचं काय आहे साहेब, आता मास्तर पण म्हणतोय तर खरंच त्याने नसेल मारले त्या अफझलखानाला. पण मी काय म्हणतो, आपण आपापसात मिटवून टाकू ना! कशाला प्रकरण वरपर्यंत न्यायचं?

(दिपोटी साफ आडवा!!)

वाहीदा's picture

28 Dec 2009 - 12:39 pm | वाहीदा

मिलिंद बोकील ची 'शाळा' आठवली
=)) =)) =))

~ वाहीदा

त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.
शाळा - मिलिंद बोकील

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Dec 2009 - 8:41 am | घाशीराम कोतवाल १.२

जल्ला मिथन्या
किती दिवसान तुझ्या लेखणीतला बोला निंघाला रं
परत इलंस? बरां वाटलां रं! मना वाटला तू आता काय लिवायचा नायस! आमच्यावर भरकून ग्येला
फॉकन हासलो ना

(मोकळेपणाने फॉकन पोट धरून हसणारा) कोतवाल

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

हर्षद आनंदी's picture

16 Dec 2009 - 8:50 am | हर्षद आनंदी

वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई. =)) =))

भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले. काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला. मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

पर्नल नेने मराठे's picture

19 Dec 2009 - 10:42 am | पर्नल नेने मराठे

+१

=))

चुचु

दिपक's picture

16 Dec 2009 - 9:15 am | दिपक

प्रकाश घाटपांडे's picture

16 Dec 2009 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे

लई भारी! पंद्रा आगष्ट आन सव्वीस जानेवारीला आमच्या सरपंचाच बी वांद व्हायच. स्वातंत्र्य दिन आन प्रजासत्ताक दिन शब्द उच्चारायल तसे जडच. दोनी दिवशी झंडा फडकवित्यात हे मात्र पक्क.म्हात्मा गांदी ,चरखा, टकळि, सुत, खादी,सत्याग्र्,स्वातंत्र्य यवड शब्द म्हाईती झाले कि मंग झालं.हाय काय नाई काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अतुलजी's picture

16 Dec 2009 - 10:25 am | अतुलजी

=)) =)) =))

निखिल देशपांडे's picture

16 Dec 2009 - 10:50 am | निखिल देशपांडे

लै भारी दादुस...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

वेताळ's picture

16 Dec 2009 - 11:11 am | वेताळ

मत्मा गांधी बद्दल नवी माहिती मिळाली. =))

वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

16 Dec 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

क लिवलय क लिवलय बाला.. जबर्‍याच !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

16 Dec 2009 - 12:12 pm | विनायक प्रभू

साल्या हसवुन मारणार की काय?

अवलिया's picture

16 Dec 2009 - 1:10 pm | अवलिया

श्री रा रा ब्रिटीशजीसाहेब

छान लेखन ! ब-याच दिवसांनी आपला लेख पाहुन मनास संतोष वाटला.

--अवलिया

श्रावण मोडक's picture

16 Dec 2009 - 1:18 pm | श्रावण मोडक

+++++.....

sneharani's picture

16 Dec 2009 - 3:40 pm | sneharani

=)) =)) =))

सुधा's picture

16 Dec 2009 - 4:10 pm | सुधा

कवरं हाशीवल ........... बाल्या लई बेस .......

अविनाशकुलकर्णी's picture

16 Dec 2009 - 4:53 pm | अविनाशकुलकर्णी

अफलातुन....

=)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))

उपाशी बोका's picture

16 Dec 2009 - 8:32 pm | उपाशी बोका

झकास लिहिले आहे.
---------------
- उपाशी बोका

पाषाणभेद's picture

16 Dec 2009 - 9:45 pm | पाषाणभेद

लय भारी हाय चंद्या
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

विशाल कुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 10:18 am | विशाल कुलकर्णी

लै भारी रे बाला...

