एक धागा सूखाचा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Nov 2009 - 10:28 am

प्रेमचंदांची एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली...
दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम
हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट.
शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय....
अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली. दार थडाथडा आउअटू लागले.
बोचरी थंडी आणि वारा आत येऊ लागला...
पहिल्या मित्राने दुसर्‍याला सांगितले....
जरा दार बंद करतोस का.
दुसरा म्हणाला ...मी दमलोय वणवण भटकून. शिवाय सकाळपासून अन्नाचा कण नाही गेला पोटात.
"माझी काय वेगळी परिस्थिती आहे " पहिला म्हणाला " आपण दोघे ही बरोबर होतो की"
"पण मी आजारी आहे तू उठून दार लाव की"
"माझी पाठ गेलीय कामातून"
"माझ्या पायात गोळे आले आहेत"
दोघेही स्वतः किती शिणलोय हे सांगत होते. कोणाचेच पारडे खाली जात नव्हते.
" मी लहान पणी किती खस्ता खाल्या...... धाकट्या भावंडांचे सर्व मलाच करावे लागायचे. आईचे प्रेम कधी मिळालेच नाही"
"मी सुद्धा ते केलय सावत्र आईचा छळ सोसलाय"
दोघांच्या व्यथा सारख्याच होत्या.
शेवटी दोघानी ठरवले की ज्याने जास्त दु:खे भोगली असतील तो झोपेल आणि दुसरा उठून दार लावेल
" मी लहान पणी फार दु:ख भोगले आहे दारुड्या बापाचा पाठ मोडेस्तोवर मार खाल्लाय" पहिला म्हणाला.
"आणि मी सावत्र आईचा" दुसरा म्हणाला.
" मी जेवत असताना समोरचे ताट भिरकावून दिले होते बापाने. मारहाणीत त्याने माझा हात मोडला"
" सावत्र आईने मला तापल्या तव्याचे चटके दिले होते"
".....@#......."
"!!!......----"
दोघे ही मित्र आपापली दु:खे सांगत होते.
दोघांचीही दु:ख्खे तुल्यबळ होती. कोणीच हार जायला तयार नव्हते.
दोघानीही अगदी आठवत होते त्या वयापासून आठवत होती ती सगळी दु:खे उगाळून झाली.
पहिल्या मित्राला हळूहळु राग येऊ लागला.
बाकी काही नाही निदान इतरांपेक्षा आपल्या कडे अभिमान बाळगावा असे काहितरी होते तेच कोणीतरी हिरावून नेत आहे असे त्याला वाटू लागले.
रागाच्या तिरीमीरीत तो ऊठला त्याने दुसर्‍याला लाथाबुक्क्यानी बदडून काढले.
मित्राला मारताना संतापाने तो रडत होता. मारून मारून पहिला मित्र दमला. दुसरा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला आता माराच्या वेदनाच जाणवत नव्हत्या.
भान आल्यावर पहिल्या मित्राला दुसर्‍याची अवस्था जाणवली. तो खजील झाला. त्याने दुसर्‍याची माफी मागितली. त्याला कुठे लागलेखुपले आएह का ते पाहिले. त्याची पाठ चेपू लागला. दुसरा मित्र ग्लानीत क्षीण हसला.
पहिल्या मित्राला त्या अवस्थेत मित्राचे हसणे पाहून नवल वाटले.
"फार मारले नी मी तुला" पहिला खजील होत म्हणाला
" हरकत नाही ...तू संतापाने मारलेस्.........जाऊदेत. सूखे नव्हतीच कधी आयूष्यात. दु:खेच होती. तु प्रत्येक दु:खाच्या बाबतीत आप्ण समसमान होतो. पणआज मी त्या बाबतीत तुझ्यापेक्षा वरचढ ठरलोय. आपला काहीच दोष नसताना मित्राने; लाथाबुक्यानी मारल्याचे दु:ख मी तुला मिळू देणार नाही"

वावरविचार

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Nov 2009 - 11:29 am | बिपिन कार्यकर्ते

विचार करण्यासारखे खूप काही.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

18 Nov 2009 - 12:09 pm | टारझन

असेच म्हणतो !!!

- टारूभाऊ

प्रभो's picture

18 Nov 2009 - 12:20 pm | प्रभो

असेच म्हणतो!!!

