फ्राक्चर बंड्याची माफी मागून..ह्या काव्याचे हे स्वैर विडंबन...
बंड्या का हवाय तुला पुन्हा खोडरबर..
मागील वेळी हेच कारण सांगुनी नेले ते संपले कसे, लवकर
नाही बंडा, मीच तो तुला पुरता ओळखणारा..
का हवाय तुला पुन्हा तोच कॅनवास,
त्याच रंगाचा पुन्हा तसाच कोरा अन शुभ्र (!?)
एकही रंग नसलेला ,
काय हवे आहे तुला ( ते नीट न कळलेला),
कॅनवासवर ओरखडा नसलेला (!?))
पुन्हा तेच तेच मागतंय बिचारं..
रंग अन कुंचला का नवा हवा..
नव्या चित्राला जुनेही चालतेच..
बंड्या तुला का हवाय नवा कोरा आरसा
अगदी नवा...
(हो रे बाबा)
कुणीच, कधीच
(हे मात्र खूपच)
कशाला स्वतला तुला न्याहाळायचेय...
भावनेशी माझ्या तू जास्त न खेळावे
गप्प बस जरासा...