फूल ते माझे न होते, काटेच हाती घेऊ दया..
हास्य ते नव्हतेच गाली, जखमा उरातून वाहू दया
मृत्युशी दोस्ती ही माझी, आहे पुराणी वेगळी
मृत्यूचा आनंद लुटतो, जगणे उद्यावर राहू दया
मुक्त मी केली फकीरी, साथ ही नव्हते कुणी
साक्ष देण्या त्या क्षणांची, माझे कलेवर राहू दया
काय नसतो देव तेथे, पाहण्या हा खेळ सारा ?
असो मग 'काहीतरी', 'तेथे' उगीचच राहू दया ...
रात्र सरता मैफिलीचे, रंग सारे लोपले,
मात्र हा इतुकाच ठिपका, तुमच्या रुमाली राहू दया..
--- सागरलहरी २८/३/२००९