ईआयडी

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
20 Nov 2009 - 8:21 am

संध्याकाळी पोस्ट ऑफिसात गेलो होतो. गाडी लावून आत जाऊन पहातो तर ढीगभर गर्दी. दोनच सेल्स क्लर्क, त्यामुळे रांग हळूहळू पुढे सरकत होती. तेंव्हाचा संवादः

जोडीने आलेले एक चिनी वंशाची वाटावी अशी स्त्री आणि तिच्याबरोबरचा कॉकेशियन तरूण त्यांचा नंबर आल्यावर एका काउंटरपाशी जाऊन थांबले. त्यांनी आणलेले पार्सल हातावेगळे झाल्यावर क्लर्क ने त्यांना विचारले, "Any stamps with that?" त्या दोघांनी मान हलवली, "Sure, give us a couple of booklets." "Which ones? The holiday series?" भिंतीवरच्या पोस्टरकडे हात दाखवत क्लर्कने विचारलं. त्या पुरुषाने सोबतच्या स्त्रीकडे पाहत म्हंटलं, "Sure, why not? It is festive season anyway. Which ones would you like?" तिने पोस्टरकडे पाहिलं, "Christmas, Hanukkah, Kwanzaa...what is that last one?"

त्या क्लर्कने पाहिलं, "That one? I am not sure..." शेजारच्या क्लर्कला तिने विचारलं "Do you know what E I D is?"

"Don't know, I guess it's some acronym.. E...I...D..not sure what is stands for...मे बी समथिंग बुढिस्ट (बुद्धिस्ट!)...look at the script."

"No-o-o-o!" चिनी स्त्रीने म्हंटले, "That's not the script I know."

"Oh! Then I am not sure, anybody knows?"

मी आजुबाजूला कुणी उत्तर volunteer करतंय का ते पाहिलं, सर्वांचेच चेहेरे कोरे.

म्हंटलं "दॅट्स ईद, इट्स अ मुस्लिम रिलिजस हॉलिडे."

"Oh! Never heard of that." क्लर्क म्हणाली. "Thanks for letting us know."

"Thanks, Sir, but I think we will go for the other one," हानुकाच्या स्टँप कडे बोट दाखवत तो तरूण म्हणाला.

मी नंतर बाहेर येतांना विचार करत होतो... अमेरिकेत हॉलिडे स्टँप्स मध्ये ईद चे स्टँप आधी कधी पाहिल्याचं आठवत नव्हतं...नव्या राजवटीचा परिणाम की उदारमतवादाचा प्रादुर्भाव? ...कदाचित दोन मुस्लिम देशांमध्ये युद्ध करत असलेल्या या देशात आता मुस्लिम धर्माविषयी sensitivity निर्माण व्हावी म्हणून घेतलेला निर्णय असावा.

नंतर रस्त्याला लागल्यावर माझ्या लक्षात आलं, त्या सगळ्या स्टँप्समध्ये भारतीय दिवाळी काही दिसली नाही.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

Nile's picture

22 Nov 2009 - 4:27 am | Nile

हा हा! मस्त किस्सा! आवडला.

शाहरुख's picture

22 Nov 2009 - 4:43 am | शाहरुख

दिवाळीची टपाल तिकिटं न काढल्याबद्दल ओबामा सरकारचा कडकडीत निषेध !!

विकास's picture

22 Nov 2009 - 5:03 am | विकास

नंतर रस्त्याला लागल्यावर माझ्या लक्षात आलं, त्या सगळ्या स्टँप्समध्ये भारतीय दिवाळी काही दिसली नाही.

अमेरिकेत बहुतांशी गोष्टी या "सिस्टीम" माहीत असेल तर सहजतेने होऊ शकतात. त्यात जर संस्कृती, धर्म वगैरेचा संबंध असेल तर आपण एक समाज म्हणून न लाजता (याचा अर्थ गर्वसे कहो असा नाही!) किती एकत्रीत राहून स्वतःला (समाजाला) पुढे करू शकतो यावर अवलंबून असते, ते कुठेही असते.

