श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पुन्हा दहशतवादी हल्ला !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
4 Dec 2009 - 12:25 pm

मुंबई (ब्रेबॉन)- ता. ३ डिसेंबर (पीटीआय,एएफपी,एबीसी,ळक्षज्ञ) - दहशतवादी हल्ल्यांना सरावलेल्या मुंबईत आज पुन्हा दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉन स्टेडियमवर "क्रिकेट-ए-तोबा" ह्या भारतीय संघाने श्रीलंकन क्रिकेट संघावर हल्ला चढवला आणि पुन्हा मुंबईस (आणि अवघ्या क्रिकेटजगास) वेठीस धरले. ह्या हल्ल्यामध्ये श्रीलंकन क्रिकेटचे एटीएस प्रमुख मुथय्या मुरलीधरन ह्यांच्यासह सहा गोलंदाजांची गोलंदाजी शहीद झाल्याचे वृत्त आहे.

सकाळी १० च्या सुमारास नुकताच "क्रिकेट - ए - तोबा" मध्ये निवड झालेल्या एम विजय ह्याने काही फैरी झाडल्या तेव्हा कमिशनर कुमार संगकारा ह्यांना पुढे यू घातलेल्या वादळाची कल्पना आली नाही. कडवा अतिरेकी गौतम नसल्याने त्यांनी ही बाब पुरेशी 'गंभीर'पणे घेतली नाही. पण त्यानंतर थोड्याच वेळात कुख्यात माथेफिरू दहशतवादी वीरेंद्र सेहवाग ऊर्फ "माथेफिरू बीरू" ने हल्ल्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. एसीपी (अफेक्टेड क्रिकेट प्लेयर) रंगना हेराथवर त्याने पहिल्याच भेटीत तीनवेळा वार केले. आणि मग निष्पाप गोलंदाजांची कत्तल करण्याचा त्याने सपाटा लावला. अतिशय थंड डोक्याने आणि शांत (खरंतर मख्ख) चेहेर्‍याने त्याने हा 'रनसंहार' केला.

पुल, कट, ड्राईव्ह, ग्लान्स वगैरे सर्व संहारक अस्त्रे वापरून ह्या माथेफिरूने श्रीलंकन गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. मन मानेल तेव्हा लेटकट, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप अश्या शस्त्रांनी त्याने वारंवार गोलंदाजांना जखमी केले. एटीएस प्रमुख मुरलीधरनही त्याच्या तडाख्यातून सुटले नाहीत. उलट त्यांच्यावर माथेफिरू बीरूने सर्वांत घणाघाती प्रहार केले. कमिशनर संगकारा ह्यांनी डीप मिडविकेट, "२ लाँगऑन", "२ लाँगऑफ", स्वीपर कव्हर आणि डीप थर्डमॅन असा अभूतपूर्व कडेकोट बंदोबस्त करून देखील माथेफिरू बीरूने वारंवार गोलंदाजांना ह्या बंदोबस्तामधून तर काही वेळा बंदोबस्ता"वरून" फेकून दिले. ह्या क्रूरकर्म्याने प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीची निर्घृण हत्या केली. श्रीलंकन क्रिकेटच्या शीघ्र कृती दलाने डाव्या यष्टीच्या बाहेर मारा करून बीरूला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पुढे सरसावत प्रतिहल्ला केला. रिव्हर्स स्वीपच नव्हे तर रिव्हर्स पुल, रिव्हर्स ग्लान्ससारखी आजतागायत न बघण्यात आलेली अस्त्रंही माथेफिरू बीरूने वापरली. बाऊंन्सर्स, यॉर्कर्स, शॉर्ट, फुल, गुड, हाफ, आर्मर, दूसरा, चौथा, एकोणनव्वदावा..... कुठल्याच चेंडूंचा त्याने मुलाहिजा ठेवला नाही. हा बघा ह्या नराधमाचा क्रूर चेहेरा.....

बघा भीती, दया-माया, क्षमा - शांती... कशाचा लवलेशही नाही ह्याच्या चेहेर्‍यावर. एकदातर एटीएस प्रमुख मुरलीधरन ह्यांनी त्याला एक अप्रतीम 'फुल' दूसरा टाकला होता. मुरलीघरनना वाटले की त्यांनी माथेफिरू बीरूला पकडले. पण आनंदाने मारलेली त्यांची उडी पूर्ण होईपर्यंत चेंडू थर्डमॅन सीमेपासून १३.५ इंच दूर होता. ह्या निर्ढावलेल्या अतिरेक्याने त्यावरही 'बॅकफुट' पुढे टाकून "रोव्हर्स पॅडल स्वीप" मारला होता. एटीएसप्रमुख केवळ हतबल होऊन बघण्यापलिकडे काहीही करू शकले नाहीत.

