माझं नाव शिल्पा..
नाव मोठं आणी लक्षण खोटं म्हणतात अगदी तस्सं.
मी खुप सुंदर असणार दिसायला असच वाटुन तिने माझं नाव ठरवले असणार..
असो. तर मी शिल्पा.. जन्माने नि:शक्त.. पुढच्या आयुष्यात औषधाने फ़रक पडण्याची अपेक्षा नसलेली.. mental retardetion घेउन जन्माला आलेली. पहिले ७ दिवस तर डोळेही उघडले नाहीत मी. मला म्हणे पिवळ्या झाला होता. आणि oxizen वर ठेवायची वेळ आली होती. किती कुजबुज झाली असेल तेव्हा देवालाच माहीत.. कारण आई जवळ माझे बाबा ठामपणॆ उभे होते.. हो, त्यात तिचा तरी काय दोष होता? कोणत्या आईला वाटेल तिच्या पोटी असे बाळ जन्माला यावे?
आईने माझे खुप काही केले. कुठे कुठे दवाखान्यात नेले. औषधे दिली, मालिश केली.. आमच्या शहरात थंडी खुप पडायची, नेहमी माझ्या नाकात हिरव्या रंगाचा शेंबुड असायचा. निट पाय जमिनीला टेकायचे नाहीत. बाबा फ़कीर करुन झाले, पण काही फ़रक पडेना. मग एका व्यक्ती देवासारखा भेटला.. त्याने आईला काय सांगीतले ते तेव्हा कळले नाही, पण लगेच मला दवाखान्याच्या वाऱ्या करवणे एकदम कमी झाले.आता घरची कामे थोडी लवकर उरकुन आई माझ्या जवळ ३-४ तास बसायची, छान छान गोष्टी सांगायची, गाणी म्हणुन दाखवायची, रंगीत मणी मला ओवायला द्यायची, हातात लोकरीचा गोंडा देऊन मला पाय टेकवून चालायला शिकवायची. हळुहळू मला चालता यायला लागले पण तेव्हा पर्यन्त मी ३ वर्षाचे झाली होते.
मग एक दिवस मला शाळेत घातले. मला माझे स्वत:चे काहीच करता येत नव्हते, बाकी मुलं मुली किती छान गाणी म्हणायची? खेळ खेळायची आणि मी नुसती त्यांच्याकडे बघत बसली असायचे. पण रोज शाळेत गेल्यामुळे मग मला ते आपल्यात सामावून घ्यायला लागले, आणि आमची टीचर तर खुपच चांगली होती. आणि त्या शाळेची आया तर अगदी मावशी सारखे माझे लाड करत होती. अर्थात आता मला शाळा आवडायला लागली होती. पण तेव्हा पर्यन्त माझ्या वयाचे अजुन ५ वर्ष संपली होती.
आई अजुनही माझ्या कडे पुर्ण लक्ष ठेवुन होती. आता मी दुसऱ्या शाळेत जाते तिथेही मी गेले १२ वर्ष जातेय, म्हणावी तितकी प्रगती नाही झाली अजुन, पण लोकांना फ़रक जाणवण्या इतपत नक्कीच मी काहीतरी केले आहे असे वाटते. आईचे अजुनही माझ्या साठी वेळ देणे संपले नाहीय, ती नेहमी शाळेत येते, आम्हाला सगळ्यांना गाणी शिकवते, डांस शिकवते, खेळ शिकवते, पण आता ती थकलीय, तिच्याने शारिरीक मेहनत होत नाही आता. मला तिची उतराई करायचे आहे, कशी करू? सांगाल का कोणी ? पण मला समजेल अशा भाषेत सांगा बरं कारण मला बोलता येत नाही. त्यामुळे मला काही समजले नाही तर मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजणार नाही. आईला बरोबर कळायचे मला काय हवयं ते...
प्रसन्ना जीके
प्रतिक्रिया
29 Nov 2009 - 8:59 pm | बिपिन कार्यकर्ते
खूप जवळून बघितलंय. खूप जिव्हारी लागलं वाचून... मला तरी काहीच सुचत नाहीये. बघू इतर काय सल्ले येतात ते...
बिपिन कार्यकर्ते
30 Nov 2009 - 12:29 am | स्वाती२
डोळ्यात पाणी आलं वाचून.
30 Nov 2009 - 5:00 am | मदनबाण
हं... :(
"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी "
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
30 Nov 2009 - 7:16 am | हर्षद आनंदी
आईच्या ऊपकारातुन मुक्त होणे केवळ अशक्य.. त्या उपकाराचे सतत स्मरण ठेवुन वार्धक्यात माऊलीच्या चेहर्यावर सतत आनंद, हसु असेल असे काहीतरी करायचा प्रयत्न करा, बास! अजुन काय सांगणार...
|| जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपी गरियसी ||
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
30 Nov 2009 - 10:20 am | पर्नल नेने मराठे
निशब्द.....
चुचु
30 Nov 2009 - 1:29 pm | गणपा
काय बोलु ?
वाचुन सुन्न व्हायला झालय..
30 Nov 2009 - 6:35 pm | दशानन
निशब्द केलेत.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
30 Nov 2009 - 6:38 pm | टारझन
!
30 Nov 2009 - 7:08 pm | jaypal
अन काय लिहु?
कालच वाचलं होत पण विचार करुन प्रतिक्रिया द्यावि म्हणुन थांबलो होतो.
नेहमी आनंदी, तुम्ही मला मतीबंद केलात.
मतीबंद
जयपाल
30 Nov 2009 - 9:05 pm | चतुरंग
काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. तुमच्या मनात आईचे उतराई होण्याची भावना आली ह्यातच सगळे आले. त्या माऊलीला ते भरुन पावले. त्या आईला माझा साष्टांग नमस्कार सांगा.
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार वाहे
(रिक्त)चतुरंग
30 Nov 2009 - 9:14 pm | प्रभो
..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
30 Nov 2009 - 9:50 pm | भोचक
काय बोलणार?
गेल्या वर्षी मेघना पेठेंनी संपादित केलेल्या दिवाळी अंकात हाच विषय होता. तो वाचून तेव्हाही असंच अस्वस्थ व्हायला झालं होतं.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
1 Dec 2009 - 12:45 am | वरदा
बापरे सुन्न झाले हे वाचून..मी खरच इतकी मोठी नाही की काही सल्ला द्यावा पण त्या माऊलीला आणि तिची उतराई होऊ पहाणार्या मुलीला माझा नमस्कार..
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
1 Dec 2009 - 7:15 am | भानस
चतुरंग यांचेशी सहमत. आपल्या मुलीला इतके कळू लागलेय यातच आईच्या प्रेमाचे-कष्टांचे सार्थक होते आहेच. दुसरी अतिशय महत्वाची बाजू म्हणजे आईने आकाशपाताळ एक केले तरीही तुम्ही जर तिला तुमच्याकडून शक्य तितकी साथ दिली नसतीत तर यातले काहीच शक्य नव्हते. इतक्या टोकाच्या विपरीत-विकलांग अवस्थेत आईच्या तळमळीला तुम्ही प्रयत्नांची जोड दिलीत हेही एक प्रकारे उतराई होणेच आहे. नाहीतर आज त्या माऊलीला किती तरी जास्त यातना होत असत्या. तुमच्या आईला नमस्कार व तुम्हाला अनेक शुभेच्छा!