मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी, मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी, महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने, महाबँक पुरस्कार देण्यात येतो. ५००० रू. रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष २००८-०९ मध्ये, प्रसिद्ध झालेल्या भाषाविषयक लेखनाचा विचार करून डॉ. कलिका मेहता, डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रा. रंजना फडके यांच्या समितीने श्री. माधव आचार्य (चौल, अलिबाग) यांनी लिहिलेल्या ध्वनिताचे केणे या पुस्तकाची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १३ डिसेंबर २००९ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. विषयपत्रिका :प्रास्ताविक : प्रा. प्र. ना. परांजपेग्रंथाविषयी : डॉ. नीलिमा गुंडीपारितोषिक वितरण : हस्ते डॉ. नागनाथ कोतापल्लेलेखकाचे मनोगत : श्री. माधव ना. आचार्यप्रमुख अतिथी मनोगत : डॉ. नागनाथ कोतापल्लेआभार प्रदर्शन : प्रा. आनंद काटीकरसमारंभाचे स्थळ : एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह), नवी पेठ, पुणे-४११०३०दिनांक-वार : १३ डिसेंबर, २००९ - रविवारवेळ : सांयकाळी ५.३०[ मराठीअभ्यासपरिषद.कॉम / मराठीअभ्यासपरिषद.ओर्ग ला भेट द्या ]
प्रतिक्रिया
7 Dec 2009 - 10:09 pm | पाषाणभेद
माधव आचार्य यांचे दणक्यात हाबीनंदण.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
8 Dec 2009 - 9:07 am | निमीत्त मात्र
माधव आचार्य यांचे अभिनंदन!
8 Dec 2009 - 12:02 pm | चित्तरंजन भट
'ध्वनिताचे केणे'चे पुस्तक-परीक्षण आवर्जून वाचावे.