यम धर्म

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
3 Nov 2009 - 2:19 pm

काळा मिट्ट अंधार.
अजुनही दहा मिनिटे होती तासिका संपायला.
(आजकाल तास म्हणत नाहीत)
विज कधी येणार ते माहीत नव्हते.
मुले अंधारात कशी काय अभ्यास करतात कुणास ठाउक.?
समोर बसलेला मास्तर तरणा होता.
चेहेरा तरारलेला.
मास्तरकीची चमक स्पष्ट दिसत होती.
नेहेमीच्या विझलेल्या डोळ्यानी यंत्रवत काम करणार्‍या शिक्षकापेक्षा वेगळा.
शाळा गोलमेज परिषदेच्या काळातली.
अजुनही तशीच.
१२ फुटावर छत.
पत्र्याचे
मोडके पंखे
तुटकी बाके.
माझ्या खुर्चीतल्या ढेकणाची चंगळ चालली होती.
शाळेच्या कंपाउंड ला लागुन १७ माळ्याची टॉलेजंग इमारत दिसत होती.
ही कुठली आपटे बुद्रुक गावातली शाळा नव्हती.
अगदी मुंबईच्या १२००० स्क्वेअर फुट दराच्या उपनगरातील मराठी शाळा.
आजुबाजुच्या प्रगतीचा मागमुस ह्या मराठी माध्यमाच्या शाळेला नव्हता.
इतक्यात वर्ग शिक्षिका ९ वी मधील ३ मुलांना घेउन आली.
झाला प्रकार सांगितला.

मास्तर भडकला.
फटाक....(कानाखाली)
धपाक.....(पाठीवर)
शारिरीक समुपदेशनाचे जवळ जवळ १५ मिनिटाचे अगदी जवळुन दर्शन.
तो जे काही बोलत होता त्यावरुन एवढे नक्की होते की..
मास्तरमधला मास्तर अजुनही मेला नव्हता.
त्यातल्या एका मुलाचा मोठा भाउ गेल्या वर्षीचा दहावीला१ ला नंबर.
त्याची शाब्दिक आणि शारीरीक धुलाई अगदी कडक चालली होती.

झाला प्रकार असा.
मुलांनी शक्कल लढवली.
मॉल मधील खर्च फायनान्स करायची.
रस्त्यावर उभे राहायचे गणवेशात.
छातीवर तिरंगा.
डब्यावर तिरंगा.
आल्यागेल्याला छातीवर तिरंगा लावायचे.
डबा पुढे करायचे.
असे सुमारे २ महीने चालु होते.
रोज त्याच मुलांना मॉलमधे बघितल्यावर एका डोरकिपरने सामाजिक बांधिलकी बाळगली आणि प्रकार उघडकीस आला.

मास्तर धुलाई संपवुन माझ्या कडे वळला.
आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती
" काय करायचे या मुलांचे ?" मास्तर
इतक्यात बोलावणे आले आणि मी सुटलो.
जाता जाता त्याला म्हणालो,
" मास्तर फार मनावर घेउ नका"
तुम्ही रिटायर होईपर्यंत ह्यातलाच कुणीतरी यम्.यल्.सी. यम्.यल्.ये. ,यम्.पी होउन शाळेतल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होइल.
त्याचा गुच्छ देउन तुम्हालाच आदर सत्कार करायला लागेल"

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

टारझन's picture

3 Nov 2009 - 2:28 pm | टारझन

हॅहॅहॅ ... अंमळ करमणुक झाली !!

-- व्हि-नायक लंबू

अवलिया's picture

3 Nov 2009 - 2:32 pm | अवलिया

तुम्ही रिटायर होईपर्यंत ह्यातलाच कुणीतरी यम्.यल्.सी. यम्.यल्.ये. ,यम्.पी होउन शाळेतल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होइल.

किंवा लोकांना मरणाची भिती दाखवुन विमा काढायला लावेल
किंवा लोकांना नस्त्या बलामती दाखवुन समुपदेशक बनेल
किंवा दलालस्ट्रीट वरच्या कंपन्यांचा एजंट बनुन आयपीओतुन पैसा लाटेल
किंवा मराठीचा प्राध्यापक बनुन संस्कृत शिकणे कसे चुकीचे आहे हे सांगेल
किंवा इथल्या स्पर्धेला भिवुन परदेशात दुय्यम दर्जाची नोकरी करेल
किंवा...............!!!!!!!!!

अक्षरशः शेकडो शक्यता आहेत मास्तर... तुम्ही फक्त एकच शक्यता धरत आहात.

असो. सध्या भारतातील राजकारण्यांना काही करुन नावं ठेवायची आणि आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत हे सांगायची फ्याशन आंतरजालावर आहे... तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल.

ग्रेट !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

महेश हतोळकर's picture

3 Nov 2009 - 2:37 pm | महेश हतोळकर

काहीही होऊ शकते. तुम्ही मनावर घेऊ नका मास्तर!

विनायक प्रभू's picture

3 Nov 2009 - 3:12 pm | विनायक प्रभू

मधील आणखी एक.
आंतरजालावर अमेरिका विरोधी मोहीम चालवेल.

अवलिया's picture

3 Nov 2009 - 3:14 pm | अवलिया

शेकडोपैकी अजुन एक अशाच अमेरिका विरोधकाचा मित्र बनेल

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

धमाल मुलगा's picture

3 Nov 2009 - 2:33 pm | धमाल मुलगा

विदारक पण वस्तुस्थिती!
इतकंच म्हणेन.

