flying jewels अर्थात फुलपाखरं भाग २

jaypal's picture
jaypal in कलादालन
9 Dec 2009 - 8:30 pm

नम्स्कार मंडळी,
flying jewels अर्थात फुलपाखरं भाग १ या भागानंतर आपल्या सेवेशी हा भाग२. आशा आहे हा देखिल आपल्याला तितकाच आवडेल.
या वेळेस फुलपाखराचे कोश(प्युपा) शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण हाती फक्त रीकामा कोशच लागला.

या वेळेस देखिल खुप सुरवंट होते. म्हणजे भविष्यात भरपुर फुलपाखरं

खालच्या फोटोत डाव्या बाजुस जे दिसतं आहे ते मॅटीसचा (गवळण) मोल्ट (कात) आहे.
खराखुरा किडा वाटावा असा.

हे आहे "ओक लिफ बटरफ्लाय" बघा सापडतय का? (मधोमध आहे, दिसल का?)

आपल्याला माहीत आही की फुलपाखरं मध पितात , पण केवळ मधातुन त्यांना आवश्यक पोषण मुल्य मिळत नाहीत. म्हणुन मग चिखल,विष्टा, म्रुत प्राण्यांच्या सडक्यामासावर किंवा प्राण्यांच्या घामावर यांना अवलंबुन रहाव लागत. खालचे काही फोटो मातीतील खनीज शोषतानची आहेत त्याला "मडपडलींग" म्हणतात

पुढील काही फोटो मधे एकाच फुलपाखराचे विविध कोनातुन विविध रंगछटा पहा.
पंख बंद व पंख उघडे

यांची नाव माहीत नाहीत जाणकरांनी माहीतीत जरुर भर टाकावा

हे आहे "सिलव्हर लाईन" मोठया माणसाच्या हाताच्या अंगठ्या एवढा आकार असतो.बंद पंखांनी असे दिसते.

तेच "सिलव्हर लाईन" उघड्या पंखांनी अस दिसत

हे आही "ब्ल्यु पॅन्जी" एकाच फुलपखारु पण कोन बदलला की निळ्या छटा देखिल बदलतात.

बचावासाठी सहसा आजुबाजुच्या वातावरणाचा रंग धारण करण्याचा प्रयत्न अस्तो.

गंध फुलांचा गेला सांगुन तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन

हे फोटो आहेत "खुळखुळा" झाडावरील रसपानाचे. सकाळच्या दवात पानांवर पयाने खरवडुन त्यातला रस फुलपाखरं शोषतात. याच कारण ही मजेशीर आहे. या पानांच्या रसाने त्यांचा स्पर्म काउंट वाढतो आणि सशक्त बनतो. थोडक्यात त्यांच "व्हायग्रा"

हे आहे "यलो लीफ"

सिलव्हर लाइन च्या जातकुळीच "ग्रासज्वेल"

हे बघा याच नाव आहे "टायगर"

नाव माहीत नाही. खुप त्रास दिला याने शांत बसेचना

हे आहे "कोमन क्रो common crow"

"चोकलेट पॅन्जी"

आता थोड पतंगाविषयी ("moth")
फुलपाखरं आणि पतंग ढोबळ फरक असा की.......
१.पतंगाचे पंख सहसा कौलारु घरासारखे आणि उघडे असतात.फुलपाखरांचे उघडझाप असतात.
फोटो पहा लक्षात येइल.
२.पतंग हे सहसा निशाचर असतात.फुलपाखरं दिवसा कार्यरत असतात.

हा दिवसा उडणारा म्हणुन "डे टाईम फ्लाइंग मोथ" पतंग

हा आहे जगातील सर्वात मोठा पतंग " एटलास मोथ" याच्या पखांची लांबी ११/१२ इंच असते. फोटो जालावरुन साभार. याच वैशीष्ट म्हणजे याला तोंड किंवा पचन संस्था नसते.सुरवंट असतानाच भरपुर खाउन घेतलेल असत. आयुष्य फक्त ५/७ दिवस. या कालावधीतच प्रणय करुन, आपला वारसा मागे ठेउन हे पतंग मरतात.हा पतंग भारतात आढळतो,बोरीवली नॅशनल पार्क येथे आढळल्याचे उल्लेख आहेत. सहसा जांभळाच्या पानावर अंडी व वाढ होते.

दवात भिजलेले कोवळे किरन

ईतर किडे जसे चतुर, कोळी, गवळण, बिटल्स ई. विषय घेउन पुन्हा लवकरच भेटु
समाप्त
कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन डिएक्स १८-५५ + निकोन १०५ मॅक्रो
स्थळ = ओवळेकर वाडी(ठाणे) + येऊर (ठाणे) + बोरीवली नॅशनल पार्क

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रभो's picture

9 Dec 2009 - 8:47 pm | प्रभो

मस्त...
बाकी आपल्याला फुलपाखरं बघायला फार आवडतातच.. :)

सध्या संत एकनाथांचे चतु:श्लोकी भागवत वाचणारा आणी अमेरिकेतली फुलपाखरं पाहणारा - भक्त प्रभो

मस्तानी's picture

9 Dec 2009 - 8:52 pm | मस्तानी

ज्याला 'अप्रतिम' 'अवर्णनीय' 'शब्दच संपले' अशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल असे अतिसुंदर फोटो ... येऊर ला फिरायला जायचो तेव्हा विविध रंगी फुले पाहण्यात किती वेळ निघून गेला याची जाणीवही व्हायची नाही ... हा खजिना आम्हा सर्वांना बघण्याची संधी दिलीत याबद्दल धन्यवाद !

