हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता
जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता
सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही
जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता
एकवारही मागे तुज बघता ना यावे?
इतका का दुस्वास करावा..जाता जाता?
चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली
मागमूस याचा न उरावा..जाता जाता
दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता
मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर
बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
प्रतिक्रिया
3 Dec 2009 - 11:54 am | पिवळा डांबिस
हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!!
:)
3 Dec 2009 - 11:56 am | घाटावरचे भट
=))
असो. कविता आवडली.
- (पक्षीनिरीक्षक) भटोबा
3 Dec 2009 - 12:01 pm | सहज
>हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!!
हा पहा चौथा राघू तोता तोता
वाहत्या गंगेत भिजला जाता जाता
3 Dec 2009 - 12:02 pm | टारझन
=)) =))
कविता मात्र सुरेख .. मात्रा वेलांटी वगैरे .. तशीही इकडे खोट काढायला जागाच नसते म्हणा :)
- (मात्रा बद्ध) पोपटलाडू
गुरू-लघु-लगु-गुरू-गुरू
3 Dec 2009 - 12:21 pm | श्रावण मोडक
आवडली.
3 Dec 2009 - 7:01 pm | क्रान्ति
मनापासून आवडली गझल.
क्रान्ति
अग्निसखा
3 Dec 2009 - 8:30 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
3 Dec 2009 - 8:38 pm | धनंजय
गझल आवडली.
**(पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी द्विपदी -या विशेष आवडल्या.)**
3 Dec 2009 - 8:49 pm | उमराणी सरकार
---दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता----
झक्कास.
उमराणी सरकार
3 Dec 2009 - 9:35 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री बेसनलाडू, रचना आवडली नाही. मुखशुद्धी, बोलघेवडा हे शब्द अजिबात आवडले नाहीत.
3 Dec 2009 - 9:39 pm | मदनबाण
मस्त गझल... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
3 Dec 2009 - 11:29 pm | विसोबा खेचर
अतिशय सुरेख..!
तात्या.
4 Dec 2009 - 12:45 pm | ऋषिकेश
लै भारी! ४था व शेवटाचा शेर विषेश आवडला
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
11 Dec 2009 - 12:13 am | हर्षद आनंदी
दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता
ये जीवन है.. इस जीवन का यहीं है रंगरुप
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
11 Dec 2009 - 12:58 am | मीनल
+१
मीनल.
11 Dec 2009 - 5:12 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. लाडू, कविता आवडली. खूपच सुरेख.
बिपिन कार्यकर्ते
11 Dec 2009 - 8:15 pm | चतुरंग
-चतुरंग