प्रकाशाच्या उंबरठ्यावर - एक ढकलपत्र

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
12 Nov 2009 - 10:59 am

एका ढकलपत्रातून आलेला मजकूर, अनेकांना माहिती व्हावी असं वाटलं म्हणून इथे चढवत आहे.

"प्रकाशाच्या उंबरठ्यावर" या भाऊ गावंडे लिखित आणि "ग्रंथालीने" प्रकाशित पुस्तकावर आधारित १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्य "जिंकी रे जिंकी" या सिनेमाचे "झी टॉकिज" या वहिनीवर खास प्रसारण

अत्यंत वाया गेलेलं मूल, खूपच खोडकर उपद्रवी असं. त्याच्या परित्यक्ता मजूर असलेल्या आईलाही नकोसं झालेलं. आपली उपजिविका तुटपुंज्या मजुरित एक हे असं मूल आणि एक मुलगी यासह पुरी करतांना नाकी नऊ आलेली आई. या मुलाने रोज कुणाची ना कुणाची खोडी काढल्याने अत्यंत त्रासून गेली. मजुरीला जाऊ की या सात वर्षाच्या मुलाकडे लक्ष देऊ अशा विवंचनेत ती सापडली होती. या मुलाला शाळेत घालून ती आपली समस्या सोडवू पहाते. तो शाळेत जातोही परंतू शाळेत शिक्षकाच्या अमानुष माराने पुन्हा कधीही शाळेत न जाण्याच्या निर्धाराने शाळा सोडते. दुस-या वर्षी बदलून आलेल्या सहृदयी शिक्षकाच्या अनेकविध क्लृप्यांनी पुन्हा मूल शाळेत जायला सुरुवात करते. शिक्षणाच्या अनेकविध पाय-या पूर्ण करून परदेशातही विशेष शिक्षण धेऊन येते. शिक्षण खात्यात अधिकारी होऊन उच्च पदावर पोहचते.

ही कहाणी आहे भाऊ गावंडेंची! "प्रकाशाच्या उंबरठ्यावर" हे ग्रंथालीने ५ डिसेंबर २००३ रोजी प्रकाशित केलेल्या त्यांच्या आत्मवृत्ताची. त्याची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाल्यावर शिक्षण जगताने त्या पुस्तकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यावर चर्चा घडून आल्या. एवढेच नव्हे तर त्यावर "जिंकी रे जिंकी" ही सिनेमा पण निर्माण झाला. त्याला मुंबई आणि पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम चित्रपट म्हणून मान्यता मिळाली. हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "गोल्डन एलिफंट" पुरस्कार, कलकत्ता येथे उत्कृष्ट चित्रपट, नासिक महोत्सवात उत्कृष्ट फोटोग्राफी, इजिप्तची राजधानी कैरो येथे उत्कृष्ट चित्रपट गणल्या गेला. "झी गौरव" पुरस्कारात उत्कृष्ट कथा, सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट बालकलाकारासाठी नामांकन मिळाले आणि टिंग्या चित्रपटातील बालकलाकारासोबत "जिंकी रे जिंकी"च्या देवाशिष परांजपेला अवार्ड मिळाला. या चित्रपटाचे महत्व ओळखून "युनेस्कोने" उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट म्हणून शिक्षक प्रशिक्षणासाठी निवडला. विविध देशात त्याचे प्रसारण होणार आहे.

१४ नोव्हेंबर बालदिनाचे महत्व ओळखून "झी टॉकीज" या मराठी चित्रपट वाहिनीने "जिंकी रे जिंकी" हा चित्रपट दिनांक १४ नोव्हेंबर २००९ शनिवारी संध्याकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) दाखविण्याचे निश्चित केले आहे.

चित्रपटमाहिती

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 Nov 2009 - 11:07 am | विजुभाऊ

धन्यवाद्...........योग्य वेळेस माहिती पोचली.

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2009 - 11:24 am | सुमीत भातखंडे

बद्दल थँक्स.
पुस्तक मिळवून वाचलं पाहिजे

सहज's picture

12 Nov 2009 - 11:45 am | सहज

"प्रकाशाच्या उंबरठ्यावर" वाचले पाहीजे.

चांगली माहीती.

सुनील's picture

12 Nov 2009 - 11:53 am | सुनील

माहितीबद्दल धन्यवाद.

अवांतर - तुम्हाला अशीही ढकलपत्रे येतात? आम्हाला येणारी बहुतेक ढकलपत्रे ही शीर्षक वाचून डिलीट करायच्या लायकीची असतात!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2009 - 12:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरोत्तरः फडतूस ढकलपत्रं पाठवणार्‍यांना सणसणीत उत्तरं दिली की पुन्हा अशी ढकलपत्रं येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.

पुस्तक मी पण वाचलं नाही आहे, कार्यक्रम पहाता येणार नाही. पण पुस्तक जरूर विकत घेणार आहे.

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 12:24 pm | llपुण्याचे पेशवेll

छाण माहीती.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

समंजस's picture

12 Nov 2009 - 12:28 pm | समंजस

हा चित्रपट नक्कीच बघावा लागेल.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

पुस्तक वाचले पाहिजे.

माहितीबद्दल धन्यु ग !

अवांतर :- वाचताना मध्येच 'तारें जमीनपर' ची आठवण येउन गेली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रभो's picture

12 Nov 2009 - 9:31 pm | प्रभो

पुस्तक वाचले पाहिजे.

माहितीबद्दल धन्यु ग !

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा's picture

12 Nov 2009 - 1:02 pm | गणपा

काल खफ वर पाहिल तेव्हाच तुला सांगावस वाटल की खफ ऐवजी एखद्या धाग्यावर टाक.
पण कामाच्य गडबडीत सांगायच राहुन गेलं. कारण बरेच जण खफवर जातातच अस नाही.
माझी फेरी पण आठवड्यातुन एखदीच होते तिकडे.

मनकी बातां : हिला टेलीपथी येते असेल काय रे गण्या :?

प्रसन्न केसकर's picture

12 Nov 2009 - 2:21 pm | प्रसन्न केसकर

सकाळीच घरी बोलणं झालं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2009 - 4:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आज संध्याकाळच्या कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी धागा वर काढत आहे.

अदिती

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Nov 2009 - 6:00 pm | भाग्यश्री कुलकर्णी

त्यावर आलेला नवीन प्रतिसाद पाहुनच आठवण झाली आता लावेनच.

स्वाती२'s picture

14 Nov 2009 - 9:08 pm | स्वाती२

सिनेमा नाही बघायला मिळणार पण पुस्तक मागवून घेइन. माहिती बद्दल धन्यवाद.