गणपा's picture

9 Dec 2009 - 9:12 pm | गणपा

जबरा फोटो आहेत..
"ओक लिफ बटरफ्लाय " तर क्लासच.. ओळखुच आल नाही पटकन.
शेवटच " एटलास मोथ" पण झक्कास

-माझी खादाडी.

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 9:12 pm | मदनबाण

व्वा. काय मस्त फोटो आहेत... :)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

भानस's picture

9 Dec 2009 - 9:20 pm | भानस

सिल्वर लाईन कसले सुंदर आहे. सगळेच फोटो- फुलपाखरे सहीच आहेत.

sneharani's picture

10 Dec 2009 - 10:30 am | sneharani

अप्रतिम फोटो आहेत सगळे.
सूंदर, आवडले.

विनायक प्रभू's picture

10 Dec 2009 - 10:33 am | विनायक प्रभू

पाखरु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Dec 2009 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुं द र!

टुकुल's picture

10 Dec 2009 - 11:07 am | टुकुल

सुंदर

--टुकुल

सहज's picture

10 Dec 2009 - 11:28 am | सहज

अतिशय छान. बराच वेळ लागला असेल अशी छान प्रकाशचित्रे घ्यायला तुमच्या पेशंन्सला सलाम!

संजा's picture

10 Dec 2009 - 11:53 am | संजा

अतिशय छान
मालक, नमस्कार

सुमीत भातखंडे's picture

10 Dec 2009 - 12:01 pm | सुमीत भातखंडे

अप्रतिम

माधुरी दिक्षित's picture

10 Dec 2009 - 1:14 pm | माधुरी दिक्षित

अशाच नविन नविन फुलपाखरांच्या शोधात रहा :)

झकासराव's picture

10 Dec 2009 - 1:24 pm | झकासराव

सुप्परडुप्पर फोटो :)

रम्या's picture

10 Dec 2009 - 3:47 pm | रम्या

नादखुळा!!!!
एकदम आरबाट काम!!

आम्ही येथे पडीक असतो!

स्वाती२'s picture

10 Dec 2009 - 6:09 pm | स्वाती२

मस्त!

आप्ल्या सर्वांच्या प्रतीसादांमुळे हुरुप वाढला आहे. धन्यवाद

नंदू's picture

13 Dec 2009 - 1:25 pm | नंदू

सुंदर.
अजुन विविध विषयांवरचे फोटोज येऊद्या.

नंदू

JAGOMOHANPYARE's picture

13 Dec 2009 - 4:27 pm | JAGOMOHANPYARE

जय हो!!!

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

धमाल मुलगा's picture

14 Dec 2009 - 6:24 pm | धमाल मुलगा

काय एकापेक्षा एक फोटो आहेत रे भावा!!
केवळ जब्बर्रदस्त्त!!!

कुठे शिकलास बाबा इतके मस्त फोटो काढायला?

विनायक रानडे's picture

14 Dec 2009 - 6:47 pm | विनायक रानडे

काय राव फिरकी घेतली की, सरळ सांगायचे तुम्हाला युजर मॅन्युअल हवे आहे. असो, तुमचे निरिक्षण चांगले आहे. कॅमेरा नियंत्रण चांगले आहे. १०५ हे लेन्स ३५ एमेम फिल्म्चे ६० चे लेन्स आहे. ह्या कामाला फार छोटे आहे. फार जवळ जावे लागते. तुमचा डि ९० आहे मग ३५ एमेम फिल्म्चे ७५ - ३०० मॅक्रो झुम १०५ - ५०० होईल (अंदाजे) किंवा टॅमरॉनचे ३५ एमेम फिल्म्चे २४ - १३५ मॅक्रो झुम घ्या वजनाला हल्के आहे. ट्रायपॉड आवश्यक आहे. शटर १२५ ला सुध्दा कॅमेरा शेक दिसेल. बिल्टिन फ्लॅश सावली देईल.

jaypal's picture

15 Dec 2009 - 12:18 pm | jaypal

मी फिरकी घेतली नाही.
खरोखरीच शटरस्पीड आनि अ‍ॅपरचर चे खेळ्/गमतीजमती शिकतो आहे. स्टॅड (ट्रायपाड) शिवाय कठीण आहे. तसेच रिंग फ्लॅश घेण्याच्या विचारात आहे.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भटकंती अनलिमिटेड's picture

15 Dec 2009 - 11:23 pm | भटकंती अनलिमिटेड

जमलंय मित्रा. ब्लू पॅन्सी खूप भारी आलाय. कधी तरी मी पण टाकीन काही फुलपाखरी फोटो.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com