क्रांतीताईंची कविता वाचुन आम्ही काही कोडि सोडवण्याचा प्रयत्न केला
प्रत्येक याचकाला केली बहाल थाळी
नाहीच जाणले की स्वकीये राहिली भुकेली
साधे गरीब भय्ये नव्हतेच त्या दिशेला
आधार बिहार्यांचा माजोरड्या भिकेला
तोंडात तोबरा अन् उध्दट देहबोली
एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
मुंबई-मराठीचीही वाट लावली मी
नाही एकत्र मराठी, तू घे भाजुन पोळी"
मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
भाषा असुन मराठी, का हिंदी माय बोली
या हिंदीप्रेमी लोकांचा स्वार्थ फक्त होता
जाता जिथे, तिथे का भांडुन मार खाता
ते वाढवीत गेले, नेत्यात तेढ खाली!
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 7:46 pm | धमाल मुलगा
खल्लास!
लढ चेतन लढ बाप्पो :)
बेश्ट कविता! (विडंबनच म्हणुन नव्हे तर वेगळी कविता म्हणुनही उत्तम!)
19 Nov 2009 - 7:58 pm | टारझन
तोडलंस मित्रा !! एकाच ओळीत तोडलंस !!
--
19 Nov 2009 - 8:34 pm | प्रभो
मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
जबहरा
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!