डिस्क्लेमर: आमच्यात मुहूर्ताची वाट पहात नाहीत, त्यामुळे उगा बुधवार, शनिवार का करत बसा? टाकलं आजच हे विडंबन!
दिवस होता काळाकुट्ट आणि रात्रही वैर्याची
लेख होता गलितगात्र, टायनीयुआरेलही बावचळलेली
आला प्रतिकूल प्रतिसाद अशाच वेळी
ज्याची होती मनात भीती ठासलेली
"डोक्याचं भिरभिरं करून गेला जगभरचा प्रवास
धाग्याच खफ करू इथे आजच खास!"
अशाच एका धाग्यावर मस्ती होती केली
धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली
त्याक्षणी विचार चमकला एकदम डोक्यांत सगळ्या
शालजोडीचे हाणता येतील आता इथेच वाटू मिर्या
तेव्हापासून सुरू झाला नवा डाव
आता आहे नवा भिडू आणि नवा राज
प्रतिक्रिया
24 Nov 2009 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते
वल्लाह!!! क्या बात है!!! बहुत खूब. कविता वाचताना ती प्रत्यक्ष जगल्याची अनुभूती आली. ;)
लेख होता गलितगात्र
हे मनाला भिडलं.
बिपिन कार्यकर्ते
24 Nov 2009 - 4:04 pm | श्रावण मोडक
हुच्च कविता. ;)
24 Nov 2009 - 4:07 pm | प्रसन्न केसकर
अशाच एका धाग्यावर मस्ती होती केली
धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली
या ओळी हळवं करुन गेल्या
24 Nov 2009 - 4:08 pm | sneharani
क्या बात ...!
मस्तच..!
24 Nov 2009 - 4:15 pm | नंदन
क्या बात है!
>>> टायनीयुआरेलही बावचळलेली
--- हे चुकून टायलिनॉलही बावचळलेली असं वाटलं आणि अशा वारंवार ओढवणार्या अग्निदिव्यांनंतर डोकेदुखी हलकी करणारे औषधही बावचळले की काय हे वाचून अंमळ हतबुद्ध झालो.
>>> धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली
--- सुंभ, पीळ अशी कायशीशी एक म्हण आहे; ती आठवली. बाकी प्रसन्नदांशी सहमत आहे. हा शेर का.भि. नि अं.ह.झा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Nov 2009 - 4:10 am | Nile
हा हा हा!
अरे काय चाल्लय काय? (घाटवरचे भट यांना अनुमोदन समजा.)
24 Nov 2009 - 4:22 pm | llपुण्याचे पेशवेll
अदितीजी,
पुनश्च एकदा आपणास सांगू इच्छीतो आपले विचार चांगले आहेत पण व्यक्त करण्याचे माध्यम चूकीचे. या विषयावरील एक लेख पूर्वी मी लिहीला होता, आत्ता तो डिजीटल स्वरूपात माझ्यापाशी नाही; जर कोणाची मदत मिळाली तर उनिकोदात टाकून नक्की चढवीन इथे.
मी आपणास पुनश्च एकदा खेदाने सांगू इच्छितो की आपणास पाककृती आणि कविता बिलकूल जमत नाहीत .(असल्या कविता करण्यापेक्षा लोखंडाचे चणे खा! वेळ चांगला जाईल)
आपले आवडलेले विचार पुढील प्रमाणे
त्याक्षणी विचार चमकला एकदम डोक्यांत सगळ्या
शालजोडीचे हाणता येतील आता इथेच वाटू मिर्या
तेव्हापासून सुरू झाला नवा डाव
आता आहे नवा भिडू आणि नवा राज
असो. पुढील लेखनास शुभेच्छा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
24 Nov 2009 - 4:42 pm | विजुभाऊ
तेव्हापासून सुरू झाला नवा डाव
आता आहे नवा भिडू आणि नवा राज
यमक जुळवताना या ओळी
तेव्हापासून सुरू झाला नवा डाव
आहे नवा भिडू ; मिळे नवा वाव
अशा आल्या असत्या तर अधीक समृद्ध झाल्या असत्या.
किंवा
तेव्हापासून सुरू झाला नवा डाव
येईल नवा भिडू ;डोक्याला नवी काव काव
असे केले तर अर्थ वैचारीक दिवाळखोरीपासून बरेच दूर घेऊन गेला असता
24 Nov 2009 - 6:14 pm | चित्रा
अदितीबाई आदरातिथ्य खूप छान करतात की. यमकेही जमतील की तशीच हळूहळू. ;)
वातावरण निर्मिती छान.
