वास्तवाच्या लाक्षागृही
पुन्हा पुन्हा मी जळलो
माझ्या स्वप्नांच्या अंताची
तेव्हा सुरुवात झाली
मग अश्रुंच्या पुरात
निराधार भोवंडलो
करूणेच्या सागराची
गाज तेव्हा निनादली
आभाळाच्या तुकड्यात
थोड्या पेरल्या चांदण्या
तेव्हा आकाशगंगेची
किनखाप झळाळली
शब्द शब्द मग केला
कवितेचा वज्रलेप
कवितेची वही तेव्हा
पाण्यावर तरंगली
प्रतिक्रिया
15 May 2018 - 11:25 pm | रातराणी
सुरेख!! कविता आवडली!
16 May 2018 - 2:24 am | निशाचर
सुरेख!
16 May 2018 - 11:11 am | पुंबा
अप्रतीम..
16 May 2018 - 10:20 pm | अनन्त्_यात्री
सर्वांना धन्यवाद!