रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस
साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस
तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर
पानापानात शहारा, कणाकणात अंकूर
हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा
खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा
मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा
प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा
मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक
हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक
तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून
शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 4:46 pm | मदनबाण
छान कविता... :)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
25 Nov 2009 - 8:39 pm | श्रावण मोडक
नेहमीप्रमाणेच छान, बोलकी कविता!
25 Nov 2009 - 8:42 pm | मीनल
मस्त आहे.
मीनल.
25 Nov 2009 - 9:41 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 9:58 pm | jaypal
धरेचा श्रुंगार ही आवडला.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जयवीताई, कविता आवडलीच.
आणि ही दाद ...
अदिती
25 Nov 2009 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली...!
-दिलीप बिरुटे
25 Nov 2009 - 10:51 pm | चतुरंग
कविता नेहेमीप्रमाणेच छान आहे!
(आमचा प्रतिसाद इथेही वाचता येईल.)
चतुरंग
25 Nov 2009 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता आवडलीच. एकदम चित्रदर्शी. डोळ्यासमोर उभे केले ते वातावरण.
बिपिन कार्यकर्ते
25 Nov 2009 - 11:45 pm | विसोबा खेचर
वा जयू..!
जियो..
(जयूचा फ्यॅन) तात्या.
26 Nov 2009 - 10:33 am | sneharani
सुंदर कविता...!
26 Nov 2009 - 10:40 am | भानस
जयश्री कविता आवडली गं.... आणि स्फुर्तीकारणही......:)
26 Nov 2009 - 8:27 pm | जयवी
मनापासून धन्यवाद लोक्स :)
माझी कविता इतक्या माज, डास,खाजांना कारणीभूत ठरली ह्याचा विशेष आनंद वाटतोय ;)