--प्रभोभाऊ
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया's picture

18 Nov 2009 - 12:59 pm | अवलिया

असेच म्हणतो !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

दशानन's picture

18 Nov 2009 - 4:22 pm | दशानन

+५

असेच मी पण म्हणतो.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

धमाल मुलगा's picture

18 Nov 2009 - 6:07 pm | धमाल मुलगा

मी ही असेच म्हणतो.
छान कथा. उत्तम बोध घेण्यासारखी.

गणपा's picture

18 Nov 2009 - 6:55 pm | गणपा

सहमत.
मी पण असेच म्हणतो.

sneharani's picture

18 Nov 2009 - 12:24 pm | sneharani

छानच. अप्रतिम झालीय कथा
असेच म्हणते.

विजुभाऊ's picture

18 Nov 2009 - 1:05 pm | विजुभाऊ

आपल्या पैकी बरेच जण या अवस्थेत असतात.
प्रत्येकाला आपली कोणती तरी गोष्ट सर्वांपेक्षा वरचढ असावी असे वाटत असते.
काही चांगले सांगण्यासारखे नसेल तर असे लोक डोकेदुखी / अपेंडिक्स ऑपरेशन / ओटी पोटाचे दुखणे / सर्दी / नवर्‍याने /सासूने दिलेला त्रास अ‍ॅक्सीडेन्ट वगैरे गोष्टी रंजक बनवून सांगत असतात.

जय महाराष्ट्र.....

भाग्यश्री कुलकर्णी's picture

18 Nov 2009 - 1:43 pm | भाग्यश्री कुलकर्णी

बरोबर आहे अगदी पटले तुमचे म्हणणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2009 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा मस्तच..!!!

>>प्रत्येकाला आपली कोणती तरी गोष्ट सर्वांपेक्षा वरचढ असावी असे वाटत असते.

खरंय....!

अवांतर : विजुभौ, तुमच्या या पोलिसवल्याचा सॅल्यूट लैच भारी.

-दिलीप बिरुटे

किचेन's picture

22 Jan 2012 - 9:52 pm | किचेन

शि. द . फडणीस.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2009 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार

अ प्र ती म !!

विजुभौ सुंदर लिखाण.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सूहास's picture

18 Nov 2009 - 5:56 pm | सूहास (not verified)

"निशब्द"

सू हा स...

jaypal's picture

18 Nov 2009 - 6:08 pm | jaypal


**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भोचक's picture

18 Nov 2009 - 6:16 pm | भोचक
विनायक प्रभू's picture

18 Nov 2009 - 8:06 pm | विनायक प्रभू

विजुभौ

मनीषा's picture

18 Nov 2009 - 9:03 pm | मनीषा

विचार करायला लावणारी कथा आहे ...

" चांगले आयुष्य कसे जगायचे या विवंचनेत आयुष्य जगायचेच राहून गेले" ---

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Nov 2009 - 9:07 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री विजुभाऊ, प्रेमचंदांच्या लघुकथेबद्दल धन्यवाद. दरवाजा शेवटी कोणी बंद केला?

________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

शाहरुख's picture

19 Nov 2009 - 6:01 am | शाहरुख

कथेतून काय बोध घ्यावा ते नाही कळाले.. :?

(बोधकाढू) शाहरुख

निमीत्त मात्र's picture

19 Nov 2009 - 8:57 am | निमीत्त मात्र

मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या . दार कोणी लावावे ह्या भानगडीत पडू नका.

हर्षद आनंदी's picture

19 Nov 2009 - 6:38 am | हर्षद आनंदी

अप्रतिम कथा, खुप काही घेण्यासारखे...

माझी आई नेहमी सांगते, आपल्या वर अनेक असतील, राहतील; पण तु आपल्या खालच्या लोकांकडे बघायला लाग. नक्की सुखी राहशील आणि अजुन वर जाण्याची प्रेरणा मिळेल.

आज पुन्हा प्रत्यय आला... आई हाच सर्वश्रेष्ठ गुरु

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

किचेन's picture

22 Jan 2012 - 9:53 pm | किचेन

सहमत

भानस's picture

19 Nov 2009 - 7:35 am | भानस

विजुभाऊ व हर्षदशी सहमत.

मन१'s picture

16 Jan 2012 - 10:06 pm | मन१

प्रेमचंदास सलाम....