सहज's picture

3 Nov 2009 - 2:52 pm | सहज

मराठी मिडीयममधली का? वा वा लै भारी आहेत हो पोरं!

मास्तर धुलाई संपवुन माझ्या कडे वळला.
आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती

का बरे गेस्ट लेक्चररनी शिकवली होती का ही जुनी ट्रीक? ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2009 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती

पण तो तुमचे 'दही' कशाला करेल ? तुमचे तुम्हाला 'दही' करता येत नाही का ??

©º°¨¨°º© परायक प्रभु ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सुनील's picture

3 Nov 2009 - 4:40 pm | सुनील

फुकटात दही देणारे लोकही मिपावर आहेत, असे ऐकीवात आहे! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टारझन's picture

3 Nov 2009 - 4:42 pm | टारझन

लेका पर्‍या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !!

-- ऊकळहप्ता
आमच्या येथे सर्व मास्तरांचे "खात्रीशीर" दही करून मिळेल.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2009 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार

लेका पर्‍या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !!

अहो टारयका महाप्रभु मग 'दही' ह्या शब्दा ऐवजी 'चक्का' हा शब्द वापरणे योग्य न्हवे का ? गुर्जीला लगेच दुरुस्ती करायला सांगा.

©º°¨¨°º© परायक युनिकोदा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2009 - 12:30 am | मिसळभोक्ता

उकळहप्ता

हे जबरा आहे. मास्तरांचे दही होण्या ऐवजी चीज झाले.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

3 Nov 2009 - 3:17 pm | समंजस

:)

सुनील's picture

3 Nov 2009 - 4:29 pm | सुनील

मुले जर शाळेच्या वेळात, तास बुडवून हे करीत असतील, तर त्यांच्या पालकांना ह्याबद्दल कळवणे, हा उपाय योग्य. पण जर का, मुले शाळा न बुडवता हे करीत असतील, तर त्यात अयोग्य ते काय, ते समजले नाही. (म्हणजे, मिळालेल्या पैशाचा विनियोग ते उधळपट्टीत करीत असतील, तर त्यांना योग्य ती शिकवण जरूर द्यावी, पंणं मुदलात अशा तर्‍हेने पैसे कमवणे हेच अयोग्य आहे काय?)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

घरचे उधळपट्टीला पैसे देत नसणार याबाबतीत +१.
मुलांनी डोकं चालवलं यासाठी +१
तास बुडवत नसतील तर +१
आणि झेंडे विकणं चूक नसेल तर +०

पोरांनी किमान डोकं चालवलं याचा तरी विचार व्हावा. पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी?

अदिती

संदीप चित्रे's picture

3 Nov 2009 - 7:50 pm | संदीप चित्रे

>> पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी?

१००% सहमत !

लवंगी's picture

4 Nov 2009 - 3:49 am | लवंगी

किती हुशार आहेत पोरं!

डोक नको तिकडे चाललय हे खर.. पण अशी हाणामारी करून त्यांना चुक कळणार आहे का? हेच प्रेमाने समजावल तर हीच अक्कल योग्य ठिकाणी वापरून चीज ( नाहितर किमान दहि-चक्का तरी नक्कीच) करतील

विनायक प्रभू's picture

3 Nov 2009 - 5:06 pm | विनायक प्रभू

बुडवुन किंवा न बुडवता तिरंगा विकताहेत ना, बस्स.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2009 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार

अहो पण गुर्जी ज्यांना १५ ऑगस्ट आणी २६ जानेवारीला तिरंगा विकत घेउनच फडकवावा लागत असेल, गाडीला / सायकलला बांधावा लागत असेल त्या पोरांना झेंडा विकावा का विकु नये ह्याचे कारण / महत्व कसे माहिती असणार ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

स्वाती२'s picture

3 Nov 2009 - 5:22 pm | स्वाती२

च्च! धडपड्या पोरांना मारून काय शिकवल त्या मास्तराने?

रेवती's picture

3 Nov 2009 - 8:42 pm | रेवती

शाळेच्या शिक्षकांनी मारायला नको होते. मॉलसंस्कृतीकडे मोठे लोक (म्हणजे वयाने) ही आकर्षीत होतात तर अश्या विचित्र वयातील मुलांना फारसा दोष देता येणार नाही. त्यांना तिथले नक्की काय आवडते? फूडकोर्ट? चकचकीत दुकाने? कि वरवर दिसणारा भरपूर पैसा? प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार/वयानुसार प्रश्न वेगळ्याप्रकारे सोडवता येइल. पालकांना विश्वासात घेऊन सांगता येइल. मार्ग भरपूर आहेत पण आजकालची मराठी शाळांची परिस्थिती बघता (प्रभू मास्तरांनी वर्णन केल्यानुसार्....ढेकूण वगैरे) त्या शिक्षकांनी तरी काय काय करायचं? न मारता पालकांना सांगणे एवढे तरी ते नक्कीच करू शकतात. सुजाण पालक परिस्थिती ओळखून वागतील.

रेवती

पक्या's picture

3 Nov 2009 - 11:35 pm | पक्या

मुलांना मारणे चुकीचे आहे.
हीच पोरे अमेरिकामधे असती तर ९११ फिरवला असता आणि मास्तर गजाआड गेला असता.