सण म्हणजे आनंदोत्सव. यात असते ती खण्यापिण्याची चंगळ, कपड्या-लत्त्याची मौज-मजा, संगित नृत्याचा आस्वाद. खर तर मानवाने सणाच्या साजरीकरणाचा काळ ठरवला तो निसर्गाच्या बदलांनुसार. पण अस म्हणण्यापेक्षा कधी कधी अस वाटायला लागत की हा निसर्गच मानवाच्या सणासूदीत उत्साहाने शामिल झाला आहे आणि मानवाला त्याच्या विविध रूपात सामवून घेऊन रंगवून टाकतो आहे. निसर्ग मानवाला मुक्त हस्ते भरभरून सुख देऊन तृप्त करत आहे आणि या समाधानातच मानव आनंदोत्स्व साजरा करत आहे.
निसर्गाच्या प्रत्येक बदलाची चाहूल मानवाला काही काळ आधीच लागते आणि मग मानवही सज्ज होतो तो निसर्गाने देऊ केलेल्या त्या सुखसाठी. हा निसर्गातील बदल म्हणजे ऋतूचक्र. या चक्राच्या ढाच्यात मानवाने स्वतःला फिट्ट बसवल आहे. ज्यामुळे तो निसर्गाची ती उधळण वाया दवडू न देता द्वैहस्ते स्विकारू शकतो. आणि ही उधळण असते विविधतेने नटलेली. प्रत्येक जागी काही वेगळी किमया. निराळी जादू. निसर्गच हे जादूमयी रूप बदलल दिसत ते ऋतूचक्रात.
भारतात ब-याच ठिकाणी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे तीनच ऋतू दिसतात. अमेरिकेत काही भागात समर, फॉल, विंटर, स्प्रिंग असे चारही ऋतु व्यवस्थित दिसतात. त्यांच्या काळात थोडाफार फरक असतो. म्हणजे अमेरिकेतल्या उत्तरेकडे विंटर जास्त लांबलेला असतो. तर दक्षिणेकडे समर जास्त मोठा असतो. पण चार ही ऋतू पहायाला आणि सहजी अनुभवायला ही मात्र जरूर मिळतात.
या चार ऋतुंपैकी सध्या दक्षिणेकडे सूरू असलेला ऋतू म्हणजे पानगळीचा. फॉल सिझन! आत्ता बरीचशी झाडं आपल्या हिरव्या पल्लवीला विविध रंगांचा नजराणा भेट करून सोडचिठ्ठी देत आहेत. अश्या या रंगपंचमीतील निरोप समारंभ म्हणजेच फॉल फेस्टिव्हल.
मानवला केवळ दृष्टीसुख न मिळता अजून मिळत ते भरघोस धान्याच उत्पादन. त्याचाच हा सण. हाच काळ काही पिकांची कापणी झाल्यावर धान्य जमा करण्याचा. आताश्या शेतीतील काही पिक तयार झालेली असतात. हारवेस्ट किंवा कापणी करून झाल्यावर धान्य गोळा करून झालेल असते. ते पिक आधी शेतावर गोळा करून ठेवले जाते आणि मग मशिनने सडणी, धोपटणी वगैरे करून दाणेदार धान्य पोत्यात भरून साठवणीच्या जागी विकण्यासाठी जमा केले जाते. हे पिक तयार होताना तसेच कापणी करून शेतात जमा केलेले असताना अनेक पक्ष्यांचे भक्ष्य होते. काही वेळेला पक्ष्यांचे थवेच्या थवे संपूर्ण शेताचा फन्ना उडवतात. यासाठी शेता-शेतातून राखणी करावी लागते आणि या थव्यांना दूर सारावे लागते. प्राणी पक्ष्यांना माणसाच्या अस्तित्वाची जाणिव करून देणासाठी ब-याचदा या शेतात स्केअर क्रोज किंवा बुजगावणी ही उभी केलेली दिसतात.
