ऑनलाइन प्रेम

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
12 Nov 2009 - 1:48 pm

ऑफिसात नसलीस की हिरमुसतो मी
सध्या तर गम्मतच ऑनलाइन झुरतो मी

कधी तु बिझी, कधी तु अवे
तुझ्याभोवतीच ऑनलाइन पिंगा घालतो मी

असलीस ऑनलाइन की
तासनतास तुझ्याच फोटोकड़े बघतो मी

डेरिंग नाही होत पिंग करायची
नावावर उगाच माउस नेतो मी

तु नसतेस ऑनलाइन,
तरी उगाच तुला ऑफलाइन पिंगतो मी

कम्युनिकेटरवर गप्पांचा पाउस
समोर आलीस की मात्र गप्प बसतो मी

बीसीसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन
प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी

काय अन कसे सांगु मी
चॅटिंग करता करता ब्लशतो (लाजतो) मी

काहीतरी शोधायची ओढ आहे मनात
हजार वेळा जुनेच चॅट लॉग रिडतो (वाचतो) मी

सध्या कामात लक्ष कुठे आहे
आजकाल ऑनलाइन कविता पाडतो मी

ज़रा विचित्रच आहे ना मी
पण आजकाल असाच वागतो मी

सांगायचे आहे तुला मनीचे बिंग
सांगत काहीच नाही नुसताच पिंगतो मी

प्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2009 - 1:53 pm | पर्नल नेने मराठे

डेरिंग नाही होत पिंग करायची
नावावर उगाच माउस नेतो मी

=)) =)) =))

चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच रे !

कालच तुमच्या ब्लॉगवर वाचली होती. छान जमलीये.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

12 Nov 2009 - 2:09 pm | अवलिया

मालक,

काळजी घ्या !

एखाद दिवशी फाटकन चिडुन तुम्ही क्यांम्प्युटर चिडुन उचलुन खिडकीतुन फेकुन द्याल. रस्त्यावर काचा काचा होतील. जाणारे येणारे दंगा झाला म्हणुन मनसेलाच शिव्या देतील. जमाव गोळा होईल. अजुन कुणाला तरी घरी जायला उशीर होईल. सगळं मोठं रामायण घडेल.

कर भरुन परत तुम्हाला बोलणी खावी लागतील ती वेगळीच.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 3:47 pm | धमाल मुलगा

नाना, एकच नंबर!!
तुमच्याशी एकदम सहमत!!

बंड्या,
भारी चाल्लंय रे भावा :) येऊ दे आणखी...

-(पक्का राडेबाज) ध.

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Nov 2009 - 3:54 pm | फ्रॅक्चर बंड्या

नाही असे काही करणार नाही,,,,
काळजी घेउ...

टारझन's picture

12 Nov 2009 - 2:14 pm | टारझन

फारंच विचारवंत कविता आणि त्याहुन अधिक विचारवंत प्रतिसाद चुचु पर्‍या न नान्याचे !!!

- टारगट

बकुळफुले's picture

12 Nov 2009 - 2:17 pm | बकुळफुले

सिसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन
प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी

ऑ....सी सी मध्ये तुला.....
आणि मग मुख्य पत्र कोणाला?
हे बरे आहे. एकाच वेळेस एकीला मिठी आणि दुसरीला डोळा मारायचा

गणपा's picture

12 Nov 2009 - 2:29 pm | गणपा

अरे बकुळफुला कवीला बीसीसी म्हणायचं असाव बहुधा..
बंड्या भापो रे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Nov 2009 - 3:48 pm | फ्रॅक्चर बंड्या

अरे हा...
बीसीसी लिहायला पाहिजे होते..
चुकुन सीसी झाले...

धन्यवाद मित्रांनो...

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Nov 2009 - 3:48 pm | फ्रॅक्चर बंड्या

अरे हा...
बीसीसी लिहायला पाहिजे होते..
चुकुन सीसी झाले...

धन्यवाद मित्रांनो...

बाकरवडी's picture

12 Nov 2009 - 2:50 pm | बाकरवडी

जबरा :)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अनिल हटेला's picture

13 Nov 2009 - 1:22 am | अनिल हटेला

लगे रहो बंड्या भाऊ......:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

पाषाणभेद's picture

13 Nov 2009 - 9:43 am | पाषाणभेद

मराठीतील आतंरजालीय आद्यकवी, कवी फ्रॅक्चर बंड्या यांनी प्रस्तूत कवितेत नवीन पिढीला प्रेमात पडतांना ज्या काही वेदना होतात त्याचे यथार्थ चित्रण केले आहे. कविच्या मनात तिला निरोप देतांना जी काही घालमेल होते ते त्याने टेक्नीकल शब्दात व्यक्त करून वेदना व्यक्त करण्याचा एक नविनच पायंडा पाडता येणारे शब्दांचे भांडार २१ व्या शतकात येणार्‍या नविन पिढीस दिलेले आहे.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

फ्रॅक्चर बंड्या's picture

13 Nov 2009 - 9:57 am | फ्रॅक्चर बंड्या

=)) =)) =))

पाषाणभेद साहेब फार भारी प्रतिसाद आहे...

मी-सौरभ's picture

14 Nov 2009 - 12:04 am | मी-सौरभ

ब्लशतो & रिडतो
=)) =)) =))

मराठी भाषा अजून छान वाटली असती

सौरभ

अविनाशकुलकर्णी's picture

15 Nov 2009 - 7:30 pm | अविनाशकुलकर्णी

खुप मस्त आहे कविता..़झकास ...आवडली