यशवंतराव चव्हाण यांची आज २५ वी पुण्यतीथी.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture
मधु मलुष्टे ज्य... in जनातलं, मनातलं
25 Nov 2009 - 2:40 pm


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज २५ वी पुण्यतीथी. त्यांना आदरांजली.

समाजसद्भावना

प्रतिक्रिया

विनम्र
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विसुनाना's picture

25 Nov 2009 - 3:15 pm | विसुनाना

कॄष्णातीरावरच्या या थोर व्यक्तीला आदरांजली.
"हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला" असे ज्यांच्याबद्दल म्हणतात तेच यशवंतराव.
खर्‍या अर्थाने कलासक्त, गुणग्राहक राजकारणी माणूस.
स्वातंत्र्योत्तर काळात (संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी घेतलेली बोटचेपी भूमिका - 'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे' - सोडली तर..) यशवंतराव चव्हाणांइतका चतुरस्त्र आणि बुलंद नेता महाराष्ट्राला लाभला नाही.

सखाराम_गटणे™'s picture

25 Nov 2009 - 8:46 pm | सखाराम_गटणे™

+१

sneharani's picture

25 Nov 2009 - 3:23 pm | sneharani

आदरांजली.... अशा महान व्यक्तीस..!

सूहास's picture

25 Nov 2009 - 6:39 pm | सूहास (not verified)

बर मग !!

सू हा स...

जर कधी पुस्तक प्रकाशनास बोलावले असले तर आदल्या रात्री ते पुस्तक वाचून / चाळून त्यातील चांगल्या गोष्टी लक्षात ठेवत आणि भाषण हे त्या संदर्भात करत असत. भारतात,अशा प्रकारचे राजकीय नेते विरळाच असतील.

लहानपणी शाळेत मास्तरांनी प्रश्न विचारला की मोठेपणी कोण होयला आवडेल. कोणी म्हणाले टिळक तर कोणी गांधीजी तर कोणी शिवाजी. "यशवंता तू कोण होणार" याचे मास्तरांना उत्तर मिळाले होते की, "मी यशवंतराव चव्हाण होणार!"

१९६२ साली नेहरूंनी फोन करून संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देऊ केल्यावर, ते सभ्यपणे म्हणाले की "मी माझ्या पत्नीस विचारून सांगतो." नेहरूंना याचे खूप आश्चर्य वाटले होते. (बायकोला विचारायची काय गरज आहे?!)

एकीकडे बुद्धीवान आणि देशप्रेमी असलेल्या या नेतृत्वाने कुठेतरी स्वतःला दिल्लीश्वरांपेक्षा लहान समजण्याची मुलभूत चूक केली आणि कुठेतरी (नको तिथे) त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असे वाटते. तशी केली नसती तर बाकी इतरांशी कितीही वैचारीक मतभेद झाले असते तरी त्यांचे नेतृत्व अधिक फुलले असते आणि त्याचा समाजास / देशास अधिक फायदा झाला असता असे वाटते.

त्यांचे पत्नीप्रेम सर्वश्रूत होते. जवळून बघितलेल्या व्यक्तींनी हे पाहीले होते की वेणूताईंच्या निधनानंतर त्यांचा जीवनातील रस निघून गेला होता.