दिवाळी स्टँपचा प्रयत्न आधी कधी कोणी केला होता का ते माहीत नाही. मात्र "हिंदू अमेरिकन फाउंडेशन" (एचएएफ) ह्या बहुतांशी अमेरिकेत जन्माला आलेली अथवा वाढलेली जी पेशाने डॉक्टर, वकील, पत्रकार, इंजिनियर आदी मधे यशस्वी झालेली तरूण "हिंदू" पिढी आहे त्यांनी चालू केलेली संघटनेने हा मुद्दा पुढे रेटला आहे. त्यांनी त्यासाठी सह्याघेण्याची मोहीम पण केली आणि टपाल खात्यास प्रस्तावपण सादर केला आहे. अर्थात इथल्या सरकारी पद्धतीप्रमाणे त्यावरील अधिकृत घेण्यास २०१२ साल उजाडणार आहे आणि तेंव्हा देखील नियमाने खाते आणि सरकार निर्णय काय झाला हे सांगायला बांधील नाही. ह्यावर वास्तवीक इतर प्रोफेशनल भारतीयांनी आणि जे कोणी सिनेट, काँग्रेस निवडणूकात आर्थिक मदत करत असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या काँग्रेसमन/सिनेटरच्या कानावर पण हे घालणे महत्वाचे आहे (उ.दा. काँग्रेसमधे यावर बिल सादर झाले आहे.). कारण सरकारी निर्णय हे नियमापेक्षा राजकीय संपर्काने त्वरीत होऊ शकतात. विश्व हिंदू परीषद ऑफ अमेरिकेने पण असे आवाहन केले आहे मात्र त्यांनी इतके 'सिस्टीमॅटीक" केले आहे का याबद्दल माहीती नाही.

किमान बुश बाबा आल्यावर व्हाईट हाऊस मधे दिवाळी सुरू झाली आणि ओबामाने स्वतः हजर राहून त्याला अजूनच राजमान्यता दिली. एचएएफ त्यामधे पण पुढे होती हे माहीत आहे.

जेंव्हा अशी मागणी करणे ही ह्या संस्थांचीच जबाबदारी नसून आपली देखील आहे असे वाटेल तेंव्हा हे चित्र बदलू शकेल...

Nile's picture

22 Nov 2009 - 11:22 am | Nile

वा! विकासराव ये हुई ना बात!

स्वाती२'s picture

22 Nov 2009 - 5:54 pm | स्वाती२

माहितीबद्दल धन्यवाद. म्हणजे आता आपापल्या काँग्रेसमनला सांगायची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. एकंदरीत या बिलाबद्दल फारशी कुणाला माहिती नसावी. तेव्हा ही माहिती इंडिया असोशिएशन आणि इतर प्रादेशीक मंडळांतर्फे जास्तीतजास्त लोकांकडे पोहोचणेही महत्वाचे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Nov 2009 - 8:23 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री बहुगुणी, रोचक अनुभव. कदाचित एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूधर्मीयांची संख्या कमी असावी, हे कारण असावे. मुस्लिम धर्मीयांची संख्या हिंदूंपेक्षा पन्नास टक्क्यांनी अधिक आहे. (दुवा)
______________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

निमीत्त मात्र's picture

22 Nov 2009 - 8:24 am | निमीत्त मात्र

दिवाळीचा स्ट्यांप अमेरिकेत का नाही म्हणून रडणार्‍यांनी माझ्या मते सरळ भारतात परत जावे.

विंजिनेर's picture

22 Nov 2009 - 9:18 am | विंजिनेर

स्वतः अमेरिकेत असताना कोणी भारतात जावे किंवा जाऊ नये असे अनाहून सल्ले देऊन "उंटावरून शेळ्या हाकू नये"
(गलित गात्र)विंजिनेर

Nile's picture

22 Nov 2009 - 10:58 am | Nile

विंजीनेर साहेबांशी सहमत आहे. अर्थात मला तरी कुणी इथे रडताना दिसलं नाही, पण ज्या रंगाचा चष्मा तसं जग भासतं त्याप्रमाणे स्वत:ची जी वृत्ती तसेच जग वाटते की काय(काही लोकांना)?

-एन.सी.सी छात्र.

आण्णा चिंबोरी's picture

22 Nov 2009 - 11:48 am | आण्णा चिंबोरी

अमेरिकेत दिवाळीचा ष्टांप असावा की नाही व तेथील नागरिकांनी ष्टांप नसल्यास रडावे की नाचावे हा अमेरिकेचा व तेथील नागरिकांशी संबंधित अंतर्गत प्रश्न आहे. भारतीयांनी त्यात नाक खुपसू नये.

त्याचप्रमाणे अमेरिकनांनीही भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसू नये.

टारझन's picture

22 Nov 2009 - 7:15 pm | टारझन

अमेरिकेचा भारतिय सणांशी बादरायण संबंध लावण्याचा हस्यास्पद प्रयत्न !!
च्यायला .. आता अमेरिकेत बा चं श्राद्ध घालत नाहीत म्हणून पण निषेध करा गळे फाडा ;)

बाय दं वे भारतात अमेरिकन इंडिपेंडन्स डे ची सुट्टी नसल्याबद्दल भारताचा जाहीर निषेध =))

- टी

विकास's picture

22 Nov 2009 - 8:30 pm | विकास

अमेरिकेत दिवाळीचा ष्टांप असावा की नाही व तेथील नागरिकांनी ष्टांप नसल्यास रडावे की नाचावे हा अमेरिकेचा व तेथील नागरिकांशी संबंधित अंतर्गत प्रश्न आहे. भारतीयांनी त्यात नाक खुपसू नये.

