सखये तुझ्या मिठीत.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
18 Nov 2009 - 10:01 am

सखये तुझ्या मिठीत.....

तुज पाहिल्या क्षणी मी , नुरलो जरा न माझा
मग एकटाच होतो , माणसांच्या या दाटीत !
कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली
ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत !
अन्दाज यौवनाचा आला तुला न केंव्हा
सगळे तुझ्यात होते , उजवे किती पटीत !
झंकारलो असा मी , हुंकार तुझा घेण्याला
होकार लाजलेला , कुठल्या सुरावटीत ?
जगणे कधीच गेले , माझे तुझ्या मुठीत
.....जगणे कधीच गेले , माझे तुझ्या मुठीत ;
मरणे जमेल का गं , सखये तुझ्या मिठीत?सखये तुझ्या मिठीत?

शृंगारगझल

प्रतिक्रिया

पॅपिलॉन's picture

18 Nov 2009 - 11:11 am | पॅपिलॉन

कविता आवडली.

पण तुम्ही गझलेच्या सदरात का टाकली ते कळत नाही. गझलेचे सोवळे जरा जास्तच कडक असते आणि ही कविता त्यात पूर्णपणे बसत नाही.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

उदय सप्रे's picture

18 Nov 2009 - 11:44 am | उदय सप्रे

हो , ते चुकीने झाले आहे ! क्षमस्व साहेब !

अमृतांजन's picture

18 Nov 2009 - 12:06 pm | अमृतांजन

खूपच सुंदर काव्य...खूप आवडली.

चांगली कवि - कल्पना!-
कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली
ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत !

गोड अझम्पशन-
अन्दाज यौवनाचा आला तुला न केंव्हा
सगळे तुझ्यात होते , उजवे किती पटीत

क्या बात है!-
होकार लाजलेला , कुठल्या सुरावटीत ?

थोडं प्रोअ॓क्टीव्ह- सुंदर कल्पना-
मरणे जमेल का गं , सखये तुझ्या मिठीत?सखये तुझ्या मिठीत?

अविनाशकुलकर्णी's picture

18 Nov 2009 - 1:22 pm | अविनाशकुलकर्णी

कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली
ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत !

क्या बात है..चाब्ब्बुक

पाषाणभेद's picture

19 Nov 2009 - 7:18 am | पाषाणभेद

मस्त