24 Nov 2009 - 4:29 pm | निखिल देशपांडे
वा ... कविता आवडली.... हे एक विडंबन नसुन एक वेगळी कविता आहे असे वाटते.
बाकी.
अशाच एका धाग्यावर मस्ती होती केली
धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली
ह्या ओळी अंमळ हळव्या करुन गेल्या.. असेच म्हणतो
(हळवा अर्थातच आयटीतील)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Nov 2009 - 4:39 pm | धमाल मुलगा
अगदी हो परखड..परखड हो अगदी!
असो, हल्ली ना आम्ही संतप्त होतो, ना शरमिंदे!
बाकी, आपली मर्जी!
-(मिनी शंकराचार्य!) आद्य धमालाचार्य.
24 Nov 2009 - 4:42 pm | घाटावरचे भट
आईल्ला!! हे हो काय???
24 Nov 2009 - 4:50 pm | अमृतांजन
फारच अफलातून कविता. कसं काय हो सुचतं तुम्हाला हे असं?
24 Nov 2009 - 4:56 pm | सूहास (not verified)
केवळ टी.आर.पी. वाढविण्यासाठी आपण हे पत्र ..आपल हे ..विडंबन केल्याचे दिसते ..
असो ..
छान..
शीर्षक तर मनाला भिडले !!
सू हा स...
24 Nov 2009 - 5:00 pm | मनीषा
अशाच एका धाग्यावर मस्ती होती केली
धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली
हे नेहमी असच का होतं?
हा अवकाळी पाउसही छान होता ..
(धाग्याच खफ करू इथे आजच खास!"
हे वाक्य "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे--" च्या चालीत म्हणून बघा ... बरोबर जमते आहे )
24 Nov 2009 - 5:24 pm | ब्रिटिश टिंग्या
विषुववृत्तावर दररोज पाऊस पडतो असे ऐकले होते!
असो, आमच्यामुळे कोणीही दुखावु नये म्हणुन मुळ कवितेला प्रतिसाद देणे कटाक्षाने टाळत आहे!
- (आणि हो, सहीचे विडंबन करणेदेखील टाळत आहे) टिंग्या
24 Nov 2009 - 5:41 pm | अवलिया
नव निर्वाचित संपादकांच्या निरागस मनाला यातना होवु नये म्हणुन कवितेवर विशेष टिपण्णी करणे टाळले असुन आमच्यामुळे कुणालाही शरम आणि दुःख वाटु नये म्हणुन प्रतिसाद काढुन टाकला आहे.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 6:00 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे परम दोस्त ब्रिटीशजी टिंग्याजी व अवलियाजी ह्यांच्याशी सहमत आहे. 'प्रेरणा' घेउन प्रेरीत झालेल्या कवितांना तसेच विडंबनांना आम्ही प्रतिसाद दिला की काही लोकांना दु:ख होते असे कळले आहे त्यामुळे 'पद्य वाचले' येव्हडाच प्रतिसाद देत आहे.
हल्ली पेशव्यांनी सहीत वाक्य लिहिणे बंद केले आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 Nov 2009 - 7:39 pm | विसोबा खेचर
ती खोडी अर्थातच पुन्हा पुन्हा मोडून काढली जाईल.. :)
या धाग्याचाही काही मंडळींनी अवांतर प्रतिसाद लिहून खफ बनवला होता. ते सर्व प्रतिसाद उडवून लावून तीही खोडी मोडली आहे..!
अवांतर प्रतिसाद टंकायला दोन-पाच मिनिटं लागतात, उडवायला काही क्षण! घ्या लेको लिहिण्याचे कष्ट! :)
आपला,
(सगळ्यांच्या सगळ्या खोड्यांना पुरून उरणारा) तात्या.
24 Nov 2009 - 8:06 pm | प्रभो
चालू द्या...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
24 Nov 2009 - 10:51 pm | jaypal
आगाआया आया........




"अशाच एका धाग्यावर मस्ती होती केली
धागा झाला साफ आणि खोडी मात्र राहिलेली"
आमच्या पा.क्रु.चा आस्वादघ्या "मस्त खा स्वस्थ रहा"
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 Nov 2009 - 11:30 pm | भानस
विडंबनाची प्रेरणा अज्ञात असल्याने नेमके शल्य उमगले नसले तरी काही ओळींतून ते पोचले....शिवाय एका दगडात...आय मीन विडंबनात बरेच पक्षी टिपलेत...:)
25 Nov 2009 - 12:21 am | शाहरुख
सभ्यतेच्या चौकटीत राहून तरल विडंबनाची उत्कट अनूभुती देणारी हळूवार परंतु सशक्त कविता !!