मुळ कवी सागरलहरी ह्यांच्या ह्या अप्रतिम काव्याचे हे एक रुप
चमचे ते तुझेच होते, काटेच हाती घेऊनिया..
स्वस्त नव्हतीच थाळी, म्हणे आमरस अनलिमिटेड घ्या
तव मुलींशी घसट माझी, निमीत्त्य ते खाणावळी
वातड सहा पोळ्या तोडतो, तिच्याकडे पाहून त्या
उगीच नाही मी नोकरी, केली ती परगावी,
आणिक बेचव डाळ-उसळींची, पर्वा मी केली का?
तुझला आक्षेप नसे, तुच रचिला खेळ सारा,
बराय हा जावईतरी, येथेच ह्याला जेवू द्या...
दिन सरता डेप्युटेशनचे, दैव सारे पालटले,
सुन्न मी तुझ्याच इतका, परदेसीच मला राहू द्या...
प्रतिक्रिया
6 Dec 2009 - 11:19 pm | टारझन
"मुल ते माझेच होते" आणि "विररस" हे टॅग पाहून .. अमॄतांजन साहेब कोणतातरी पराक्रम गाजवणार हे ठाऊकच होते. अंमळ डोळे पाणावलेच !!!
चटका लावणारी कविता .. नव्हे भयंकर भाजलंय मला :)
- अमॄता अन जन
6 Dec 2009 - 11:38 pm | अमृतांजन
टारु,
नयन तुझे ते 'जळं'लेले असती अलिकडे
आता भाजलंय असं म्हणतोस का बरे
घे तपासून ते जा तिथे अभ्यंकरांकडे
पळंव टॉपवर गाडी लक्षमी रस्त्याकडे
6 Dec 2009 - 11:43 pm | टारझन
=))
मस्त रे =)) =))
कसला फिस्स्स करून हसलोय :)