पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
1 Dec 2009 - 7:50 pm

पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली. पुण्यात राहाणार्‍या आणि पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत काही चाड असणार्‍या जबाबदार नागरिकांनी यात भाग घ्यावा म्हणून हे लिखाण. www.savepunetraffic.com या संकेतस्थळावर जाऊन या मोहिमेचा भाग व्हा. मी नुकतेच या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे.
सन्जोप राव

समाजमाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Dec 2009 - 7:53 pm | विसोबा खेचर

आमच्या मुंबैच्या वाहतुक वेवस्थेचीदेखील पार वाट लागली आहे..

तात्या.

सूहास's picture

1 Dec 2009 - 8:01 pm | सूहास (not verified)

503 Service Unavailable
Failed to resolve the name of server www.savepunetrafic.com to connect

उघडले शेवटी !! सभासद झालो !!..पुढे बघु !!

सू हा स...

सन्जोप राव's picture

1 Dec 2009 - 8:02 pm | सन्जोप राव

आवश्यक तो बदल केला आहे. आता पहा.
सन्जोप राव

हरकाम्या's picture

2 Dec 2009 - 1:38 am | हरकाम्या

पुण्याच्या वाहतुकीबद्दल लिहावे आणि बोलावे तेवढे थोडेच आहे.

हर्षद आनंदी's picture

2 Dec 2009 - 9:18 am | हर्षद आनंदी

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग कसा दिसणार?

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विजुभाऊ's picture

2 Dec 2009 - 9:25 am | विजुभाऊ

पुण्याची वहातूक व्यवस्था सुधारण्यासाठी जाम गर्दीच्या वेळेस संजोपरावांच्या गोड आवाजात वर्जेश सोळंकीच्या कवितांचे वाचन ठेवायचा विचार म न पा मध्ये चालू आहे.
अशी एक बातमी आहे.

टारझन's picture

2 Dec 2009 - 9:38 am | टारझन

broken image

तुमचं तुटलं हो विजुभौ .... चित्र .. ;)

-काजुखाऊ

मिसळभोक्ता's picture

3 Dec 2009 - 6:12 am | मिसळभोक्ता

हॅ हॅ हॅ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 9:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'रेडीओ मिरची'वर गेले अनेक महिने याच प्रकारासाठी आर.जे. काही वेळ बोलतात. पण फारसा फरक पडलेला दिसत नाही आहे, असं त्यांचं म्हणणं

पुण्याची वाहतूक व्यवस्था मी काही सुधारू शकत नाही, पण आणखी बिघडू नये म्हणून ऑफिसच्या होस्टेलला रहायला लागले!

अदिती

दशानन's picture

2 Dec 2009 - 9:55 am | दशानन

अश्या प्रकारचा कुठलाही प्रकल्प / विचार यशस्वी होण्यासाठी सामुहिक इच्छा शक्ती आवश्यक असते व ती मला पुण्यात काय पुर्ण भारतात कुठे दिसत नाही.

यमुना बचाव आंदोलन असो वा गंगा सफाई अभियान सगळ्यांची वाट करोडो रुपये खर्च व पब्लिकचा वेळ खर्च ह्यातच लागते.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

देवदत्त's picture

2 Dec 2009 - 10:49 am | देवदत्त

अश्या प्रकारचा कुठलाही प्रकल्प / विचार यशस्वी होण्यासाठी सामुहिक इच्छा शक्ती आवश्यक असते व ती मला पुण्यात काय पुर्ण भारतात कुठे दिसत नाही.
पूर्ण सहमत.

संताजी धनाजी's picture

2 Dec 2009 - 3:20 pm | संताजी धनाजी

अगदी बरोबर! परंतु सामुहिक म्हणजे काय हो? :) तुम्ही आम्हीच की. स्वतःपासुन सुरुवात केली की सगळे सोपे होते.

मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासुन SPTM[Save Pune Traffic Movement] चा सभासद आहे आणि मी वाहतुकीचे _सर्व_ नियम पाळतो आणि इतरांना पाळण्यास प्रर्वुत्त करतो + SPTM च्या वाहतुक सुधारणा कार्यक्रमांत भाग घेतो. आम्ही हे कार्यक्रम PMC, Traffic dept. ह्यांच्याबरोबर co-ordinate करुन करतो. परंतु हे करण्यासाठी स्वयंसेवाकांची गरज आहे.

आमचा एक याहू ग्रुप पण आहे: sptm-sunrise@yahoogroups.com. ज्याच्यावर आम्ही आमच्या कार्यक्रमांची रुपरेषा ठरवतो. आणि अमलात आणतो. सध्यातरी मी ठरवुन दिलेली कामे करतो.

कालच्या का परवाच्या सकाळमध्येपण [पुरवणी] SPTMच्या हर्षद अभ्यंकरांचा एक छान लेख आला आहे.

आपण सर्वांनी [कमीत कमी मिपाकरांनी] जर हे केले तरी थोडा फरक नक्की पडेल की! काय म्हणता? जमेल का?

- संताजी धनाजी

Nile's picture

3 Dec 2009 - 8:05 am | Nile

वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणे खरंच खुप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा पुण्यात होतो तेव्हा आम्ही कुठेही कोंडी झाली असेल तर उतरुन सोडवणे. (काही जेष्ठ नागरीकांना असे करताना पाहिले होते, तेव्हा त्यांच्या पासुन स्फुर्ती घेउन आम्हीही सुरु केलं). आम्ही जर सिग्नलला उभे असु तर कुणी झेब्राच्या पुढे गेला असेल तर तसं मुद्दाम सांगायचो, जर मागे नाही आला तर सगळे 'काय माणुस आहे अश्या नजरेनं पाहायचो. कुणी सिग्नल तोडुन पुढे गेला तर (सिग्नल सुटल्यावर) त्याच्या मागे जाउन मुद्दाम वळुन वळुन त्याच्याकडे तुच्छतेनं बघायचो. आणी अर्थातच स्वत: सगळे नियम पाळायचो व नियम मोडणार्‍या मित्रांच वगैरे बौद्धीक ही घ्यायचो (अर्थात इथे बर्‍याच जणांना उलटंच काहीतरी वाचतोय का असं वाटत असेल! )

देवदत्त's picture

6 Dec 2009 - 10:17 pm | देवदत्त

सहमत...
मी ही पुण्यात असताना तिकडचे नियम पाळत होतो, आणि इथे ठाण्यातही पाळतोच. तसेच नियम न पाळणार्‍या इतरांनाही ते सांगतो.

बाकी सुधारणा कार्यक्रमांत कधी भाग घेता आला नाही. :(

श्रीयुत संतोष जोशी's picture

3 Dec 2009 - 7:58 am | श्रीयुत संतोष जोशी

आता हे असं असताना ट्रॅफिक कसा सुधारणार ?

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.