ताज्या बातमीनुसार "माथेफिरू बीरू" क्रिकेट-ए-तोबा"च्या आत्मघातकी पथकाचा म्होरक्या असल्याने त्याने एटीएस प्रमुख मुरलीधरन ह्यांच्या हातात त्याने आपली इनिंग संपवली.

पण तरीदेखील 'क्रिकेट-ए-तोबा'चे अजून किमान ४ दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचे समजते. जगभरात आपल्या विध्वंसक कारवायांसाठी प्रसिद्ध असलेला "सच्या हटेला", "लपेट्या लक्ष्मण", "युवी सहाछकड्या" आणि "धोबीघाट धोनी" ह्यांचा त्यांत समावेश आहे. ब्रेबॉनवर हा रनसंहार आजचा दिवसभर चालू राहील अशी चिन्हं आहेत.

शेवटी - "माथेफिरू बीरू"च्या ह्या हल्ल्यात शहीद झालेल्या गोलंदाजांच्या गोलंदाजीस आमची विनम्र श्रद्धांजली !

क्रीडाप्रतिसादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

4 Dec 2009 - 12:29 pm | सुनील

मस्त लेख पण फोटो दिसत नाहीत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Dec 2009 - 12:38 pm | ब्रिटिश टिंग्या

:)

लेख आवडला हे वेगळे सांगणे नको :)

सुहास's picture

4 Dec 2009 - 12:38 pm | सुहास

:)

दिपक's picture

4 Dec 2009 - 12:38 pm | दिपक

शिर्षक वाचुन ठेका चुकला. पुढचे न वाचताच न्युजसाईट्स धुंडाळायला लागलो होतो. :D

जबरा हाणलाय विरू ने! तिनशे झाले पाहिजे होते त्याचे.

गणपा's picture

4 Dec 2009 - 12:41 pm | गणपा

जबरा
कं लिवलय कं लिवलय ..

-माझी खादाडी.

वेताळ's picture

4 Dec 2009 - 12:46 pm | वेताळ

मस्तच ,,,दहशवादाचा धावता वृत्तांत आवडला.
वेताळ

विशाल कुलकर्णी's picture

4 Dec 2009 - 12:47 pm | विशाल कुलकर्णी

हाण तिच्या मारी ! (हार्ट) ब्रेकिंग न्युजच जणु श्रीलंकेसाठी ! ;-)

अवांतर : या कडव्या अतिरेक्यांचे ऑसीजबरोबर संगनमत तर नाही ना? :/

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Dec 2009 - 12:51 pm | ब्रिटिश टिंग्या

कुलशेखरा या ऑन ड्युटी हवालदाराने आत्ताच "सच्या हटेला"चा गेम केल्याचे सुत्राकडुन समजते!

जे.पी.मॉर्गन's picture

4 Dec 2009 - 12:55 pm | जे.पी.मॉर्गन

आक्रमक इनिंग लई बघितल्यात राव... पण काल बीरूनं केला तो क ह र होता. कसोटी क्रिकेटमधे इतकं बेरहमीनी कोणी हाणलं नसेल. क्रूर चेष्टा.. बाकी काही नाही. इतके दिवस वाटत होतं ही "सच्या हटेला" नंतर खरा "डॉन" नाही झाला.... युवी, माही, आफ्रीदी वगैरे आहेत पण ते अजून "गावगुंड" कॅटेगरीत आहेत...पण बीरू साला वर्ल्ड माफिया बॉस निघाला... मोगँबो खुश हुआ !

मनिष's picture

4 Dec 2009 - 1:04 pm | मनिष

बीरू सही आहे यार! :)

श्रावण मोडक's picture

4 Dec 2009 - 1:14 pm | श्रावण मोडक

+१. अगदी सहमत. ते बाकीचे गावगुंडच (खरं तर, सेहवागच्या कालच्या डावाच्या हिशेबात पाहिलं तर फाळकूटदादा हा कोल्हापूरचा शब्दच योग्य ठरेल) वाटतात. सेहवाग हा मूळचा सिसिलियन डॉन आहे. त्या गुणवत्तेच्या हिशेबात मोजायचेच झाले तर सचिन हा पुढच्या पिढीतील सॉफिस्टिकेटेड डॉन वाटतो. सेहवागकडे सॉफिस्टिकेशनही आहे आणि आवश्यक ती क्रुएल्टीही.

जे.पी.मॉर्गन's picture

4 Dec 2009 - 6:20 pm | जे.पी.मॉर्गन

>>>सेहवागकडे सॉफिस्टिकेशनही आहे आणि आवश्यक ती क्रुएल्टीही.<<<

अगदी खरं ! डोक्यात खिळा मोडलेलीच लोकं असे अचाट विक्रम करू शकतात. सच्यानी देखील कितीही शतकं ठोकली तरी साहेबांचं ३०० मारायचं मटेरियलच नाही. असे विक्रम ह्या माथेफिरूनीच करावे !

