अपॉरच्युनीटी कॉस्ट

शब्देय's picture
शब्देय in जनातलं, मनातलं
30 Nov 2009 - 4:38 am

रात्रीचे तीन-सव्वा तीन वाजलेले.

स्टडी ग्रुपचे पार्टनर्स आजची केस स्टडी सोडवून नुकतेच आपापल्या रुमवर परतलेले.याच्या डोक्यात मात्र अजूनही "अपॉरच्युनीटी कॉस्ट", आजच्या केस स्टडीचा विषय, याचेच विचार घोळत होते.

एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. च्या पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकांच्या मधे कुठेतरी अ‍ॅश ट्रे सापडला.तुडूंब भरलेला.पर्यायच नव्हता. तो उठला आणि अ‍ॅश ट्रे रिकामा करुन आला.

गोल्ड फ्लेक शिलगावली.

"अपॉरच्युनीटी कॉस्ट", दोन पर्यायांपैकी एक निवडल्यावर, दुसरा पर्याय न निवडल्याने गमावलेला फायदा, ही निवडलेल्या पर्यायाची "अपॉरच्युनीटी कॉस्ट".

आजतोवर स्वीकारलेले आणि नाकारलेले पर्याय आणि त्यांच्या परिणामांच्या बेरजा-वजाबाक्या त्याच्या डोळयांसमोर येऊ लागल्या.

सहावी, सातवी, आणि आठवीत चित्रकलेत खूप बक्षिसे मिळवली.मी कोण होणार? तर चित्रकार, हेच डोक्यात.

पण डोके होते. बोर्डात नंबर. तो पण दोन्हिवेळेस. यू.डी.सी.टी. केमिकल इंजिनीअरींगला सहज प्रवेश. एफ.ई. चे ग्राफिक्स आणि एका वर्षीच्या कॉलेज मॅग्झिनचे कव्हर डिझाईन इथेच त्याच्या चित्रकलेच्या चित्तरकथेला पूर्णविराम मिळाला. एक पर्याय संपला.

कॅम्पसला पहिल्या दिवशी आय्.टी. कंपनी होती. हा विनासायास सिलेक्टेड. दुसर्‍या दिवशी प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल, प्रत्येक केमिकल इंजिनीअरची ड्रीम कंपनी. हातात ऑफर लेटररुपी पर्याय असताना प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बलला अ‍ॅप्पीअर होण्याचा फारसा मूड असा नव्ह्ताच. एक पर्याय असा संपवला गेला.

पुढे मेनफ्रेममधे पोजेक्ट मिळाला. शिक्षण आणि काम यांचा अर्थाअर्थी संबंध कमीच पण "अर्थ" चांगले होते. बरेचदा रात्री १० ते सकाळी ७ अशी शिफ्ट. पहिली गोल्डफ्लेक अशीच एका रात्री प्रॉडक्शन सपॉर्टचे टेन्शन फुंकून कसे टाकायचे ते शिकवून गेली. कामात हा हुषार. दोन वर्षांनी यु.के. ला ऑनसाईट मिळाले.तिथे तीन वर्षे "बॅटींग" केली. क्लायंट साईटवर मॅकीन्झिचे बरेच टिप्-टॉप कन्स्लटंट्स दिसायचे. हा मनात तुलना करायचा.

पाच वर्षात सेव्हिंग झाले होते. लग्न-घरदार यात पडणे आता शक्य होते. किंवा ??? पर्याय संपले असे वाटत होते पण...एका वर्षाच्या एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. ला अ‍ॅडमिशन घेतली. सेव्हिंग अकाऊंट निल झाले. पर्यायाने लग्न-घरदार हे आता पाच एक वर्षेतरी लांबणीवर पडले.

"चित्रकारच झालो असतो तर.. क्रिएटीव्ह लोकांसाठी खूप स्कोप आहेच की."

"प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल मधे गेलो असतो तर.. छान वर वर गेलो असतो एव्हाना."

"यु.के.त सेटल झालो असतो तर ..आधी प्रोजेक्ट मॅनेजर आणि मग अकाऊंट मॅनेजर झालोच असतो की."

"फॅमिलीमॅन झालो असतो तर बरोबरीच्या मित्रांच्या लग्नांचे इनव्हिटेशंस पाहून बोअर झालो नसतो."
"तसा धरसोड नाहीये मी. लाथ मारेन तिथे पाणी काढतो मी. पण प्रोब्लेम हा आहे की मी लाथा फार मारल्या. एकच सणसणीत लाथ मारली असती तर बरे झाले असते."
"सकॄतदर्शनी मी लाथ कुठे मारायची हे ठरवताना अजूनही चाचपडतोय. पण लौकीक अर्थाने..."

बीप्..बीप्..बीप..

मोबाईलचा साडे पाचचा अलार्म वाजला. ऊठून जरा योगा करावा म्हणून लावलेला अलार्म.

झोपायचा पत्ता नाही अजून. ऊठायाचा अलार्म काय कामाचा!

पुन्हा दोन पर्याय.. झोप की योगा?

"अशा पर्यायांची अपॉरच्युनीटी कॉस्ट काढणे सोप्पे असते!" डोक्यावर चादर घेताना तो हसत म्हणाला.
-शब्देय
http://rajansays.blogspot.com

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

30 Nov 2009 - 6:51 am | सहज

आवडले.

गणपा's picture

30 Nov 2009 - 1:15 pm | गणपा

असच म्हणतो....

अजय भागवत's picture

30 Nov 2009 - 9:27 am | अजय भागवत

खूप आवडला लेख!!
तुमच्या बोटीवर अनेक जण आहेत ते शोधा- :-)

संग्राम's picture

30 Nov 2009 - 8:54 pm | संग्राम

खूप आवडला लेख ...

