(आळस घालवायला) एक कोडे

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
26 Nov 2009 - 12:27 pm
गाभा: 

प्रेरणा - एक आणि दोन.

कोडे -

एका व्यक्तीस आज एक ढकलपत्र मिळाले ज्यात, ते ढकलपत्र आणखी आठ जणांना पाठवून देण्याबाबत विनंती केली होती. त्या व्यक्तीने दुसर्‍या दिवशी ते ढकलपत्र आपल्या आठ मित्रांस पाठवून दिले. त्या आठही जणांनी, त्यांना मिळाल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी ते ढकलपत्र आपापल्या आणखी आठ मित्रांना पाठवून दिले.

ढकलपत्र मिळालेल्या प्रत्येकाने ते ढकलपत्र दुसर्‍या दिवशी आपल्या आठ मित्रांना पाठवले. कुणालाही ढकलपत्र दुसर्‍यांदा मिळाले नाही.

असा क्रम एकूण तीस दिवस चालला तर, किती जणांपर्यंत ते ढकलपत्र पोचले?

अवांतर - शारिरीक आळस आला असेल तर, बौद्धिक व्यायाम घ्यावा. मानसिक आळस आला असेल तर, शारिरीक श्रम करावेत. दोन्ही असेल तर, झोप काढावी!

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Nov 2009 - 12:33 pm | अवलिया

जगाची तेवढी लोकसंख्या आहे का ?

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

अवलिया's picture

26 Nov 2009 - 12:33 pm | अवलिया

जगाची तेवढी लोकसंख्या आहे का ?

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

अवलिया's picture

26 Nov 2009 - 12:33 pm | अवलिया

जगाची तेवढी लोकसंख्या आहे का ?

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2009 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न अंमळ गंडले आहेत. "एका इमेल आय.डी.वर तेच ढकलपत्र पुन्हा आलं नाही" अशी अट लिहीली तर जगाच्या लोकसंख्येचा विचार करावा लागणार नाही. "आता मोड बोटे बेंबट्या!"

उत्तर सुनीलभाऊंना व्यनी केलं आहे.

अदिती

Nile's picture

26 Nov 2009 - 1:42 pm | Nile

इंटरेस्टींग मुद्दा.

मला वाटतं भारतीय लोक हे जगात सर्वात 'जास्त इमेल खाती पर माणशी' असं बिरुद मिरवत असावेत. माझ्या मित्र-सहकार्‍यांच्या माहितीवरुन सरासरी ५ इमेल खाती पर माणशी असं धरुन चाललं तरी सुद्धा एकुण इमेल खाती= 6,692,030,277*5=33460154000 (आजची लोकसंख्या*५)

फारच छोटी संख्या आहे :)

कुतुहलापोटी म्हणुन माहीती काढ्ली तर जीमेल+याहु+एमएसएन खाती< १००*१०^६ (एप्रील २००४).

Nile's picture

26 Nov 2009 - 12:51 pm | Nile

गणित सोप्पं आहे.

उत्तरः जॉमेट्रीकल प्रोग्रेशन ने काढता येइल. रेशो=८.
तर उत्तर= १+८+८*८+८*८*८+...+८*८*....*८(३० वेळा)= १.४१५*१०^२७. (approx)

मेघवेडा's picture

26 Nov 2009 - 3:14 pm | मेघवेडा

सुरुवात कुठून झाली हे कळल्याशिवाय उत्तर काढणे कठीण आहे!

एका व्यक्तीस आज एक ढकलपत्र मिळाले

म्हणजे त्या आधीही ते पत्र ढकलले जात होते नाही का? त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अर्थात प्रश्नातच जर थोडा बदल केला, म्हणजे..
असा क्रम एकूण तीस दिवस चालला तर, किती जणांपर्यंत ते ढकलपत्र पोचले?
च्या ऐवजी "असा क्रम एकूण तीस दिवस चालला तर, या तीस दिवसात किती जणांपर्यंत ते ढकलपत्र पोचले?" या प्रश्नाचे उत्तर श्री. नाईल/ निळे यांनी अगदी व्यवस्थित दिले आहे!

प्रति,
श्री. नाईल/ निळे,

माफ करा, आंग्ल भाषेत एका शब्दाचे अनेक उच्चार होउ शकतात असे म्हणतात! आणि त्यात मी इथे नवीन आहे त्यामुळे तुमच्या नावाचा उच्चार कसा करायचा ते ठाऊक नाही. तुम्ही नाईल की निळे? ;)

सुनील's picture

26 Nov 2009 - 4:18 pm | सुनील

आंग्ल भाषेत एका शब्दाचे अनेक उच्चार होउ शकतात
Nile ह्या शब्दाचे
नाइल
नाईल
णाइल
णाईल
नाइळ
नाईळ
णाइळ
णाईळ
निले
णिले
निळे
णिळे
नायले
णायले
नायळे
णायळे
..
..
..
असे अनेक उच्चार करणे शक्य आहे.

(आळस घालवण्यासाठी) दुसरे कोडे -

एखादा इंग्लिश शब्द घ्या. त्याचे जितके म्हणून शक्य आहेत, तितके उच्चार बनविण्याचा प्रयत्न करा.

वरील कोड्यासाठी उपप्रमेय -
उच्चार करणारी व्यक्ती मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बंगाली असल्यास काय फरक पडेल, ते ओळखा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सूहास's picture

26 Nov 2009 - 5:50 pm | सूहास (not verified)

(|:

सू हा स...