पूर्वी अमेरिकेच्या अनेक ठिकाणी फॉल ऋतूत जेव्हा हारवेस्ट फिस्टेव्हल साजरा केला जात असे तेव्हा या बुजगावण्यांची स्पर्धा घेतली जात असे. अजूनही अशीच स्पर्धा जॉर्जियातील अटलांटा येथे घेतली जाते. या (स्केअर क्रोज काँटेस्ट) स्पर्धेत आजूबाजूच्या शाळा सहभागी होतात. या शाळीतील एक वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षक हे बुजगावण तयार करतात आणि शहाराच्या मुख्य रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबापाशी आयोजकांने नेमून दिलेल्या ठिकाणी गवतावच्या पेंडीवर मांडून ठेवतात. त्यावर त्या बुजगवण्याचे नाव, त्याची थोडक्यात माहिती, शाळेचे नाव, वर्ग आणि शिक्षकाचे नाव इत्यादी माहिती लिहिली जाते. मग एका शनिवारी सकाळी आयोजक, निवड समिती, आणि अर्थातच स्पर्धेत भाग घेतलेल्या शाळेचे शिक्षक त्या रस्त्यावर एकत्र जमतात. शहरातली उत्साही मंडळी आपल्या लेकरा-बाळा सोबत उपस्थित होतात. सर्व स्पर्धक बुजगावण्यांची पाहणी होते. त्या स्केअर क्रोजचे अगणित फोटो काढले जातात. वाह वाह होते. आपण एखाद `ध्यान` दिसत नसून एखाद्या सेलिब्रिटीसारख आकर्षक असल्याच प्रत्येक बुजगावण्याला त्या वेळी वाटत असाव. पाहणी नंतर निवड होऊन `विजेते बुजगावण` घोशित केले जाते आणि बक्षिस समारंभ होतो. साधारण दोन आठवडे ही बुजगावणी त्या दिव्याच्या खांबाशी उभ राहून तो रस्ता माहिती पूर्ण करतात. रस्त्यावरच्या रहदारीला याचे आकर्षण वाचल्यावाचून रहात नाही.
( फोटो बरेच असल्याने लहान आकारात टाकले आहेत.)
कुठलेही बुजगावण पाहिल की मला एक गंमत आठवते. कॉलेजमधे असताना एकदा आमची पिकनिक निघाली होती तेव्हाची ! शहर सोडल्यावर लगेचच आमच्या बस मधे काहीतरी बिघाड झाला. आम्हाला सर्वांना खाली उतराव लागल. त्या रहदारीच्या पण अरूंद रस्त्यावर घोळक्याने उभ राहण शक्य नव्हत. लगतच एक शेत होत. शेतात लांबवर झोपडीवजा घर होत. तिथून आमच्या आयोजकांनी परवानगी घेतली आणि आम्ही सर्व जण त्या शेतात घुसलो. शेत फार उंच नव्हत. असेल गुडघाभर. त्या शेतात सर्वात आकर्षक काय वाटल असेल तर उभ केलेले बुजगावण. दोन काठ्यांचा केलेला क्रॉस. आडव्या काठीला घातलेला मळकट, फाटका कुडता. खाली काहीच दिसल नाही म्हणून त्या बुजगावण्याची एवढी टिंगल झाली की एकीने कीव येऊन बिचा-याला खाली बांधायली तिची ओढणी ही देऊ केली. डोक्याच्या जागी एक चौकोनी खोका होता. चेहारा काहीच दिसत नव्हता. पण वर बांधलेल्या फडकेवजा मुंडाश्याने चेह-याचा आभास निर्माण केला होता. आमच्या पर्स मधल्या आयब्रो पेन्सिलने मुलांनी त्याला डोळे, नाक रंगवले. लिपस्टिकने ओठ काढले. आता ते बुजगावण खूपच हँडसम दिसायला लागल होत. सर्व मुलींनी त्या चिकन्याबरोबर मनसोक्त फोटो काढले.काही वेळाने फरसाण, वेफर्स्, चिवडा, बिस्किट यांची पाकिट बाहेर आली आणि खादाडी सूरू झाली. जवळच हसमुख चिकन्या नुसता उभा राहून आमच्याकडे पाहात होता. खाली पडलेला खाऊ खायला मात्र एक कुत्रा, दोन माऊ जमली. त्यांच्याशी खेळ झाला. खाणपिण झाल आणि चिकन्याला बाय बाय करून आम्ही दुरूस्त झालेल्या बसकडे निघालो. सर्व जण शेत सोडून बसमधे बसतो न बसतो तोच कुणाच तरी लक्ष पुन्हा शेताकडे गेल. कुत्रा मांजर काही दिसले नाहीत पण चिकन्याच्या आजूबाजूला कावळे मात्र जरूर दिसले. एक कावळा तर चक्क डोक्यावर बसून खालचे अन्नकण शोधत होता. तो निश्चल चिकन्या अजूनही हसतमुखाने कुठेतरी एकटक पाहात होता.