श्रावण मोडक's picture

4 Dec 2009 - 6:40 pm | श्रावण मोडक

खरंय. हा माथेफिरूच २९३ वर, आज झाला तसा, आऊट होऊ शकतो. कारण तोच या धावांवरून चौकार, षट्कारही बेमुर्वतपणे मारू शकतो. त्याची स्फोटक खेळी पाहता, त्याचं असं बाद होणं हे म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचं तर, श्रीमंताघरच्या पोरीनं ड्रायव्हरसोबत पळून जाऊन लग्न करून ओढवून घेतलेली खिल्ली!!!

जे.पी.मॉर्गन's picture

4 Dec 2009 - 1:03 pm | जे.पी.मॉर्गन

क्रिकइन्फो वर एका ब्लॉग मधलं वाक्य वाचा...

For all the splendour Sehwag has once again given to the cricket-watching world, all record of this innings must be surreptitiously destroyed. What if impressionable young bowlers were to stumble upon evidence of the kind of abuse they may endure? What right-thinking parent would want their precious little baby bowler to grow up in such a heartless universe? Even bowling machines might refuse to bowl.

लई भारी लिवलंय ह्या बाबानी.

http://blogs.cricinfo.com/andyzaltzman/archives/2009/12/crimes_against_b...

टारझन's picture

4 Dec 2009 - 1:12 pm | टारझन

सकाळीच हाती आलेल्या वृत्ता नुसार आमचे प्रतिनीधी श्रीयुत खितपत पडलासिया यांनी कळवले की सकाळी लिट्टे जनरल "थुक्कय्या मिरचीवरन " ह्यांनी विरू माथेफिरू ह्याचा एनकाऊंटर मधे बळी घेतला आहे. पण तो पर्यंत ह्या आतंकवाद्याने आख्खा श्रीलंका उध्वस्त केला होता.
खितपत पडलासिया पुढे कळवतात अजुन काही उग्र आतंकवादी येणे बाकी आहेत. सर्वांत अनुभवी आतंकवादी "खेचिन चेंडुलकर " हा देखील हेल्दी डॅमेज करून शहिद झाला आहे. चकमक अजुन सुरू आहे पण लिट्टे चा पराभव जवळजवळ सुनिश्चित आहे. कधी सरेंडर करतील ह्यावरंच आता लक्ष लागून राहिले आहे .

- श्री. खितपत पडलासिया
न्युज रिपोर्टर , मिसळपाव टाईम्स

अमोल केळकर's picture

4 Dec 2009 - 1:43 pm | अमोल केळकर

वेगळा वृत्तांत आवडला

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Dec 2009 - 2:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

कं लिवलय कं लिवलय ..

मस्त आवडला हा वृत्तांत सही है भिडु
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

चतुरंग's picture

4 Dec 2009 - 4:06 pm | चतुरंग

मॉर्गनसाहेब कम्म्म्म्माल लिवलंय!! =D> =D>
आता इथून पुढे श्रीलंकेच्या खेळाडूंची रोजची प्रार्थना असेल...

"बीरुं" शरणं गच्छंती
संघं शरणं गच्छंती! ;)

(हीनयान)चतुरंग

विनायक प्रभू's picture

4 Dec 2009 - 4:56 pm | विनायक प्रभू

ह्या हल्ल्याने आद्य अतिरेकी वी.रिचर्ड पण थक्क झाला अशी पण बातमी आहे.
जे.पी मस्त लेख

प्रभो's picture

4 Dec 2009 - 7:52 pm | प्रभो

मस्त रे ......लै भारी

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

आण्णा चिंबोरी's picture

4 Dec 2009 - 10:13 pm | आण्णा चिंबोरी

भारतावर वारंवार छुपे व भ्याड हल्ले करुन सामान्य नागरिकांचे जिणे हराम करणा-या लष्कर ए तोयबा व तत्सम दहशतवादी संघटनांच्या नावांवर आधारित क्रिकेट-ए-तोबा असे नाव भारतीय संघाला देणे व अतिरेकी संघटनांमधील म्होरक्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित असे खेळाडूंचे वर्णन करणे हा प्रकार केविलवाणा वाटला.

तुझ्या लेखातून नकळतच किंवा सहेतुक लष्कर व तत्सम संघटनांचे गौरवीकरण होत आहे हे तुझ्या लक्षात यायला हवे होते.

संदीप चित्रे's picture

5 Dec 2009 - 12:52 am | संदीप चित्रे

मॉर्गन,
तुझा लेख त्यातील भावनांसाठी आवडला पण उपमा मात्र बरोबर उलट्या दिल्या आहेस मित्रा ! ए.टी.एस.चा प्रमुखवगैरे भारतीय संघासाठी वापरले असतेस तर जास्त आवडले असते. मुख्य म्हणजे 'दहशतवादाचा' वापर अशा लेखात नसता झाला तर बरे झाले असते !!