बरोबर आहे आणि हा प्रश्न उचलून धरणारे अमेरिकन नागरीकच आहेत. भारतीयांचे म्हणून फक्त दोनच सण म्हणता येतीलः एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरा प्रजासत्ताक दिन. :-) दिवाळी हा जरी विविध धर्मीय भारतीय साजरी करत असले तरी तो "हिंदू सण" म्हणूनच मानला जातो ज्याचे मूळ भारतात आहे.

आज अमेरिकेत केवळ भारतातून आलेले विद्यार्थी आणि व्यावसायीक परवान्यावरील भारतीय नाहीत तर. ज्यांच्याकडे कायमस्वरूपी रहीवासी (अर्थात green card holders/permanent residents), ज्यांनी अमेरिकन नागरीकत्व घेतले असे आणि ज्यांची मुले अमेरिकेत जन्माला आल्याने अमेरिकन्स आहेत असे आहेतच, पण असे ही भारतीय आहेत ज्यांच्या ५-६ पिढ्या अफ्रिकेत, दक्षिण अमेरिकेत, कॅरिबिअन बेटांच्या समुहात राहीलेल्या आहेत तसेच इतरत्र राहीलेले पण. ही माणसे माझ्या-तुमच्यापेक्षा संस्काराने आणि वागणुकीने जास्त हिंदू आहेत. भारतात कधी न जाऊनही (वास्तवीक जाऊ शकले नाहीत, तरी) ह्या पिढ्यांनी आणि त्यांच्या आत्ताच्या वंशजांनी संस्कृतिक आणि भावनीक नाळ तोडलेली नाही आहे. त्यात अजून एक भर म्हणजे असे फार कमी पण वंशाने अ-भारतीय असूनही हिंदू धर्मीय झालेले.... अशा सर्व अमेरिकन नागरीकांचा दिवाळी ह्या सर्वांचा सण आहे आणि त्यांची अशी मागणी असणे यात काहीच गैर नाही.

आता उरला (अप्रत्यक्ष) प्रश्न येथे (मिपावर) लिहीण्याचा... मिपा हे मराठीचे जागतिक संकेतस्थळ आहे. तेथे फक्त महाराष्ट्रातील मराठीच नाहीत तर संपुर्ण भारतातील आहेतच तसेच जगातील इतरत्र असलेले देखील आहेत. त्यात विविध प्रकारच्या चर्चा होणारच ज्या विविध व्यक्ती-प्रवृत्तींशी संबंधीत कधी असतील कधी नसतील...

jaypal's picture

22 Nov 2009 - 10:18 am | jaypal

मिपा वर आता "शिमगा/ धुळवड" होणार तर ! (कोण रे तो बोंबला-बोंबला म्हणतोय......च्या मारी तुझ्या)
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

देवदत्त's picture

22 Nov 2009 - 10:52 am | देवदत्त

आपला अनुभव इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद :)

साल २००० मध्ये कलकत्त्याला गेलो होतो, तेव्हा ही ईद होती. एका मैदानात प्रवेशद्बार बनवून त्यावर EID Mubarak असे लिहिले होते. तेव्हाही मी ते ई आय डी असेच वाचले होते त्याची आठवण झाली. पण तेव्हा नुकतेच परीक्षेचे पेपर देऊन झाल्याने त्यातील वापरण्यात येणारे ID मुळे हा परिणाम असावा असे वाटले होते ;)

आणि गेले २ दिवस ह्या लेखाचे नाव वाचून नंदन नीलकेणी ह्यांच्या UID बद्दलच काही आहे असे वाटले होते.

आण्णा चिंबोरी's picture

22 Nov 2009 - 11:50 am | आण्णा चिंबोरी

वा!!

भारतातील अनुभव सांगितल्याबद्दल धन्यु!!!

स्वाती२'s picture

22 Nov 2009 - 6:10 pm | स्वाती२

छान किस्सा!
९/११ नंतर झालेल्या आवाहनांचा परिणाम म्हणून की काय आमच्या इथे लोकांना सौजन्याचा झटका आलेला. त्या वर्षी आमच्या हिंदू मित्राला त्याच्या दुकानात येणार्‍या बर्‍याच अति उत्साही गिर्‍हाईकांनी ईदीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मग तो हिंदू आहे कळल्यावर माफीही मागितली होती.#o