स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावणार्या,
जिज्ञासेच्या तेज:पुंज आकाशातून दिपवणार्या,
अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळणार्या,
अंतिम सत्याच्या मृगजळातून अथक ठिबकणार्या,
स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरणार्या,
जडचेतनाच्या जटिल कोड्यातून उलगडणार्या,
क्षुद्रतेतून बुजबुजणार्या,
विराटाला वेधणार्या,
कोलाहलातून गजबजणार्या,
एकांतातून निनादणार्या,
माणुसकीतून पाझरणार्या,
अनावर भोगातून- वीतरागी वैराग्यातून हेलकावणार्या,
जाणिवेतून- नेणिवेतून धपापणार्या,
अनघड शब्दांनो...
...वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी
प्रतिक्रिया
27 Apr 2018 - 4:42 pm | श्वेता२४
अनघड शब्दांनो...
...वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी
28 Apr 2018 - 9:12 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद.
30 Apr 2018 - 11:35 am | Naval
व्वा !! व्वा!! अप्रतिम...
...वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी
अहाहा!!!
1 May 2018 - 2:49 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद!