तु नाही म्हणालीस,
ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात,
माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं
इवलसं घर उध्वस्त झाले
पण परसातली रातरानी तशीच आहे,
ती वाट पाहतेय,
कोणाची ते माहीत नाही
अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे,
त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही,
त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही
अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे ,
का कोणासाठी ते माहीत नाही
आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ,
आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय,
घराकडे येणार्या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन,
का कोणास ठाउक ...
प्रतिक्रिया
3 Nov 2009 - 12:31 pm | मसक्कली
बंड्या कोणाची वाट पाहतोय.... 8> हम्म्म्म्म ;)
फ्रॅक्चर बंडी का :B
=)) =))
3 Nov 2009 - 12:40 pm | टारझन
फ्रॅक्चर बंड्याच्या अतिशय सेंसिटिव्ह मनाच्या हळव्या भावणा दुखावणारी कमेंट देणार्या हिण आणि हिडिस प्रतिसादकाचा मी इथे जाज्वल्य निषेध नोंदवतो !
बंडोपंत , कविता अंमळ टची आहे ! अजुन येऊ द्या !!
-- चिपक्कली
3 Nov 2009 - 2:53 pm | फ्रॅक्चर बंड्या
धन्यवाद...
टारझन भाउ तुमचा प्रतिसाद कायमच भारी असतो...
3 Nov 2009 - 6:11 pm | मॅन्ड्रेक
सुंदर
रातरानी / अंगनातली
न / ण या मधे गडबड .
at and post : Xanadu.