पुन्हा एकदा सांगतोय की सेहवागच्या खेळीबद्दलच्या तुझ्या प्रामाणिक भावना समजल्या. सो, नो गैरसमज प्लीज :)

अवांतरः मागे एकदा मी सेहवागच्या एका त्रिशतकानंतर लिहिलेला लेखही लवकरच मिपावर टाकीन. तुझ्या लेखामुळे मला तो लेखही आठवला :)

यशोधरा's picture

7 Dec 2009 - 7:23 pm | यशोधरा

संदीपशी सहमत. बाकी लेख मस्त. प्रथम लेखाचा मथळा वाचून मला खरोखरच श्रीलंकन खेळाडूंवर कुठे दहशतवाद्यांनी हल्ला केला की काय असे वाटले होते!

अक्षय पुर्णपात्रे's picture

5 Dec 2009 - 1:05 am | अक्षय पुर्णपात्रे

तुझ्या लेखातून नकळतच किंवा सहेतुक लष्कर व तत्सम संघटनांचे गौरवीकरण होत आहे हे तुझ्या लक्षात यायला हवे होते.

श्री चिंबोरी यांच्या वरील विधानाशी सहमत आहे. श्री मॉर्गन यांनी अशी तुलना टाळायला हवी होती. असो. श्री सेहवाग असेच भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करत राहोत.

Nile's picture

5 Dec 2009 - 1:15 am | Nile

अण्णांच्या भावनेशी सहमत आहे, मी सुद्धा धागा वाचुन 'होली काउ' म्हणालो अन उघडला, सेहवागचा फोटो पाहिला अन सुस्कारा सोडला. अर्थात हलकेच घेतल्याने अण्णांची झाली तशी आमची परीस्थीती झाली नाही एव्हढंच.

शाहरुख's picture

5 Dec 2009 - 2:18 am | शाहरुख

मी ही शिर्षक वाचून 'होली काउ' म्हणालो..धागा वाचायला सुरू होताच 'व्हॉट द **' म्हणालो पण वाचून होताच सेहवागसाठी आणि श्री. मॉर्गनसाठी "भावा, तोडलंस, फोडलंस, चिरडलंस, चुरगळलंस, कुस्करलंस वगैरे वगैरे..."

जे.पी.मॉर्गन's picture

7 Dec 2009 - 12:57 pm | जे.पी.मॉर्गन

>>भारतावर वारंवार छुपे व भ्याड हल्ले करुन सामान्य नागरिकांचे जिणे हराम करणा-या लष्कर ए तोयबा व तत्सम दहशतवादी संघटनांच्या नावांवर आधारित क्रिकेट-ए-तोबा असे नाव भारतीय संघाला देणे व अतिरेकी संघटनांमधील म्होरक्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित असे खेळाडूंचे वर्णन करणे हा प्रकार केविलवाणा वाटला.<<

ओक्के - पॉईंट नोटेड सर !

>>तुझ्या लेखातून नकळतच किंवा सहेतुक लष्कर व तत्सम संघटनांचे गौरवीकरण होत आहे हे तुझ्या लक्षात यायला हवे होते<<

आयला इज्जतच काढलीत की राव...... पण ठीक आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

पाषाणभेद's picture

5 Dec 2009 - 2:35 am | पाषाणभेद

मला लेखाची कल्पना आलेली होतीच नावावरनं, म्हणून शांततेने आस्वाद घेण्यासाठी इतर कामे बाजूला ठेवून हा लेख वाचला. वर्णन चफकल बनले तरीही दहशतवाद्यांचे उदात्तीकरण झाले असे वाटते.

ते सोडल्यास मजा आली.

------------------------
आमच्या घरच्या टिव्हीवर सासू-सून टाईप मालीकांचा रतीब चालू असतो. माझी बायको सिरीयल्स बघते, मी त्यातील बायका बघतो.

पासानभेद बिहारी

भानस's picture

5 Dec 2009 - 4:16 am | भानस

शिर्षक वाचून क्षणभर काळजात धस्स झाले पण कुठेही काही वाचल्याचे आठवेना.... पुढे पुढे वाचत गेले तस तसे....:) उमटले. मस्तच लिहीलेत.

अमोल जाधव's picture

5 Dec 2009 - 6:07 pm | अमोल जाधव

खुपच मस्त

सुधीर काळे's picture

7 Dec 2009 - 10:08 pm | सुधीर काळे

फारच सुंदर.....तुमच्या कल्पनाशक्तीला आणि शब्दभांडाराला सलाम!!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम