कविते, तुज शोधित आले

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
1 Dec 2009 - 10:42 pm

मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी
हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी
त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले
कविते, तुज शोधित आले

इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे,
झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे
ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले
कविते, तुज शोधित आले

मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची,
कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची,
मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले
कविते, तुज शोधित आले

तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची,
तू तन्मय मीरा दासी हरिचरणाची,
तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले,
कविते, तुज शोधित आले

तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले

शांतरसकविता

प्रतिक्रिया

शेखर's picture

1 Dec 2009 - 10:59 pm | शेखर

सुंदर कविता....

चतुरंग's picture

1 Dec 2009 - 11:08 pm | चतुरंग

अतिशय चित्रदर्शी, नादमय, गेय आणि सहज कविता.
फार दिवसांनी इतकी छान कविता वाचल्याचा आनंद मिळाला!

(अत्यानंदित)चतुरंग

धनंजय's picture

1 Dec 2009 - 11:32 pm | धनंजय

चित्रदर्शी कविता आहे.
(तरंगातून, बालहास्यातून, वगैरे कविताच कवयित्रीला शोधत आली आहे, असे म्हणावेसे वाटते.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

1 Dec 2009 - 11:47 pm | अक्षय पुर्णपात्रे

क्रान्तितै, अतिशय सुंदर कविता. शेवटच्या दोन कडव्यांवरून महानोरांच्या पुढील ओळी आठवल्या. ('मुक्ता' चित्रपटातही ही कविता आहे. ती कविता प्रेयसीला उद्देशून आहे.)

तू तलम अग्निची पात
जशी दिनरात जळावी मंद
तू बंधमुक्त स्वछंद
जसा रानात झरा बेबंद

भानस's picture

2 Dec 2009 - 12:10 am | भानस

क्रान्ति नितांत तरल व गेय कविता. खूप आवडली. अप्रतिम.

प्रभो's picture

2 Dec 2009 - 12:15 am | प्रभो

मस्त..आवडली

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 1:04 am | श्रावण मोडक

ओह्ह, नो. तुम्ही यापेक्षा... वगैरे लिहिण्यात बराच अर्थ आहे!
आणि याच कवितेत बरीच बीजं आहेत!!!

घाटावरचे भट's picture

2 Dec 2009 - 1:09 am | घाटावरचे भट

छान छान!!

गणपा's picture

2 Dec 2009 - 3:37 am | गणपा

खरच खुप छान आहे कविता..

-माझी खादाडी.

नंदन's picture

2 Dec 2009 - 4:10 am | नंदन

कविता, आवडली. रंगरावांनी म्हटल्याप्रमाणे चित्रदर्शी, नादमय आणि सहजपणे उतरलेली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

2 Dec 2009 - 8:22 am | मदनबाण

सुंदर... :)

तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले
झकास्स्स...
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

दशानन's picture

2 Dec 2009 - 9:14 am | दशानन

छान आहे कविता.

:)

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 9:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रांतीताई, कविता खरंच, मनापासून आवडली.

अदिती

शाहरुख's picture

2 Dec 2009 - 11:55 am | शाहरुख

असेच म्हणतो..

(समजणारे आवडणारा आणि आवडणारे समजून घेणारा) शाहरुख

jaypal's picture

2 Dec 2009 - 10:23 am | jaypal

नितांत सुंदर

सहज's picture

2 Dec 2009 - 11:08 am | सहज

बरेचदा शोध म्हणजे घरदार, सगेसोयरे सोडून , मोहात न पडता दूर कुठे जाउन प्राप्त / सिद्ध करायचा गोष्टी डोळ्यासमोर येतात.

घरसंसारात बसल्या बसल्या कवितेचा हा शोध म्हणजे सावता माळ्याने आपल्या मळ्यातच देवाला खेचुन आणले, तसे कवयित्रीने कवितेला आपल्याकडे खेचुन आणले.

वाह! जीवन त्यांना कळले हो अशीच कविता!!!!!

आवडली.

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Dec 2009 - 11:27 am | फ्रॅक्चर बंड्या

सुंदर कविता...

binarybandya™

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2009 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता...

-दिलीप बिरुटे

sneharani's picture

2 Dec 2009 - 12:05 pm | sneharani

अतिशय सूंदर कविता....
खूपच सूंदर!!!

अतुलजी's picture

2 Dec 2009 - 12:06 pm | अतुलजी

छान कविता.... आवडली :)

अवलिया's picture

2 Dec 2009 - 1:45 pm | अवलिया

छान !

--अवलिया

मिसळभोक्ता's picture

2 Dec 2009 - 2:07 pm | मिसळभोक्ता

तीच ती मीरा, तोच तो पाऊस..

तोच तो साजण, तीच ती भूपाळि..

एकंदरीत जुनी वारुणी नव्या बाटलीत..

यॉन...

किमान सहज किंवा अवलिया साहेबांनीतरी त्यांचे खरे विचार लिहायला हवे होते. पण एकंदरीत वातावरण बघता, तेदेखील कंपूबाजीत अथवा चपलांत मग्न. संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत. छ्या ! चला, आम्हीच चपलांची तयरी करतो, मग.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2009 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'तोच तो आणि तेच ते' वर आमचे दोन पैसे.

'भावगीत' या काव्यप्रकाराच्या जन्म संगीत नाटकांच्या पदांमधूनच झाला असे म्हणतात.(चुभुदेघे) संगीताचा अतिरेक झाला आणि संगीत रंगभुमीला वाचवण्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला. पदाची रचना, सुलभपणा, चाली, गाण्याच्या पद्धती. इत्यादी. त्यामुळे झाले काय की, या निमित्ताने वेगवेगळ्या रचना निर्माण झाल्या आणि लोकप्रियही झाल्या. 'कविता गायन' या प्रकाराचा प्रवास असाच झाला असावा.

मीरा,साजन,पाऊस,भुपाळी, या किंवा अशा नियमित येणार्‍या शब्दांच्या रचनांमधून एक नवअनुभव वाचायला मिळतो का, तो अनुभव आनंद देतो का ? ते वाचकांनी शोधले पाहिजे असे वाटते. सो-सो वाटणार्‍या रचनेपासून ते 'आनंदाचे डोही आनंद तरंगपर्यंतचा' प्रवास जरासा मागे आणि जरासा पुढे असाही होत असतो. तेव्हा आपण निर्मळ मनाने काव्यवाचनाचा आनंद घेतला की, 'तोच तो पणा दिसणार नाही' आणि दिसला तरी, कधी तरी त्यात बदलही होतील असे समजून, लिहिणार्‍याचा उत्साह वाढविला पाहिजे असे मनापासून वाटते.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

2 Dec 2009 - 9:28 pm | चतुरंग

तुम्ही द्याना हो नवी वारुणी नवीन बाटलीत, किंवा जुन्या बाटलीत दिलीत तरी चालेल, आम्ही वाचून प्रतिसाद देऊ!!

(कळपातला)चतुरंग

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 1:16 am | श्रावण मोडक

आत्तापर्यंत कंपू ठाऊक होता.
(कळपातला)चतुरंग
हा कळप कुठून आला? असो...

चतुरंग's picture

3 Dec 2009 - 6:57 am | चतुरंग

संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत.

ह्या मिभोंच्या वरच्या प्रतिक्रियेतून कळप आलाय! >:P

चतुरंग

अजिंक्य's picture

2 Dec 2009 - 2:35 pm | अजिंक्य

कविता. धन्यवाद.
अजिंक्य.

विमुक्त's picture

2 Dec 2009 - 4:15 pm | विमुक्त

मस्त... आवडली...

प्राजु's picture

3 Dec 2009 - 5:52 am | प्राजु

कविता अतिशय तरल उतरली आहे..
सुंदर!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

सूहास's picture

3 Dec 2009 - 2:09 pm | सूहास (not verified)

तरल कविता ...

सू हा स...