बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप...
सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!
अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली
हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप !
केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला
उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप !
शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?,
मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप !
कुरकुरीत चुर्यावरी, पिठूर चूर्ण पांघरु...
उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप!
तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते
हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप !
पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी
कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप !
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
18 May 2018 - 7:32 pm | प्राची अश्विनी
:):):)
किक वाली कविता.;)
18 May 2018 - 8:12 pm | जेम्स वांड
__________/\____________
हृदयाच्या अंमळ जवळ असलेल्या शौकाला असली दर्दी सलामी. मजेदार आहे राव.
18 May 2018 - 8:24 pm | प्रचेतस
माताय.. =))
बाकी तुम्ही सह्यांचं विडंबन न करण्याचं भलतंच मनावर घेतलंत ब्वा.
18 May 2018 - 10:29 pm | नाखु
जबराट
ता क
विडंबकाने ऑल आउट वापरण्यापेक्षा लक्ष्मण रेखा बाळगावी
अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार
टपाली दूरस्थ नाखु
19 May 2018 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार
काय जबरा प्रतिसाद ...
या प्रतिसादासाठी तुम्हाला काटाकीरची मिसळ आणि दोन ग्लास मस्तानी
पैजारबुवा,
19 May 2018 - 9:40 am | मदनबाण
जबराट...
अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]
18 May 2018 - 8:28 pm | प्रसाद गोडबोले
खतरनाक विडंबन !
डबल आर घ्या पैजारबुवा =))))
18 May 2018 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
पैजारबुवा सुटलेत... नेहमीप्रमाणेच ! =)) =)) =))
18 May 2018 - 9:36 pm | अभ्या..
हणतीज्यायला,
जय हो मालपाणी सेठ,
जय हो चत्त्यापट्टयांची चड्डी घालून गायीची धार काढणारा इसम.
पण ती गाय जर्दा छाप असते बरका.
19 May 2018 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
19 May 2018 - 2:01 am | रातराणी
घ्या पुढचा विषय पैजारबुवा
"सखे चखण्यासवेच, आज भर पेग"
:) विडंबन फर्मास जमले आहे.
19 May 2018 - 10:38 am | माहितगार
हा हा हा =)) , तेवढ्या रम्य काव्य कल्पनेकडुन अशा विडंबनावर पोहचू शकला याचीही कौतुकास्पद कमाल वाटते. :)) मिपा कविलोक हैकी मानते नही ! :)
19 May 2018 - 11:23 am | भीमराव
पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी
कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप
या वाक्यासाठी कडाडून १५ मिनिटे टाळ्यांचा मान
19 May 2018 - 10:06 pm | दुर्गविहारी
हा हा हा ! आधी मुळ कविता वाचून ईथे आलो ते बरं झालं. नाही तर मुळ कविता वाचताना बरंच काही डोळ्यासमोर आले असते. ;-)
20 May 2018 - 5:05 pm | शाली
धमाल :)
22 May 2018 - 4:45 pm | खिलजि
पैबु काका
नेहेमीप्रमाणे धमाल सादरीकरण . मज्जा आली .
24 May 2018 - 2:32 pm | सूड
वाह!!