विजुभाऊ's picture

30 Nov 2009 - 10:02 am | विजुभाऊ

खरे आहे सेलिंग इन अ सेम बोट.
ऑपॉर्च्यूनिटी कॉस्ट ची सर्वात प्रकर्शाने जाणीव झाली ती लग्नासाठी होकार दिल्यावर ;)

jaypal's picture

30 Nov 2009 - 10:55 am | jaypal

>ऑपॉर्च्यूनिटी कॉस्ट ची सर्वात प्रकर्शाने जाणीव झाली ती लग्नासाठी होकार दिल्यावर
धन्य आहात.

लेख आवडला

विनायक प्रभू's picture

1 Dec 2009 - 3:20 pm | विनायक प्रभू

आवडला.
विजूभौ एकदम हॅहॅहॅ

विनायक प्रभू's picture

1 Dec 2009 - 3:21 pm | विनायक प्रभू

आवडला.
विजूभौ एकदम हॅहॅहॅ

ज्ञानेश...'s picture

30 Nov 2009 - 10:48 am | ज्ञानेश...

छोटासा, पण मस्त लेख.
विचार करायला लावणारा..

आवडले!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

30 Nov 2009 - 2:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सही.

मनीषा's picture

30 Nov 2009 - 2:36 pm | मनीषा

काही वेळा आपण दिलेली अथवा आपल्याला मिळालेली अपॉर्च्युनीटी कॉस्ट योग्य होती का हे कळत नाही .
आणि दोन पेक्षा जास्त पर्याय असतील तर .....???

स्वाती२'s picture

30 Nov 2009 - 3:25 pm | स्वाती२

आवडले.

पर्नल नेने मराठे's picture

30 Nov 2009 - 3:32 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म :S
(बोटिन्ग करणारी) चुचु

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Nov 2009 - 3:48 pm | llपुण्याचे पेशवेll

ही ही ही.. खाते उडू नये म्हणून कॅलेंडर्वडी या स्त्रीनावे वावरणार्‍या पुरुषाच्या प्रतिसादाचे विडंबन केले नाही म्हणून तो माजला तेव्हा. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

टारझन's picture

1 Dec 2009 - 4:33 pm | टारझन

=)) =)) =)) =)) लेका पेशव्या =))

लेख चांगला वाटेश :) छोटेखाणी सुंदर लेखण ..

- बटाटावडी

शब्देय's picture

30 Nov 2009 - 11:49 pm | शब्देय

सर्वांचे मनापासून आभार :)

लेख टंकणे आणि दुपारची झोप यांची निवड करताना अपॉर्च्युनीटी कॉस्ट बरोबर काढली असे आता म्हणायला हरकत नाही. ;)

प्राजु's picture

1 Dec 2009 - 12:06 am | प्राजु

मस्त!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

चतुरंग's picture

1 Dec 2009 - 12:16 am | चतुरंग

जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मोजावीच लागते.
हे पर्याय डोक्याने निवडण्याइतकेच 'आतल्या आवाजाने' निवडलेले असले तर काय रिझल्ट मिळेल? हा मला छळणारा नेहेमीचा सवाल असतो. माझ्या आतल्या आवाजाने (इंस्टिंक्टने) दाखवून दिलेल्या गोष्टी १००% वेळा बरोबर असतात असे मला नंतर लक्षात येते! ;)

चतुरंग

विंजिनेर's picture

1 Dec 2009 - 7:37 am | विंजिनेर

प्रकाटाआ

विंजिनेर's picture

1 Dec 2009 - 7:37 am | विंजिनेर

माझ्या आतल्या आवाजाने (इंस्टिंक्टने) दाखवून दिलेल्या गोष्टी १००% वेळा बरोबर असतात असे मला नंतर लक्षात येते!

हे सापेक्ष आहे असं मला वाटतं. असो.
पण त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा की, एकदा 'आतून' निवड झाली की ऑपॉर्ट्युनिटी कॉस्ट कितीही असेल तरी ती किंमत मोजून आपण घेतलेल्या निर्णयाचा पाठपुरावा करायला तयार असतो. आणि म्हणूनच काही काळानंतर वळून बघताना तो निर्णय १००% बरोबर होता असं जाणवतं

मनिष's picture

1 Dec 2009 - 12:24 am | मनिष

भयंकर आवडले! बाकी इंस्टींक्ट बद्द्ल बोलता येईल...पण दोन्ही बाजूंची अपरिहार्यता अनुभवली आहे. असो! :)

विकास's picture

1 Dec 2009 - 12:41 am | विकास

लेख आवडला...

जगात काहीच फुकट नसते. "दुरून डोंगर साजरे" ही म्हण उगाच आली नाही. तेंव्हा "आत्याबाईला मिशा असत्या तर" असे म्हणण्यात काही अर्थ नसतो :-)

भानस's picture

1 Dec 2009 - 7:24 am | भानस

काहींची सोपी आणि काहींची काढूनही सदाच अपूर्ण राहिलेली....पर्यायाने अतिशय दुखावणारी...... लेख आवडला. समोर दोन किंवा त्यापेक्षाही अधिक पर्याय दिसणे हेच त्रासदायक.... पुढचे तर.... ज्याचे त्याचे निर्णय व त्यामुळे मिळणारे प्लस-मायनस....:)

प्रदीप's picture

1 Dec 2009 - 11:26 am | प्रदीप

मोजक्याच शब्दांत नेमकी मांडणी. लेख आवडला.

Nile's picture

1 Dec 2009 - 11:34 am | Nile

लेख आवडला, एकच साम्य दिसले ते शेवटच्या वाक्यातील निवडलेल्या पर्यायात. :)

शाहरुख's picture

1 Dec 2009 - 11:41 am | शाहरुख

आवडले..