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Dec 2009 - 3:37 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच
binarybandya™

शक्तिमान's picture

19 Dec 2009 - 8:46 pm | शक्तिमान

मस्त रे!
फॉक्कन आवाज निघाला.. (तोंडातून)

सौरभ.बोंगाळे's picture

27 Dec 2009 - 3:19 am | सौरभ.बोंगाळे

लय भारी... =)) =))

जयपालराव तुम्ही टाकलेलं व्यंगचित्रपण भन्नाट आहे... =))

स्वाती दिनेश's picture

28 Dec 2009 - 12:13 pm | स्वाती दिनेश

लैच भारी..
स्वाती

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2013 - 9:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.

तो गांधी बापाच्या खिशातुन पैसे चोरायचा. त्यांचा "आदर्श" ठेवुन हल्लीच्या गांधी लोकांनी सगळ्यान्नाच बाप बनवलय. दिसला बाप की ढाप पैसे..दिसला बाप की ढाप पैसे...बर तो गांधी बाबा सुधारला (?) तरी..हल्लीचे परदेशी गांधी ईटालीयन माफियांना लाजवतील असे वागत आहेत...असो. भेटेलच त्यांनापण पोकळ बांबुनी फटके देणारा बाप.

मंदार कात्रे's picture

17 Jan 2013 - 11:38 pm | मंदार कात्रे

सहमत!

बाबा पाटील's picture

17 Jan 2013 - 1:40 pm | बाबा पाटील

लय म्हणजे लयच भारी......

रमेश आठवले's picture

17 Jan 2013 - 2:27 pm | रमेश आठवले

ब्रिटीश माणस इतक छान मराठीत लिहित असतील असे स्वप्नातही कल्पीले नव्हते . खूप मजा आली.

हसुन हसुन मरायची वेळ आली आहे.. :D :D :D :D

केदार-मिसळपाव's picture

17 Jan 2013 - 3:05 pm | केदार-मिसळपाव

भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय
मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'

इति.. सम्पूर्ण गान्धी-माझे सत्याचे प्रयोग....स्वता गान्धीजी प्रचन्ड हसले असतील हे वाचुन...उगिचच एव्हडे मोठे आत्मचरित्र लिहिले म्हणुन...

शुचि's picture

17 Jan 2013 - 6:58 pm | शुचि

हाहाहा!!

बांवरे's picture

18 Jan 2013 - 6:41 am | बांवरे

:)) :)) :)) :))
:)) :)) :))
:)) :))
:))

इरसाल's picture

18 Jan 2013 - 9:52 am | इरसाल

ह्यो बाला जेला कुर्‍हं.
बर्‍याच दिवसान दिसलां नाय तो.मोर्‍या गावान हाय का डोंबोलीला ?

तेजाला ह्येला मिनी चोल्यान ला बी रास शोधला .. पार खांबालपार्यान जाऊन आलो ..
कुट बी सापरला नाय .

कित्ती वर्षात दादूस आलाच नाही मिपावर. :( लई आटवन यायला लागली.

जेनी...'s picture

18 Jan 2013 - 10:30 pm | जेनी...

=)) =)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2013 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, हा बाल्या कुठं गेला. ह्याला शोधून आणा रे...

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2013 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)) :)) :))

रणजित चितळे's picture

20 Jan 2013 - 12:41 pm | रणजित चितळे

खूप दिवसांनी पोट फूटेतोपर्यंत हसलो. धन्यवाद ब्रिटिश आपल्याला.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Jan 2013 - 12:57 pm | घाशीराम कोतवाल १.२

कंर बाला तेजायला कुठ गेला बे तु ?
पनवेल्च्या मल्लिकामंदी पन सोदला तुला ? नी तिकर पार खारीवर पन गेल्तो पण दिसला नय मना ...
हायस कूठ मवाची पिवाला गेलान कय

रुपी's picture

2 Jun 2015 - 6:20 am | रुपी

फारच भारी! हहपुवा!

विजुभाऊ's picture

4 Jul 2015 - 3:17 pm | विजुभाऊ

कुटं हायस र बाला दादूस.....
ल्हित जा की रं हितं वाइच........

यशोधरा's picture

5 Jul 2015 - 5:17 am | यशोधरा

=))