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 7:11 am | स्वाती२
बुजगावणी आवडली. ३-४ वर्षांपूर्वी आमच्या गावातही बुजगावण्यांची स्पर्धा घेतली होती. लायब्ररीच्या समोर बुजगावण्यांची नुसती गर्दी झाली होती.
11 Nov 2009 - 8:03 am | मदनबाण
मस्त लेख... नविन माहिती मिळाली. :)
मदनबाण.....
11 Nov 2009 - 8:21 am | आनंद घारे
बुजगावण्यांबद्दल माहिती वाचून मजा आली. गोष्ट तर फारच मजेदार. स्केअरक्रोला न घाबरता कावळेच त्याच्याभोवती जमा होत असतील तर धान्य खायला शेतात येणारी पाखरे कशी घाबरणार?
मागच्या वर्षी मला हे समजले असते तर अॅटलांटाला जाऊन बुजगावणी पाहाण्याची संधी होती, पण कोणी त्याचा उल्लेखच केला नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
11 Nov 2009 - 8:21 am | आनंद घारे
बुजगावण्यांबद्दल माहिती वाचून मजा आली. गोष्ट तर फारच मजेदार. स्केअरक्रोला न घाबरता कावळेच त्याच्याभोवती जमा होत असतील तर धान्य खायला शेतात येणारी पाखरे कशी घाबरणार?
मागच्या वर्षी मला हे समजले असते तर अॅटलांटाला जाऊन बुजगावणी पाहाण्याची संधी होती, पण कोणी त्याचा उल्लेखच केला नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
11 Nov 2009 - 8:27 am | प्राजु
सह्हीये!
मस्त लिहिले आहेस. फोटो तर खूपच छान.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
11 Nov 2009 - 12:00 pm | योगी९००
आता ते बुजगावण खूपच हँडसम दिसायला लागल होत ....पण चिकन्याच्या आजूबाजूला कावळे मात्र जरूर दिसले. एक कावळा तर चक्क डोक्यावर बसून खालचे अन्नकण शोधत होता. तो निश्चल चिकन्या अजूनही हसतमुखाने कुठेतरी एकटक पाहात होता.
मस्त...पण एक वाटले की तुम्ही केलेल्या रंगरंगोटीमुळे बुजगावणे चिकने दिसायला लागले आणि कावळे मग घाबरले नाहीत. कदाचित नंतर शेतकरी तुम्हाला शिव्या घालत असेल... हॅ हॅ हॅ..
खादाडमाऊ
11 Nov 2009 - 7:43 pm | यशोधरा
प्रकाशचित्रं दिसत नाही आहेत :(
11 Nov 2009 - 7:49 pm | लवंगी
फोटो छान मिनलताई.. जर फोटो काढले तर जरुर लाविन..
11 Nov 2009 - 8:01 pm | बिपिन कार्यकर्ते
छान माहिती. जगात काय गंमतीदार प्रथा असतात नाही?
बिपिन कार्यकर्ते
12 Nov 2009 - 7:27 pm | चित्रा
छान माहिती.
इथे नॉर्थ-इस्टला आमच्या भागात अशी सगळीकडे बुजगावणी असल्याचे दिसले नाही कधी. काही घरांसमोर नाही म्हणायला असतात, पण असा सोहळा नसतो. ही माहिती नवीन मिळाली.
आमच्याकडे भोपळ्याच्या आकारावरून एक स्पर्धा असते - कोणाकडचा भोपळा सगळ्यात मोठा?
http://www.boston.com/news/local/breaking_news/2009/10/thats_a_doozie.html
12 Nov 2009 - 7:54 pm | गणपा
वरील दुव्यातला भोपळा पाहुन खात्री पटली की चलरे भोपळ्या टुणुक टुणुक ही दंतकथा नव्हे :D
12 Nov 2009 - 7:58 pm | मदनबाण
अगदी हेच मनात आलं होतं.
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.