(अवांतर)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
2 Dec 2009 - 9:53 pm

पेशव्यांच्या विडंबनाची कीर्ती पाहून अर्थातच मत्सर निर्माण झाला.

अवांतराने धागा भरला
चांदण्या मात्र गायबल्या
वैतागाने धुसफुसणारा
नवा मिपाकर मी पाहिला

घसरले बोल गप्पांवर
कैच्याकै कंपू बरळला
थांबले मिपा पळभर
पाहता लेखकू कोमेजला

"जियो जियो" प्रतिसादावर
सहमतीचा नाद गुंजला
वेड्यांचा हा बाजार पाहून
मालक मात्र हिरमुसला

"ठेवा गप्पा खरडींपुरत्या
व्यनिची सोय केली कशाला?
जायचे तर खुशाल जावे
कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"

भयानकविडंबन

प्रतिक्रिया

विकास's picture

2 Dec 2009 - 10:00 pm | विकास

कविता मस्त आहे! जियो! :)

या वास्तवदर्शी कवितेस विडंबन सदरात घातल्याने, विडंबन हेच वास्तव आहे का असे वाटू लागले आहे. :?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि वास्तव भयानक असतं (असं म्हणतात) म्हणूनच वर कवितेचा रस काय ठेवला आहे तेही पहा! ;-)

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

3 Dec 2009 - 4:27 pm | विशाल कुलकर्णी

तै SSSSSSS

भारी मजी भयानक लिवलीस गं ! लै आवाडलं बग ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रभो's picture

2 Dec 2009 - 10:03 pm | प्रभो

ह्म्म.....काय बोलू....सगळं तर अदितीतै बोलून गेल्यात.. .

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2009 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"ठेवा गप्पा खरडींपुरत्या
व्यनिची सोय केली कशाला?
जायचे तर खुशाल जावे
कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"

रसग्रहण करण्याची गरज कवयत्रिने ठेवली नाही.
जियो ! :)

-दिलीप बिरुटे

Nile's picture

2 Dec 2009 - 10:08 pm | Nile

एकच विचार अनेकप्रकारे (दर शनिवारी?) व्यक्त करायची दुर्बिटणे बाईंची हातोटी(!) वाखाणण्यासारखी. दरवेळी त्यांच्या भावना तीव्र पण कविता संक्षिप्त होत आहेत असे जाणवते. (;) )

घाटावरचे भट's picture

2 Dec 2009 - 10:17 pm | घाटावरचे भट

सतत तापवून काव्यरस आटीव आणि संपृक्त होत चाललेला दिसतो.

चतुरंग's picture

2 Dec 2009 - 10:22 pm | चतुरंग

पुढल्या काही कवितांनंतर तर थाळीला तुपाचा हात लावून त्यात कविता थापून सुंदर खुसखुशीत वड्याच पडतील की काय असं वाटतंय! ;)

(आलेपाक)चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2009 - 8:28 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत सहमत सहमत.
श्री. नंदन यांचे प्रतिसादातून 'पाणिनी'च्या व्याकरणसूत्रांची आठवण झाली. अत्यंत संक्षिप्त आणि तरीही साक्षेपी कविता. वाह! अदिती, वाह श्री नंदन. जियो.
श्री. भट याणी आपल्या विवेचनातून खरोखर रसरशीत बासुंदीची आठवण करुन दिली. आणि कवितेचे विचक्षण बुद्धीने रसग्रहण कसे करावे आणि त्यातही रसिकता कशी जपावी याचा उत्तम आदर्श घालून दिला. धन्यवाद श्री. भट
श्री. चतुरंग यांच्या वडीच्या युक्तिवादाबद्दल तर क्या केहेने! शब्दच संपले फक्त येवढेच म्हणावेसे वाटले 'अदिती, खुसखुशीत वड्यांची रेसिपि पाठवून दे गं! पुढच्या बुधवारी नक्की करुन बघेन!'
कं. अदिती यांच्या कविता तर छानच. फारच गुणी मुलगी आहे ती. तिच्याकडून फार अपेक्षा आहेत.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

धमाल मुलगा's picture

3 Dec 2009 - 3:54 pm | धमाल मुलगा

वा! मस्त!!

असेच म्हणतो.

नंदन's picture

2 Dec 2009 - 11:29 pm | नंदन

एकच विचार अनेकप्रकारे (दर शनिवारी?) व्यक्त करायची दुर्बिटणे बाईंची हातोटी(!) वाखाणण्यासारखी.

--- सहमत आहे. म्हटलेच आहे, एकं सत् बहुधा विप्रा: (प्रभूसर नव्हेत) वदन्ति :)

दरवेळी त्यांच्या भावना तीव्र पण कविता संक्षिप्त होत आहेत असे जाणवते.

--- यालाच अल्पाक्षररमणीयता अथवा किमान शब्दांत कमाल अपमान करण्याची कुवत. म्हणत असावेत काय?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

3 Dec 2009 - 9:23 am | निखिल देशपांडे

--- यालाच अल्पाक्षररमणीयता अथवा किमान शब्दांत कमाल अपमान करण्याची कुवत. म्हणत असावेत काय?

हेच म्हणत असावेत नंदन भौ..
अदिती बै अतिशय वास्तवदर्शी विडंबन.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

रेवती's picture

2 Dec 2009 - 11:16 pm | रेवती

मस्त 'अवांतर'!
मजा आली वाचताना.
जियो!

रेवती

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 1:13 am | श्रावण मोडक

हायला... तू? आणि असं लिहू शकतेस? अनेक शनिवार वाया गेले तुझे! दुर्बीण चुकली होती की काय?

गणपा's picture

3 Dec 2009 - 1:40 am | गणपा

हा हा हा अदिती नक्की सांग काय झालय हल्ली
विडंबनाचे एकसे एक 'उतारे' येतातत =)) =))
-माझी खादाडी.

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 1:52 am | श्रावण मोडक

उताऱ्यांशी तुमचा काय संबंध हो? तुम्ही आपले मूळचे पहावे... कसे? ;)

सहज's picture

3 Dec 2009 - 8:33 am | सहज

वास्तववादी काव्य.

अदिती व पुपे दोघांनी लवकरच विडंबन इ-लर्निंगचा क्लास काढावा. विडंबनापासुन सुरवात करता करता काही चांगले कवी तयार होतील. काही नाही तर कवितावाचकवर्ग निर्माण झाला तरी आनंद आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग!

अवलिया's picture

3 Dec 2009 - 1:28 pm | अवलिया

छान !

--अवलिया

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:44 am | विसोबा खेचर

जायचे तर खुशाल जावे
कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"

अगदी अगदी!

तात्या.

दशानन's picture

3 Dec 2009 - 9:18 am | दशानन

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) ............................. =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2009 - 10:32 am | बिपिन कार्यकर्ते

आय मीन... भीषॉन सुंदर...

बाकी वर नंदन आणि इतर दिग्गजांनी विडंबनाची व्यवस्थित केलीच आहे... आय मीन समीक्षा... त्यामुळे अजून काय बोलत नाय आपन.

बिपिन कार्यकर्ते

सुमीत भातखंडे's picture

3 Dec 2009 - 12:08 pm | सुमीत भातखंडे

एकदम सॉल्लिड