आवाजातला गोडवा

प्रशांत उदय मनोहर's picture
प्रशांत उदय मनोहर in जनातलं, मनातलं
1 Nov 2009 - 1:03 pm

वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे. हैदराबादमध्ये काही वर्षांपूर्वी लतादीदींचा कार्यक्रम झाला होता, त्यानंतर दीदींचा लाईव्ह कार्यक्रम झाल्याचं ऐकिवात नाही. आवाजातला नाजुकपणा पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी गोडवा अजूनही तितकाच कायम होता असं त्या कार्यक्रमातली गाणी ऐकल्यावर लक्ष्यात येतं.

दीदींच्या आवाजाच्या गोडव्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही. पण मला त्यातलं जे काही झेपलंय त्यानुसार दीदींच्या या सो कॉल्ड "जाड" आवाजाबद्दल -
दीदींच्या आवाजात समुद्राच्या निळ्या रंगातलं गहिरेपण आहे.

एखाद्या वस्तूवर पोतलेला निळा रंग आणि जलाशयाला भव्यतेमुळे लाभलेला निळा रंग यात जो फरक आहे तोच इतर जाड आवाजांमध्ये आणि दीदींच्या आवाजामध्ये फरक आहे असं मला वाटतं. पोतलेला रंग हटवता येतो, समुद्राचा रंग हटवता येत नाही.

दीदींची पूर्वीची गाणी ऐकल्यावर त्यांच्या आताच्या आवाजात तीच गाणी ऐकवत नाहीत असंही अनेकांचं मत आहे. त्यांच्या मताचा आदर करतो. मूळ गाण्यांपेक्षा आताच्या आवाजातली त्यांची गाणी कधीकधी कितीतरी पटीने आनंददायक आणि गोड वाटतात असं मला वाटतं. उदाहरणार्थ, हैदराबादच्या कार्यक्रमातलं हे गाणं.
"जो वादा किया वो निभाना पडेगा"मध्ये पहिल्या कडव्याच्या शेवटी "जान-ए-वफा छोडो तरसाना हमको" नंतर "आना पडेगा....जो वादा किया वो...."च्या वेळी दीदींनी व्होकल काँट्रा दिलाय तो केवळ अप्रतीम. मूळ गाण्यात तो काँट्रा नाही. मूळ गाण्यात न घेतलेल्या पण प्रत्यक्ष मैफलीत घेतलेल्या या जागेवर जीव ओवाळून टाकावा असं वाटतं. "परमानंद" वगैरे मोठ्या शब्दांचा अर्थ कळत नाही आपल्याला (म्हणजे मला). पण उपरोक्त काँट्रामध्ये परमानंदाचा एक अंश असावा असं वाटतं.

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

1 Nov 2009 - 1:42 pm | प्रमोद देव

आवडलं गायन.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

क्रान्ति's picture

1 Nov 2009 - 2:51 pm | क्रान्ति

प्रशांत, तो आलाप याच गाण्याच्या दुसर्‍या भागात घेतलेला आहे. बाकी लताजींच्या आवाजाबद्दल, गायकीबद्दल बोलायला सुद्धा शब्द नसतात! तो गोडवा खरंच अप्रतिम! पण रूपकुमार राठोडच्या आवाजात हे गाणं ऐकायला जड वाटलं! :)
"

क्रान्ति
अग्निसखा

प्रशांत उदय मनोहर's picture

1 Nov 2009 - 8:15 pm | प्रशांत उदय मनोहर

ही व्हिडियो क्लिप दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी हा भाग ऐकला नव्हता. या निमित्ताने ज्ञानात भर पडली माझ्या.
आपला,
("जो वादा किया"वर फ़िदा) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

JAGOMOHANPYARE's picture

1 Nov 2009 - 3:19 pm | JAGOMOHANPYARE

जो वादा किया च्या २ वर्जन्स आहेत... एक हॅपी आहे. एक सॅड आहे... हॅपी वर्जनम्ध्ये तुम्ही म्हणता तो आलाप आहे... या एका जागेसाठी ते गाणे सारखे ऐकावेसे वाटते, हे मात्र अगदी सत्य....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

प्राजु's picture

1 Nov 2009 - 8:08 pm | प्राजु

बेस्ट!!
:)
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

प्रशांत उदय मनोहर's picture

2 Nov 2009 - 6:12 pm | प्रशांत उदय मनोहर

हे आणि गाणं ऐका. सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी "श्रद्धांजली" या कार्यक्रमातलं.

मूळ गाणं तर कर्णमधुर आहेच. पण या गाण्यातला गोडवा काही औरच आहे. या गाण्यातलं शेवटलं कडवं - "सताए ज़माना सितम ढाये दुनिया, मगर तू किसी की तमन्ना लिये जा" मधलं "सताएं"चं तार रिषभावर जाऊन "जमाना"मध्ये सांगं रेंगं गंसां ची जागा तर अप्रतीम आहेच. "एक सप्तक म्हणजे सात स्वर नव्हे, तर बावीस श्रुती" अशी अनुभूती दीदींच्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या या आवाजात येते. पानोपान फुललेल्या मोगर्‍याप्रमाणे एक-एक श्रुती स्वरित झाली आहे.

आपला,
(नतमस्तक) प्रशांत

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2009 - 8:50 am | प्रकाश घाटपांडे

वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे.

आता पहिल्या छुट सांगुन ठुतो कि आपल्याला गान्यातल काही कळत नाय. पन वयापर्माने आवाजात फरक पड्तो हे सांगायला ईद्वान कशाला पायजेल? आन प्रेम कर्न्नारी मान्स बदललेल्या आवाजाव प्रेम करत्यात. गोडवा ही आपल्या मनात्ली भावना हाय त्येला मोजमाप नस्तय
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.