वाचक हो तुमच्या सोयी करता माझ्या ब्लॉग वरिल लेख मालिका इथे सुरु करीत आहे.
मी माझ्या कुवतीनुसार गेल्या ५५ वर्षात जे अनुभवले, त्यांमुळे मला उमजलेले शब्दांचे अर्थ, शब्दकोशातील अर्थ कोमेजलेली वाटतात.
अर्थ = शब्दांची समज, अर्थकारणात
अर्थकारण = सगळ्या खटाटोपाचे कारण अर्थ, पैसा गीळण्याची कला
सुख = दुसर्यास छळण्याचे, दूसर्यांनी माझ्याकडून पळवले, मी अजून चाचपडतो आहे
शांती = समजली तर नाहीतर दुर्मिळ प्रकार, नावाच्या व्यक्ती अशांत व अशांतता देणार्या होत्या
लेखक = बरेचसे लेखनिक, कॉपी-पेस्ट प्रावीण्य मिळवलेले
कायदा = तुम्ही काय काय केव्हा कुठे आणि किती देणार ह्याची यादी
नियम = कोणीही स्वतः:चे हित शोधण्या करिता केलेला खटाटोप
स्वयंसेवक = बरेचसे स्वकेंद्रित स्वहित शोधणारे
इंग्रजी शब्दांचे माझे अर्थ -
अंडरस्टॅन्ड = मोठ्यासमोर लहानाने झुकणे, ह्या शब्दाचा हक्क बापाला मुलांशी बोलताना असतो, मुलाला नाही. तसेच बॉसला इतर कर्मच्यार्यांशी बोलताना असतो. एकतर्फी वापराचा शब्द.
ऑथर = जबाबदारी पूर्वक लिखाण करणारा
रायीटर = कॉपी-पेस्ट प्रावीण्य मिळवलेला सांगकाम्या
युअर्स फेथफुली = लांगुलचालन, विश्वास घातकी ( पत्राचा शेवट विथ रीगार्डस सुयोग्य आहे )
सो सॉ... री = मनातून आनंद तोंडावर खेद. ( अहो खरंच खेद दर्शविण्यासाठी सांगा " क्षमस्व, दु:खात सहभागी...." )
एज्युकेटेड = शिकवलेला, शिकलेला नाही. ( बरेचसे, प्रमाणित गळाकांपू, खिसेकापू )
लर्नेड = अनुभवाने शिकलेला
टेक्नॉलॉजी = तर्कशुद्ध तंत्रज्ञान मांडणी ( technique logically told )
टेक्निशियन = तंत्र कार्यक्षमतेने वापरणार ( efficient technique user )
डिग्री होल्डर / ग्रॅज्युएट = एक दर्जा मिळवलेला ( डोकं असल्याची पावती नव्हे )
मास्टर = एखाद्या विषयातील प्रभुत्व मिळवलेला
डॉक्टर = एखाद्या विषयाची अभ्यासपूर्वक नावीन्याने सिद्धता सांगणारा
इराणी / फारसी भाषेतून घडलेले विनोद -
सर्मा खोरदाम = सर्दी झाली. ( मी शब्दशः अर्थ केला - खोरदाम = मी खाल्ले, मी मित्राला विचारले - सकाळी
नाश्ता नाही केलास? सर्दी का खाल्ली? )
फेदार सूख्ते = जळला तुझा बाप ( माझ्या मित्राने त्याच्या मुलाला झापले असताना - " फेदार सूख्ते, बेशरम घरी येऊन हजेरी घेतो... " मी सहज विचारले - " तो तुझा सावत्र मुलगा आहे का ? " )
पीच = वळण आणि पीच मोहरे = नट बोल्ट एका इराणी मित्राने मला विचारले " रस्त्याने १२० किमी ने जाताना पीच दिसला तर काय करशील? " मी " खाली उतरून बघेन माझ्या उपयोगाचा असल्यास उचलून वळण घेऊन मार्गी लागेन "
इराणी / फारसी भाषेची अधिक माहिती हवी असल्यास...... संपर्क स्काईप आयडी - skillsvk
प्रतिक्रिया
29 Nov 2009 - 7:16 pm | बट्ट्याबोळ
बोर !