चौसष्ठ घरातला आनंद!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
11 Dec 2009 - 12:21 am

२००८ साली जागतिक विजेता बनून भारतीय बुद्धीबळाचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणारा आनंद विश्वनाथन हा ११ डिसेंबर ला वयाची ४० वर्षे पूर्ण करत आहे!

आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो.
२०१० साली होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!

(दोन्ही चित्रे आंतरजालावरुन साभार.)
-(आनंदचा चाहता)चतुरंग

समाजक्रीडाशुभेच्छा

प्रतिक्रिया

आनंद, या माणसाने आपले 'विश्वनाथन' हे नाव खरोखर सिध्द केले..

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

चतुरंग's picture

11 Dec 2009 - 2:32 am | चतुरंग

मला वाटतं ह्या शुभेच्छा आहेत, लेख नव्हे आणि शुभेच्छा मी तरी एवढ्याच देतो, तीन चार भागांच्या मालिकेत नव्हे! :)

चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Dec 2009 - 2:40 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री चतुरंग, खुलाशाबद्दल धन्यवाद.

आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो.
२०१० साली होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय.

शुभेच्छांसोबत छायाचित्र व वरील सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीची अपेक्षा ठेवल्याबद्दल क्षमस्व.

विकास's picture

11 Dec 2009 - 2:10 am | विकास

आनंदला वाढदिवसानिमित्त तसेच त्याच्या पुढील स्पर्धांमधील विजयांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

माहीतीबद्दल चतुरंगचे आभार! (अर्थात जर "चतुरंग" नसता तर आनंद विजेता झाला असता का? :? )

सुधीर काळे's picture

11 Dec 2009 - 2:40 am | सुधीर काळे

विश्वनाथन् आनद यांचे "चाळिशी"त पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन व येत्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत शुभेच्छा!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

जे.पी.मॉर्गन's picture

11 Dec 2009 - 11:15 am | जे.पी.मॉर्गन

आपल्याला तर ह्या माणसाबद्दल लई म्हनजे लई कौतुक आहे. एकतर खेळाच्या नावातच बुद्धी आली म्हटल्यावर आपण चार हात लांबच उभे राहातो. तासनतास एका जागी बसून.... भयंकर गंभीर चेहरा करून.... काहीतरी भन्नाट विचार वगैरे करून... इकडचा मोहरा तिकडे करून ही लोकं काय करतात आपल्याला आजतागायत कळलेलं नाही. आणि त्यातून हा इसम गेली कित्येक वर्ष बर्‍याच हुशार लोकांना (कार्पोव, क्रामनिक, गेलफंड, ज्युडिथ पोल्गर प्रभृतींना) आणि संगणकालासुद्धा हरवत आला आहे म्हणजे प्रचंड हुशार सुद्धा असणार ! (अवांतरः ज्युडिथ पोल्गर बुद्धीबळ खेळताना विशेष सुंदर दिसत नाही पण हसली की कमाल दिसते ;-))

पहिला "खेलरत्न" ठरलेल्या आणि कित्येक वर्ष भारताचे नाव उंचावणार्‍या आनंदचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2009 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बुद्धीबळात खेळेल तो पर्यंत जगज्जेता ठरावा यासाठी शुभेच्छा. चतुरंगानं माहिती दिल्याबद्दल आभार..!

-दिलीप बिरुटे
[वजीर]

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Dec 2009 - 7:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

विश्वनाथ आनंदला शुभेच्चा !!!
हा माणुस कोरस बुध्दीबळ स्पर्धा पाचवेळा जिंकला आहे आणी
बुध्दीबळातील सर्व प्रकार हा माणुस विजेता आहे

( याहु गेम वर बुध्दीबळात १५०० पॉईट कमावलेला) कोतवाल
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

त्याच्या भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा.

वेताळ