नवीन सदस्य

अरभाट आणि चिल्लर's picture
अरभाट आणि चिल्लर in जनातलं, मनातलं
9 Nov 2009 - 8:02 am

मित्रहो नमस्कार,
मी मिपा चा एक नविन सदस्य आहे, आणी गेले काही दिवस इथे नियमितपणे वाचन करीत आहे. मलापण काही वेळा प्रतिसाद द्यावासा वाटतो म्हणून मी सदस्यत्व घेतल.
मला इतक लिहायला सुद्धा बराच वेळ लागला. काही अक्षरे तर लिहिताच आली नाहीत. क्रूपया मार्गदर्शन करावे.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

बाकरवडी's picture

9 Nov 2009 - 9:37 am | बाकरवडी

स्वागत!!!!!! :)

हे बघा म्हणजे लिहायला सोपे जाईल.
http://misalpav.com/help.html

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

बाकरवडी's picture

9 Nov 2009 - 9:37 am | बाकरवडी

स्वागत!!!!!! :)

हे बघा म्हणजे लिहायला सोपे जाईल.
http://misalpav.com/help.html

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

ऋषिकेश's picture

9 Nov 2009 - 10:09 am | ऋषिकेश

स्वागत आहे. लिहित रहा सवय होईल

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Nov 2009 - 10:27 am | बिपिन कार्यकर्ते

मिपावर तुमचे स्वागत आहे. लिहित रहा... सराव होईल हळूहळू. अडलं नडलं तर विचारत जा. :)

तुमच्या सदस्यनामावरून वाटतंय की तुम्ही जीएंचे वाचक असाल!!!

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

9 Nov 2009 - 12:40 pm | अवलिया

सहमत आहे.
तसेही बरेच जीए प्रेमी जमायला लागलेले दिसत आहेत.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळपाववर तुमचं स्वागत.
ऋषिकेशशी सहमत. लिहायला लागा, जमेल आपोआप. दोन ओळी लिहायला वेळ लागला तरीही तुम्ही बरचसं व्यवस्थित लिहीलं आहेतच. सवयीने वेगातही लिहीता येईल.

आता आजची टीप: 'कृ'चं स्पेलिंग: k+R+u

अदिती

ऍडीजोशी's picture

9 Nov 2009 - 11:39 am | ऍडीजोशी (not verified)

k+R+u लिहिताना + दाबू नका

सुधीर काळे's picture

9 Nov 2009 - 12:58 pm | सुधीर काळे

एक कुतुहल म्हणून विचारतोय तुम्हाला कानडीही येते का? कारण कानडीत 'अरभाट' म्हणजे झकास, अफलातून!
हो, मला बर्‍यापैकी कानडी येतं.
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

आंबोळी's picture

9 Nov 2009 - 1:22 pm | आंबोळी

काळे भौ, कानडीत चिल्लर म्हणजे काय ते पण सांगा ना...

आंबोळी

चिल्लर हा पिव्वर मराठी शब्द आहे! कानडीत त्याला "बिच्च रॉक्क" म्हणतात.
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

प्रसन्न केसकर's picture

9 Nov 2009 - 2:29 pm | प्रसन्न केसकर

अन लिहिते व्हा! एकदोनदा लिहिलंत की आपोआप होईल सवय. सोपं आहे. अन लोक पण समजुतदार आहेत इथं. फक्त समजुन घेत नाहीत तर मदत करतात अन प्रोत्साहन पण देतात हा माझा स्वानुभव आहे.

भडकमकर मास्तर's picture

9 Nov 2009 - 2:53 pm | भडकमकर मास्तर

याया.. स्वागत आहे ...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

सूहास's picture

9 Nov 2009 - 3:00 pm | सूहास (not verified)

अन लिहिते व्हा! एकदोनदा लिहिलंत की आपोआप होईल सवय. सोपं आहे. अन लोक पण समजुतदार आहेत इथं. फक्त समजुन घेत नाहीत तर मदत करतात अन प्रोत्साहन पण देतात हा माझा स्वानुभव आहे. >>>

एकदम बरोबर ..

आणी मिपावर स्वागत...

सूहास's picture

9 Nov 2009 - 3:00 pm | सूहास (not verified)

अन लिहिते व्हा! एकदोनदा लिहिलंत की आपोआप होईल सवय. सोपं आहे. अन लोक पण समजुतदार आहेत इथं. फक्त समजुन घेत नाहीत तर मदत करतात अन प्रोत्साहन पण देतात हा माझा स्वानुभव आहे. >>>

एकदम बरोबर ..

आणी मिपावर स्वागत...

आशिष सुर्वे's picture

9 Nov 2009 - 3:45 pm | आशिष सुर्वे

सुस्वागतम!..
मिपा परिवारात स्वागत आहे..
एखादी फक्कड पाककृती टाका पाहु!! :)
-
कोकणी फणस

प्रभो's picture

10 Nov 2009 - 6:28 am | प्रभो

मिपावर स्वागत.. :)

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अरभाट आणि चिल्लर's picture

10 Nov 2009 - 8:23 am | अरभाट आणि चिल्लर

तुमचे प्रतिसाद वाचून बराच धीर आला.
जीए हे माझे सर्वात आवडते लेखक आहेत.
मी कानडी नाही, पण या नावाचे जीए वरचे पुस्तक मी वाचले आहे. त्यात अरभाट चा अर्थ सान्गितला आहे.

हे टाईप करायला कालच्या पेक्षा आज कमी वेळ लागला.

टारझन's picture

10 Nov 2009 - 1:27 pm | टारझन

आरभाट साहेब ... आपणही मिसळपाव चे सभासद झाल्यानं माझा उर पुर्ण भरून आला आहे. :) काल मी आमच्या कंपनीच्या पुर्ण फ्लोअर ला पेढे वाटप केले.

असो .. आपल्याला सगळ्याच कामांना दिवसेंदिवस कमी वेळ लागो .. हीच सदिच्छा !

तुमचे प्रतिसाद वाचून बराच धीर आला.

ही उद्याच्या संकटाची चाहूल वाटली !!

बाकी चालू द्या !

- आ. टारझन
(नविन सदस्य स्वागत मंडळ)

मॅन्ड्रेक's picture

10 Nov 2009 - 1:15 pm | मॅन्ड्रेक

go ahed.
at and post : Xanadu.

बाकी मिपावर तुमचे स्वागत असो.

वेताळ